सुरेश काटे,तलासरी
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण,
लग्नाचे आमिष दाखवून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीने तलासरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल होऊन आरोपी तरुणांस अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात राहत असून त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक शोषण केले.
पीडित तरुणीने लग्नाबाबत आरोपी तरुणांस विचारणा केली असता,त्याने लग्नास नकार देऊन पीडितेसह तरुणीच्या आई वडिलांस शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली.याप्रकरणी सदर पिडीत मुलीने तलासरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द नोंदवताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुण अतुल चंदर मेऱ्या यास अटक केली.

