Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विकासकामांना वेग, अर्नाळा किल्लावासीयांची मुख्य समस्या मार्गी लागण्याची शक्यता, वाहतुकीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अर्नाळा किल्लावासीयांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात,यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न चालवले आहेत.अनेक वर्षांपासून अर्नाळा किल्ला गाव ते अर्नाळा गाव दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात यावा,अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाकडे लावून धरली आहे.या महत्वाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे,काही तांत्रिक कारणामुळे मात्र हे काम अनेक वर्षे रखडले आहे.या प्रकरणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात आल्यानंतर आ.दुबे यांनी संबधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवून घेतली व मुख्यमंत्री कार्यालयाशी त्वरीत पत्रव्यवहार सुरू केला आहे.लवकरच या विषयी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा तिढा लवकरात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा सुरु, ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच,भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “ रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल,तुम्ही तयार आहात का ? ” असे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.नाईक यांच्या विधानाला शिवसेना ( शिंदे गट ) खा. नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पक्ष बैठकीत बोलताना गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी “ नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता…

Read More

दीपक मोहिते, शिंदे गट सक्रिय, मनोर / पालघर येथे शिंदे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची “ संघटनात्मक बैठक,” काल उद्योगमंत्री उदय सामंत, पालघर जिल्हा संपर्कमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व हमी, फलोत्पादन,खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले व पालघर जिल्हासंपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच,पक्षाची आगामी राजकीय दिशा,पक्ष संघटनेची नव्याने रचना, प्रभावी जनसंपर्क आणि संवाद,प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अधिक सक्रिय कशी राहील,विकास आणि जनसेवा या प्रमुख मुद्द्यांसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या…

Read More

वाडा प्रतिनिधी, शून्य प्लास्टिक मोहिमेमध्ये शिक्षक व विद्यार्थी सहभागी, वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतने शून्य प्लास्टिक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये चिंचघर गावातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यामुळे शून्य प्लास्टिक मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यात ग्रामपंचायतला मदत होणार आहे. वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असून सुक्या कचऱ्यातून मिळालेले प्लास्टिक पुनर्रप्रक्रियेसाठी पाठवले जाते, पुनर्रप्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या विविध दैनंदिन वापराच्या वस्तू ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वापरण्यात येत आहेत.या प्रकल्पामुळे चिंचघर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत झाली आहे.ग्रामपंचायतच्या या प्रकल्पाला सी.ए.सी.आर.व ई.पी.एल.या स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. यावर्षी या संस्थांनी चिंचघर ग्रामपंचायतच्या सोबतीने गावात…

Read More

जव्हार प्रतिनिधी जव्हार येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद पालघर तथा पंचायत समिती जव्हार यांच्यातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह, जव्हार येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा गटविकास अधिकारी,पंचायत समिती जव्हार हे होते.यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रतिनिधी,सरपंच महिला प्रतिनिधी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संचालक,स्वदेश फाऊंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सदर अभियानाची पार्श्वभूमी,उद्दिष्टे, विविध घटक,अभियानाचा कालावधी तसेच अभियान दरम्यान ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांनी पार पाडावयाच्या भूमिका,…

Read More

वाडा प्रतिनिधी वाड्यात भात लागवडीवर “बगळ्या,” रोगाचा प्रादुर्भाव, यंदा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता.भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संकटामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून आहे.येथे मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे उत्पादन घेतले जात असून वाडा कोलम तांदुळ देशभरात नावारूपाला आला आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुका कृषी विभागाने शेतक-यांना मदतीच्या दृष्टिकोनातून गावा- गावातील बाधित शेतकऱ्यांची तात्काळ माहिती घेऊन त्यांना…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.७, ” ओरबाडून खाणे,” हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवण्यात आला, काल निवडणूक शाखेने प्रभाग रचनेवर आलेल्या १६० हरकतीवर सुनावणी नुकतीच पार पाडली.या सूनावणीमध्ये किती हरकतीचा निपटारा करण्यात आला. याविषयीची माहिती अद्याप प्रसिद्ध झाली नाही.मात्र तिचा रीतसर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.प्रभाग रचना व आरक्षण,ही महत्वाची कामे हातावेगळी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.मात्र हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे असून या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील.अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता जरी असली तरी राज्य निवडणूक आयोगाने…

Read More

दीपक मोहिते, भारताने सावध व्हायला हवे, नेपाळची वाटचाल अराजकाच्या दिशेने… नेपाळमध्ये जे काही सध्या घडत आहे,ते बाहेरच्या शक्ती दक्षिण आशियाई देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे.१७ वर्षांपूर्वी नेपाळी जनतेने लोकशाही व्यवस्था स्विकारली,पण या काळात नऊ पंतप्रधान आले आणि गेले देखील,या पंतप्रधानाच्या काळात देशात लोकशाही रुजू शकली नाही.चीन व अमेरिकेने वेळोवेळी नेपाळमध्ये कारवाया केल्या.आज या देशात जे काही घडतंय,त्यामागे कोण आहे ? हे यथावकाश बाहेर येईलच. दक्षिण आशिया खंडात भारत वरचढ होऊ नये,यासाठी अमेरिका व चीन हे दोन्ही देश गेल्या काही वर्षांपासून चांगलेच सक्रिय झाले आहेत. चीन,हा आशिया खंडातील छोट्या देशांना अर्थपूरवठा करून कमकुवत करत आहे. तर अमेरिका हा…

Read More

सुहास करंदीकर,मुंबई ” अमृताच्या जणु ओंजळी,” पुस्तकाचे शानदार सोहोळ्यात प्रकाशन, काल दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले येथे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथितयश प्रकाशन संस्था, डिंपल पब्लिकेशन, जीवनगाणी आणि स्वरगंधार या तीन संस्थाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून,त्यांच्या आयुष्यातील सांगितिक प्रवासावर,प्रकाश टाकणारे पुस्तक, “अमृताच्या जणू ओंजळी” हे डिंपल पब्लिकेशनतर्फे व सांस्कृतिक मंत्री आशिश शेलार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. रसिकमान्य संगीतकार,श्रीधर सुधीर फडके यांच्या जीवनातील संगीताच्या टप्प्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे शब्दांकन, सुकन्या जोशी,या हरहुन्नर निवेदिका व लेखिकेने केले आहे.सदर पुस्तक…

Read More

दीपक मोहिते, तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न, सदर कार्यशाळा पालघर विधानसभा आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,राजन पाटील, गटविकास अधिकारी पालघर काळभोर,ग्राम विकास अधिकारी,सरपंच,उपसरपंच, यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यशाळेत लोकाभिमुख सक्षम पंचायत,पंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण,मनरेगा तसेच ग्रामविकास स्तरावरील योजनांची प्रभावी अंमलबजावणी,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली ग्रामपंचायत समृद्ध करणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वच्छ गाव,सुंदर व समृद्ध गाव, योजनेतून विकसित आणि विकसनशील ग्रामपंचायत निर्माण करण्याकरिता नियोजन करावे,असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यशाळेस लक्षणीय उपस्थिती होती.

Read More