सचिन पाटील,विरार
दोनघर येथे टॉयलेटचा उदघाट्न सोहळा संपन्न,
जिल्हा परिषद शाळा दोनघर येथे टॉयलेट अनावरण सोहळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर टॉयलेट रोटरी क्लब ऑफ अमारा,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण,आशलंड कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे टॉयलेट बांधण्यात आले.त्याचा अनावरण सोहळा आज दिमाखात संपन्न झाला.
याप्रसंगी अमारा क्लबच्या सुरेखा सदलापूरकर मॅडम,नडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता पवार मॅडम राहुल खिसतराव,भारती नाकवा,राजश्री आहेर,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे बिजू उन्नीथान,कैलास देशपांडे, धीरेंद्र प्रतापसिंग,आशलंड कंपनीचे रजनी भट,सुजय परांजपे , विकास कातकीकर,प्रियांका विचारे,सुनील पाटील,भगवान खंडवी,हे मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विशे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.केंद्रप्रमुख संगीता पवार, बिजू उन्नीथान,सुजय परांजपे, सुरेखा सदलापूरकर,राहुल
खिस्मतराव यांनी आपल्या मनोगतातून टॉयलेटची आवश्यकता याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर शाळेसाठी पीओपी करून देण्याचे कबूल केले तसेच शाळेच्या भौतिक सुविधा जितक्या पूर्ण करता येतील,त्या करण्याचा प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.प्रदीप चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.कविता भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

