Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात भाजपकडून ” घरचा आहेर,” अजित पवार गट व भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे.सिंदखेडराजाचे आ.शिंगणे हे पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.मी नाईलाजास्तव अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे त्यांनी नुकतेच माध्यमांना सांगितले.त्यानंतर अवघ्या आठ तासात आ.पंकजा मुंडे यांच्या जवळच्या समर्थकांनी मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे.त्यामुळे लवकरच अनेक जण महायुतीला राम राम ठोकून परतीच्या प्रवासाला लागतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय वातावरण महायुतीला पोषक नाही,हे लक्षात घेऊन महायुतीचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्ते आता ” सुबहका भुला,शामको घर लौटा,” च्या तयारीत आहेत. अजित पवार गटाला सोबत घेतल्यापासून महायुतीमध्ये सुंदोपसुंदीला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लाडक्या बहिणी,लबाड भावंडाना ओवाळतील असे वाटत नाही… राज्यात ” मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी,” योजनेचा सध्या प्रचंड डंका पिटण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,हे तिघे राज्यातील इतर सर्व प्रश्न संपल्यात जमा असल्याच्या आवेशात या योजनेच्या प्रचारात उतरले आहेत.ही योजना पुढेही चालू राहणार,उलट बहिणींना मिळणाऱ्या रकमेत आणखी वाढ होणार आहे,मात्र त्यासाठी बहिणींनी आम्हाला पुन्हा संधी दिली पाहिजे,बटन दाबले पाहिजे,असे कोकलत सुटले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी तर बहिणीच्या हिताच्या आड येणाऱ्यांना जोडा दाखवा,असे आवाहन केले.एक मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर येऊन अशाप्रकारचे बेलगाम वक्तव्य करतो,हे राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.तर फडणवीस हे ” बहिणींच्या अर्जावर विरोधकांनी…

Read More

वसई, वसई येथे परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे घोंगडे खूप वर्षांपासून भिजत पडले होते.या प्रश्नी वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागला. १५ वर्षांपूर्वी नव्याने विरार पूर्व भागात सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जागा अपुरी पडत होती. दररोज हजारो नागरिक आपली वाहने घेऊन विरारच्या कार्यालयात विविध कामासाठी येत असतात,त्यामुळे अवघ्या तीन वर्षात सदर जागा अपुरी पडू लागली.त्यानंतर हे कार्यालय वसई येथे व्हावे,अशी मागणी होऊ लागली.या सर्व घडामोडीनंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडला.त्यांच्या प्रयत्नाला यश आले.वसई पूर्व भागात जागा उपलब्ध करण्यात आली.काल त्याचे भूमिपूजन पार पडले.या समारंभास पालकमंत्री रविंद चव्हाण,खा.डॉ…

Read More

दीपक मोहिते, वास्तव, पाण्याच्या शोधात बिबट्यांचा शहरी भागात मुक्तवावर, गेल्या काही वर्षात बिबट्याचा मनुष्यवस्तीमध्ये मुक्त वावर सुरू झाला आहे.मध्यंतरी भाईंदर,चेना ब्रिज व आता वाडा तालुक्यात काही बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला. एरवी बिबट्यांचे दर्शन दुर्लभ असताना हे बिबटे डोंगर कपारी व जंगलातून खाली का उतरू लागले आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पर्यावरण,प्रदूषण व मानवाचा हव्यासपणा,अशी तीन कारणे या ज्वलंत प्रश्नाच्या मागे असल्याचे दिसून आले आहे.जंगलपट्टी मध्ये वाढत असलेल्या झोपडपट्ट्या,जंगलातील वृक्षांची बेसुमार कत्तल व डोंगर पोखरून होणारी माती चोरी आदी कारणांमुळे हिंस्त्र श्वापदे आता जंगलाबाहेर पडू लागली आहेत.जंगलातील पाण्याचे साठे आटले असून ही श्वापदे पाण्याच्या शोधात शहरात फिरू लागली आहेत.जंगलात मानवाचा…

Read More

पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- रविंद्र चव्हाण, डहाणू, काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.कांबळगाव येथील आश्रमशाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली,त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या सोबत पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खा.डॉ.हेमंत सवरा आदी मान्यवर होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी होत्या.जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या तक्रारीसदर्भात माहिती जाणून घेतली,असे पालकमंत्री चव्हाण यांनी…

Read More

पालघर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, आज पालघर जिल्हा ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने,” चा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री पालघर रविंद्र चव्हाण यांनी आभासी पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर,महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाभरातून जवळपास २ हजार महीला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ज्या महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत,त्यांना प्रतिनिधिक स्वरूपात अधिक स्वरूपात धनादेशाचे…

Read More

दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा फासणारी घटना, रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या प.बंगालच्या राजधानीत आर.जी.कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेतील संजय रॉय या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असली तरी तपासात पोलीस व रुग्णालय प्रशासन लपवालपवी करत असल्यामुळे देशाच्या शहरात डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत.या ट्रेनी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस व रुग्णालय प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन कोलकत्ता उच्च न्यायालयाने सदर प्रकरण सीबीआयकडे सोपावण्याचा आदेश दिला आहे.दरम्यान पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे.सीबीआय आता सामूहिक बलात्कार झाला का ? या घटनेत एकूण…

Read More

दीपक मोहिते, राजकारणातील सभ्य व्यक्तिमत्व ; आर.आर.पाटील, काल आर.आर.उर्फ आबा पाटील यांची जयंती होती.पण यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम झाल्याचे कानावर आले नाही.राजकारणातील एक सभ्य व अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आबांचा राजकीय मंडळींना विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे. सांगली जिल्ह्यातील अंजनी,तासगाव येथे १६ ऑगस्ट १९५७ रोजी जन्माला आलेल्या आबांनी तरुणपणी राजकारणात प्रवेश केला व अल्पावधीत यशाची एकेक शिखरे सर केली.ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते.१९९० साली तासगाव-कवठेमहांकाळ मधून ते विधानसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती.महत्वाच्या प्रश्नावर शरद पवार हे त्यांच्याशी कायम सल्लामसलत करत असत.उपमुख्यमंत्री,गृहमंत्रीम्हणून त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, राजकारणातील सभ्य व्यक्तिमत्व ; आर.आर.पाटील, काल आर.आर.उर्फ आबा पाटील यांची जयंती होती.पण यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम झाल्याचे कानावर आले नाही.राजकारणातील एक सभ्य व अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आबांचा राजकीय मंडळींना विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे. सांगली जिल्ह्यातील अंजनी,तासगाव येथे १६ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या आबांनी तरुणपणी राजकारणात प्रवेश केला व अल्पावधीत यशाची एकेक शिखरे सर केली.ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते.१९९० साली तासगाव-कवठेमहांकाळ मधून ते विधानसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती.महत्वाच्या प्रश्नावर शरद पवार हे त्यांच्याशी कायम सल्लामसलत करत असत.उपमुख्यमंत्री,गृहमंत्रीम्हणून त्यांनी अनेक…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष, काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,झारखंड,जम्मू- काश्मीर व हरियाणा या चार राज्यापैकी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जम्मू-काश्मीर राज्यात १८,२५ सप्टें व १ ऑक्टो.अशा तीन टप्यात मतदान होणार आहे.तर हरियाणा राज्याची निवडणूक १ ऑक्टो.रोजी पार पडणार आहे.या दोन्ही राज्याच्या निवडणुकीची मतमोजणी ४ ऑक्टो.रोजी करण्यात येणार आहे.उर्वरीत महाराष्ट्र व झारखंड राज्याची निवडणूक ऑक्टो.महिन्यात होईल,असा अंदाज आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे.३७० कलम हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.त्यामुळे या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.२०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सोबत आघाडी करून सरकार बनवले होते.कालांतराने…

Read More