- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जिल्हा परिषद/ पंचायत समिती,रणसंग्राम,वाडा तालुका, वाड्याचा गड महायुती राखणार… २००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत वाडा तालुक्याचा काही भाग भिवंडी तालुक्याला जोडला गेला.त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाले.सध्या या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ०६ गट आहेत तर पंचायत समितीचे १२ गण आहेत. वाडा तालुका हा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात आहे.तसेच भातपिकासोबत नागली व रब्बी हंगामात विविध पिके घेण्यात येत असतात.८० ते ९० % भूमिपुत्र शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने औद्योगिकरणाला चालना दिली,त्यानंतर काही गावात ” डी,” झोन अस्तित्वात आले.पण कामगार संघटनांचा…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१८, प्रभाग क्र.१८ हा सर्वात गलिच्छ प्रभाग,प्रचंड प्रमाणात अनधिकृत चाळींचे सुळसुळाट, या प्रभागात केवळ आणि केवळ अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट असल्याचे पाहायला मिळते.हे जे अनधिकृत बांधकामाचे अमाप पीक आले आहे,त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींची ” अर्थपूर्ण निष्क्रियता,” जबाबदार आहे.या अशा प्रभागात स्थानिक भूमिपुत्र अल्पसंख्यांक होत गेला तर मुस्लिम व उत्तर भारतीय समाज बहुसंख्यांक झाला आहे.या लोकांनी वन,आरक्षित जमिनीवर सरसकट अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या.त्यामुळे प्रभागाला बकाल स्वरूप आले आहे.रस्ते व गटारे नसताना चाळमाफियांनी सरसकट चाळी बांधल्या.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अनधिकृत बांधकामांना वीज व पाणी या दोन्ही नागरी सुविधा उपलब्ध होत गेल्या.यावरून या महानगरपालिका व महावितरण विभागात भ्रष्टाचाराची पाळमुळे…
वाडा प्रतिनिधी, हजारो गरीब कुटुंबे मोफत योजनांपासून वंचित गेल्या १८ वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे न झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी,ग्रामीण आणि दुर्गम भागात अंत्यत हलाखीचे जीवन जगत असलेल्या हजारो कुटुंबियांना त्याचा फटका बसला आहे.१८ वर्षापुर्वी दारिद्र्य रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही, तर या यादीतील काही कुटुंबे,आज जी कुटुंबे सधन झाली असुन ते अद्याप शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. २००७ साली शासनातर्फे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला होता.यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेल्या वाडा, जव्हार,विक्रमगड,मोखाडा या चार तालुक्यात ६५ हजाराहुन अधिक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत होते.गेल्या १६ वर्षात या ६५…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१७, बहुजन विकास आघाडीसमोर प्रभाग टिकवण्याचे मोठे आव्हान, नालासोपारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पसरलेल्या या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात असंख्य लोडबेअरिंग इमारती ( अनधिकृत ) उभ्या राहिल्या,त्या कोणी बांधल्या ? या अनधिकृत इमारतींना वीज व पाणी कसे मिळाले ? त्याबदल्यात महानगरपालिकेला घरपट्टीच्या स्वरूपात किती महसूल मिळाला ? व या प्रभागात असंख्य इमारतींना शास्ती का लावण्यात आल्या नाहीत,इ.प्रश्न गेली अनेक वर्षे अनुत्तरितच आहेत आणि त्याची उत्तरे पुढेही मिळणार नाहीत.कारण या गोरखधंद्यात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व अधिकारी आखंड बुडाले आहेत.महानगरपालिकेचे पाणी काही लोकप्रतिनीधीच कसे विकतात ? याविषयीचे मजेदार किस्से या प्रभागात ऐकायला मिळतात. असो,या…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक २०२५,- रणसंग्राम,पालघर तालुका, जिल्हा परिषद निवडणूक ; भाजप,सेनेचा पालघरचा गड भेदणार… पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांपैकी पालघर – १७,डहाणू – १३ या दोन तालुक्यात एकूण ३० जागा आहेत.या दोन्ही तालुक्यातील जागांवर जो राजकीय पक्ष विजयी होतो,तो जिल्ह्यावर आपली हुकूमत चालवतो. कारण या दोन्ही तालुक्यात एकूण जागापैकी ५१ % जागा आहेत.त्यामध्ये पालघर तालुक्यात सर्वाधिक १७ गट आहेत.पालघर तालुका हा काही किरकोळ अपवाद वगळता कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतर या तालुक्यातील ८० % पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले व हा गट सत्तेत आला.त्यांच्या गटाचे प्रकाश…
दीपक मोहिते, ” वाढती गुंडगिरी, ” त्र्यंबकेश्वरच्या टोलवरील गुंडाची दहशत,पत्रकारांना जबर मारहाण, त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच,म्हणावा लागेल. याप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.याप्रकरणी सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी मागणी राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटनानी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधूमहंताची आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होती,त्या बैठकीचे कव्हरेज करण्यासाठी नाशिक येथील काही पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.मात्र हे पत्रकार येथे आल्यानंतर त्यांना टोलवरील कर्मचाऱ्यांनी त्याना अडवले व टोल भरावा लागेल,असे सांगितले. त्यावरून पत्रकार व टोलच्या कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला.आम्ही…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१६, या प्रभागात भाजप व बविआ अशी सरळ लढत होण्याची शक्यता… प्रभाग क्र.१६ हा मध्यमवर्गीयांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.या प्रभागात सुमारे सातशे ते आठशे गृहनिर्माण संस्था आहेत.नगरपरिषदेच्या काळात या प्रभागात असंख्य बांधकामे उभी राहिली.त्याकाळी या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना केवळ टँकरच्या पाण्याचा आधार होता.महिन्याकाठी रहिवाश्याना त्यासाठी हजारो रु.ची पदरमोड करावी लागत असे.नागरी सुविधांचा दुष्काळ असताना नगरपरिषदेने सरसकट बांधकाम परवानग्या दिल्या.त्यामुळे हजारो सदनिकाधारकाना अनेक वर्षे मरणयातना भोगाव्या लागल्या व आजही ते भोगतच आहेत.विविध जाती – धर्माचे लोक या प्रभागात वास्तव्याला आहेत.पण त्यांना अनेक अडचणी व नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत इमारती मोठ्या संख्येने आहेत.पण कुतूहलाची…
दीपक मोहिते, ” निवडणूक खबरबात,” बविआ व महाविकास आघाडी यांचे एकत्र येणे,भाजपच्या पथ्यावर पडणार… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले असले तरी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप सावध भूमिका घेत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणारी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी हे दोन्ही पक्ष सध्या जपून पावले टाकत आहे.भाजप मात्र अधून मधून स्वबळाचा नारा देत लोकांचा कल कुठे आहे ? याचा अंदाज घेत असतो.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य लक्षात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच दूर करा,अन्यथा… सार्वजनिक जीवनात वावरताना नेतेमंडळींनी सामाजिक भान राखण्याची गरज असते,पण हल्ली महायुतीच्या नेत्यांना त्याच्याशी वावडे असल्याचे आजवर घडलेल्या अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे जत विधानसभेचे आ.गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.त्यांच्या या टिकेनंतर राज्यभरात त्याचे जोरदार पडसाद उमटले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यानंतर फडणवीस यांनी अतिशय सौम्य शब्दात पडळकर याना ” अशाप्रकारची टीका करणे,योग्य नाही व यापुढे असे घडता कामा नये,” असे स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पं.स.निवडणूक रणसंग्राम – विक्रमगड, विक्रमगडच्या निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहणार, तलासरी व डहाणू तालुक्याप्रमाणे विक्रमगड तालुका देखील आदिवासीबहुल तालुका आहे.त्यामुळे या तालुक्यालाही आदिवासी दर्जा मिळाला आहे.या तालुक्याचा बराचसा भाग जंगल,डोंगर व दऱ्या खोऱ्याने व्यापलेला आहे.या तालुक्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार मी.मी.पाऊस पडतो.येथील स्थानिक भूमिपुत्र हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत व त्यांचे भातपिक हे प्रमुख पीक आहे.तसेच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी पिके घेण्यात येतात.२६ जाने.२००२ साली या तालुक्याची निर्मिती झाली,मात्र या तालुक्याने गेल्या २३ वर्षात कात टाकली नाही.या काळात जनतेच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही.त्यामुळे आजही हजारो कुटुंबे दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत पाहायला मिळतात.सरकारची उदासीनता…
