दीपक मोहिते,
विरार,वसई व नालासोपारा पश्चिम भागातील अनधिकृत इमारतीवरही कारवाई करा…
वीस दिवसांपूर्वी विरार पूर्व भागात इमारत कोसळून १९ रहिवासी मृत्यूमुखी पडल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले व अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेला चांगलाच वेग आला. गेल्या वीस दिवसात प्रशासनाने लाखो फुटाचे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पूर्व भागातील चाळमाफियाची बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत, तालुक्याच्या पश्चिम भागात ज्या बिल्डर्सनी अतिरिक्त अनधिकृत मजले आपल्या इमारतीवर बांधले आहेत, त्यावर मात्र निष्कासनाची कारवाई करण्यात येत नाही. या अशा अनधिकृत मजल्यांची सखोल चौकशी व्हावी,व या बिल्डर्सवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आले असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य,चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.या पथकाने सध्या जोरदार मोहीम उघडली आहे.
प्रभाग समिती ए,हद्दितील भेडा चाळ गावठन रोड,विरार प.अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ४५० चौ.फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले आहे.
प्रभाग समिती – बी, हद्दितील निळकंठ इमारत,बजरंग नगर, मोरेगाव तलावा जवळ, नालासोपारा प. व असीमा इमारत,मोरेगाव तलावाजवळ अति धोकदायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३ हजार २०० चौ.फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले.
प्रभाग समिती – सी,हद्दितील वनोठा पाडा, पेल्हार, चंदनसार,कुंभार पाडा व सर्वे नं. ७०,वृंदावन इमारत क्र.३, सहकार नगर येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ४ हजार २०० चौ.फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले आहे.
प्रभाग समिती – ई, हद्दितील हनुमान नगर,नालासोपारा प. येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १ हजार ४०० चौ.फुट बांधकाम या पथकाने तोडले आहे.
प्रभाग समिती – एफ,हद्दितील गधा पाडा,वसई फाटा,पेल्हार व संतोष भवन,शिवम इमारत येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ४ हजार ६५० चौ.फुट
बांधकाम उध्वस्त करण्यात आले आहे.
प्रभाग समिती – जी,हद्दितील केटी इंडस्ट्रिजचे बाहेरचे पत्र्याचे शेड,गोलानी नाका,वालीव व सातिवली खिंडीच्या बाजूला व नाईक पाडा,सर्वे नं.६६,वालीव येथे अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ९ हजार ७०० चौ.फुट बांधकाम तोडण्यात आले आहे.
प्रभाग समिती – एच,हद्दितील दीपांजली इमारत, एच – १ ए व बी विंगच्या व न्यु धनराज इमारत,अंबाडी रोड, वसई प. येथे अतिधोकादायक बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरु असून १४ हजार ७६० चौ.फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले.
प्रभाग समिती – आय, हद्दितील अनिमा इमारत, मुसाजी गल्ली,वसई प. येथे अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण १२०० चौ.फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसात या पथकाने लाखो चौरस फुटाची अनधिकृत बांधकामे उध्वस्त केली आहेत.

