दीपक मोहिते,
बदल हवा,पण तो व्यवस्थेला मारक असता कामा नये,
बातम्याचे हेडिंग वाचकांच्या मनाला भावेल,असे करणे,ही पण एक कला आहे,पूर्वीची जुनी माणसे यामध्ये तरबेज होती.काळ जसजसा बदलत गेला,तसे सारं काही बदलत गेले.पूर्वी पत्रकारितेला “” आदर्श पत्रकारिता,” असे गोंडस नांव होते,हल्ली त्या पत्रकारीतेचे बारसं होऊन ” गोदी मिडिया,” असे नामकरण झाले आहे. ” बदल ही काळाची गरज असते.” असे म्हंटले जाते,पण हा बदल आता लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणारा आहे,हे आपण विसरत चाललो आहोत.
जयंतराव साळगावकर आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे एकाच दिवशी निधन झाले ( अर्थात एक नैसर्गिक आणि दुसरे आपण जाणतोच ) दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये हेडिंग,काळ निर्णय आणि काळ निर्दय
काही बातम्यांचे मथळेच लक्ष खेचक असतात…
उदा…
खूप वर्षांपूर्वी,एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते…
*” तिच्या भाळी,जन्म आभाळी,”
वजनात मारणे,हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्कच असतो.त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं..
” मापात पाप,” करणार्यांना चाप..!
काही वर्षांपूर्वी मुंबई पावसात तुंबली.
बातमीचं हेडिंग होतं…
” तुंबई,” !
एका बातमीचं हेडिंग भारी वास्तव वाटलं…
” अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक,”
खूप वर्षापूर्वी छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने महापौर असताना त्यांना सनसनाटी गोष्टी करायला फार आवडत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी हेलिकाॅप्टरमधून मिरवणूकीतून वाजतगाजत जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी केली.दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे हेडिंग होते,
मानवाची आकाशातून देवांवर पुष्पवृष्टी,
असेच एक आठवणीतलं हेडिंग आठवलं…
” जीव वाचवण्यासाठी पळताना,
” खड्ड्यात पडून मृत्यू,” !
सौरभ गांगुली ( डावखुरा ) आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी भागीदारी केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली…
लोकसत्तेच्या मुख्य पानाचे हेडिंग होते…
” डाव्यांचा तडाखा,” !
काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचण्यात यायच्या…सहाजिकच,साक्षी,पुरावे,उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.त्याच काळात,एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती…
” नाम्या,बगतूस काय ? घाल गोळी, ” !
राहुल द्रविडच्या निवृत्ती वेळी,
एका इंग्रजी दैनिकाचा अप्रतिम मथळा होता…
‘Indian team is now bread n butter
” but without जममय,”
भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली,तेव्हाचा एक अप्रतिम मथळा…
” चारले खडे,आता वानखेडे,”
*मटा ऑनलाइन मथळा…
” पतंजली कोलगेटचे दात पाडणार,” !
हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…
गोव्यात ” पाळी,” नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी ” पाळी, ” हा एक मतदारसंघ होता.निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले होते.त्यांनी मोठा मेळावा घेतला होता.धडाकेबाज भाषणे झाली.गोव्यातील एका नामांकित मराठी दैनिकाने दुसऱ्या दिवशी आपल्या बातमीला हेडिंग दिले…
” डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडवणार, ” !*
( बोंबला…! )
वादग्रस्त खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तो कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्याचे मित्र पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून आठवणीत आहे…
” खैरनार देवनारचे पवनार करणार, ” !
या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्याच वर्षांपूर्वी दिली होती.मुंबईत काही वर्षांपूर्वी प्रचंड पाऊस झाला.अलीकडच्या काळातील २६ जुलैसारखाच.सारी मुंबई ठप्प झाली होती.लोकसत्ताची त्यावेळी हेडलाईन होती…
” मुंबापुरीवर जलात्कार, ” !!
२००४ साली अटल सरकारचा पराभव करुन काँग्रेस बहुमताने जिंकली होती.त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं…
” King Cong… Queen sonia,” !
( अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं,हा भाग वेगळा. )
बुटासिंग २००५ मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती.त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनवण्यापासून रोखले होते.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते.तेव्हा एक शीर्षक होते ( बहुधा ” सामना,” चे )…
सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला
” बुटा,” ने हाणले,”!
मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते,तेव्हा लोकमत की कुठल्याशा वर्तमानपत्राने बातमी दिली होत,त्याचे हेडिंग होते…
” तांबेचं पितळ उघडं, ” !
मे,२०१४ मध्ये,निवडणूक निकालानंतर,लोकसत्ताच्या मुख्य बातमीचे हेडिंग होते…
” हाताची घडी,कमळावर बोट,” !
नवाकाळचे एक हेडिंग…
तेव्हा जयसूर्या जबरदस्त फॉर्मात होता आणि आपण मॕच जिंकलो होतो.
” श्रीकांतने जयसूर्याला गिळले, ”
भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली ..
“श्रीलंकेत हनुमान जयंती,” !
*अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट!*
इंग्लंडमध्ये एक क्रिकेट सामना झाला होता.
अगदीच स्थानिक पातळीवरील! म्हटला तर विशेष असे काहीच नव्हते.
सारे खेळाडू,पंच – भारतीय ! आडनाव – पटेल!
महाराष्ट्र टाइम्सचे शीर्षक होते,
” पटेल,न पटेल,! सारेच पटेल,” !!

