Author: दीपक मोहिते

दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” हलाखीचे जीवन जगणारा आमचा अन्नदाता व निर्लज्ज सरकार, देशाच्या विकासामध्ये शेतकरी व कामगार या दोन वर्गचे फार मोठे योगदान असल्याचे आपण सतत ऐकत असतो.या दोन वर्गापैकी एकाने आपली भूक मिटवली तर दुसऱ्या वर्गाने आपल्या कष्टाने रोजगार निर्मिती केली.त्यामुळे आपला देश कृषीप्रधान व उद्योगशील देश म्हणून ओळखला जाऊ लागला.पण आज हे दोन्ही वर्ग राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत.आज त्यांना कोणीच वाली उरलेले नाही. दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात एक शेतकरी त्याच्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या मानेवर हौद ठेवून नांगरणी करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व सरकार खडबडून जागे झाले.अभिनेते सोनू सुद यांनी त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर…

Read More

जव्हार प्रतिनिधी, प्रयास फाउंडेशन ट्रस्टतर्फे मोहाचापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, जव्हारमधील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळा,मोहाचा पाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत शाळेच्या १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पाटी,पेन्सिल,शार्पनर,कंपास बॉक्स,खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष रजपूत,सहशिक्षक राजेंद्र महाजन,गोविंद वळवी,रावते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी ” प्रयास फाउंडेशन ट्रस्ट,” च्या या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले व आभार मानले.शाळेच्या…

Read More

सचिन पाटील,विरार विवा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती स्पर्धांचे आयोजन, विवा महाविद्यालय मिरा – भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तालय आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ‘तसेच ‘ नशा मुक्ती भारत ‘ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अँटी ड्रग स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे,सहा.पोलीस निरीक्षक जयचंद्र ठाकूर,सहा.पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे इ.मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी ” जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत संकल्पनेवर…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात भातलावणीला सुरुवात, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्हातील सर्वच तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे वाडा तालुक्यात मजुरांची कमतरता भासू लागली आहे.त्यामुळे विक्रमगड, तलासरी,जव्हार,मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजुर आणावे लागत आहेत.ततसेच मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.सकाळी न्याहरी, दुपारी जेवण द्यावे लागते.यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खचिॅक व्यवसाय होऊ लागला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चिक शेती परवडत नाही. तालुक्यात १७६ गावे २०० हून अधिक पाडे असून १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपीका खाली आहे.येथील शेती पावसावर अवलंबून आहे.येथे झिनी (वाडा कोलम),सुरती,सुवर्णा,जोरदार,वाय.एस.आर,मसुरी,एककाडी,गुजरात ११,गुजरात…

Read More

वसंत भोईर,वाडा रायकर पाडा येथील विद्यार्थी तराफ्यातून प्रवास करत गाठतात शाळा, तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकर पाडा हे वीस घरांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या सहाय्याने वैतरणा नदीतून प्रवास करून सोनाळे गावातील शाळा गाठावी लागते.वारा,पाऊस व नदीच्या पाण्यात ओले कपडे वह्या, पुस्तकांची पार अवस्था होत असते.अशा परिस्थितीत डोक्यावर भितीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी जिद्दीने प्रवास करत शाळा गाठत असतात. गायकर पाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाला हायस्कूल,२ विद्यार्थी जि.प.शाळा कापरी,एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यर्थ्यांना दररोज रोज शिक्षणासाठी हा प्रवास करावा लागततो.मात्र त्यासाठी पावसाळ्यात रुद्रावतार धारण करत असते.नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असा धोकादायक…

Read More

दिपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, बहुजन विकास आघाडीच्या ७० % नगरसेवकांना या निवडणुकीत धोका होऊ शकतो… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या कामाला वेग आला असून प्रभाग रचनेची कामे लवकरात लवकर हातावेगळी करण्यात येणार आहेत.ती पूर्ण झाली की राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ११५ जागांवर लढती झाल्या होत्या.आता होणाऱ्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यामध्ये आणखी काही जागा वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक तिसरी सार्वत्रिक निवडणूक ही २०२० मध्ये व्हायला हवी होती.पण कोरोना,त्यानंतर आरक्षण व प्रभागरचनेच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात गेलेले प्रकरण,त्यामुळे या निवडणूका…

Read More

दीपक मोहिते, भयावह वास्तव, आजही ग्रामीण भाग अंधारात चाचपडतोय… आपल्या देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू झाली असून लवकरच आपली अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन होईल,असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पावलोपावली सांगत सुटले आहेत.पण त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे,हे ग्रामीण भागातील स्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते.चालायला धड रस्ते नाही,प्यायला पाणी नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी- सुविधांचा अभाव,शिक्षणाचा झालेला बट्याबोळ व कृषी क्षेत्रावर सतत आदळणारी संकटे,विकासकामांच्या नावाखाली भूमीपुत्रांच्या जमिनी लुबाडणे,असे एक ना अनेक गैरप्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले दावे किती पोकळ आहेत,हे दिसून आले आहे. मुंबई शहरापासून अवघ्या साठ की.मी.अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना…

Read More

सचिन पाटील,विरार दोनघर येथे टॉयलेटचा उदघाट्न सोहळा संपन्न, जिल्हा परिषद शाळा दोनघर येथे टॉयलेट अनावरण सोहळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर टॉयलेट रोटरी क्लब ऑफ अमारा,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण,आशलंड कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे टॉयलेट बांधण्यात आले.त्याचा अनावरण सोहळा आज दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी अमारा क्लबच्या सुरेखा सदलापूरकर मॅडम,नडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता पवार मॅडम राहुल खिसतराव,भारती नाकवा,राजश्री आहेर,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे बिजू उन्नीथान,कैलास देशपांडे, धीरेंद्र प्रतापसिंग,आशलंड कंपनीचे रजनी भट,सुजय परांजपे , विकास कातकीकर,प्रियांका विचारे,सुनील पाटील,भगवान खंडवी,हे मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विशे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.केंद्रप्रमुख संगीता पवार, बिजू उन्नीथान,सुजय…

Read More

जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न, कै.वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त, पंचायत समिती,जव्हार येथे कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” कृषी दिन,” उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत कृषी दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व विशद केले आणि कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमात सुनील कामडी (रा.डेंगाची मेट) यांना ” वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१७ (आदिवासी गटात प्रथम क्रमांक)” प्राप्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या हस्ते शाल,रोप व प्रमाणपत्र देऊन…

Read More

सुरेश काटे,तलासरी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीने तलासरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल होऊन आरोपी तरुणांस अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात राहत असून त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक शोषण केले. पीडित तरुणीने लग्नाबाबत आरोपी तरुणांस विचारणा केली असता,त्याने लग्नास नकार देऊन पीडितेसह तरुणीच्या आई वडिलांस शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली.याप्रकरणी सदर पिडीत मुलीने तलासरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द नोंदवताच…

Read More