दीपक मोहिते,
दिल्ली पोलिसांनी अल कायदा संघटनेच्या ११ जणांना केले जेरबंद,
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे.पोलिसांनी अल कायदाच्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून ११ संशयितांना अटक केली आहे.तर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अल कायदाच्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून ११ संशयितांना अटक केली आहे,तर सुमारे अर्धा डझन लोकांची चौकशी सुरू आहे.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजस्थान,झारखंड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अल कायदा मोड्यूलमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी ६ जणांना राजस्थानमधील भिवडीतून, ४ जणांना रांचीतून,एकाला हजारीबागमधून आणि ४ जणांना यूपीतील अलीगढमधून ताब्यात घेण्यात आले आहे.यापैकी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींची ओळख पटली असून या मॉड्यूलचे नेते डॉ. इश्तियाक अहमद आहेत,ते रांची येथील एका प्रसिद्ध रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत होते. उर्वरित आरोपींची नावे मोतीऊर,रिजवान,मुफ्ती रहमतुल्ला आणि फैजान अहमद अशी आहेत,हे सर्वजण झारखंडचे रहिवासी आहेत.हसन अन्सारी,उन्कामुल अन्सारी,अल्ताफ अन्सारी, अर्शद खान,उमर फारूख, शाहबाज अन्सारी हे राजस्थानमधील भिवंडी येथील अन्य आरोपी आहेत. यातील बहुतांश आरोपी झारखंडमधील हजारीबाग आणि रांची येथील रहिवासी आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला डॉ. इश्तेयाक विषयी गुप्त माहिती मिळाली होती.डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी व त्याच्या मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची झडती घेतली असता,या मॉड्यूलची माहिती पोलिसाना मिळाली.या मॉड्यूलशी संबंधित सर्व दहशतवादी सोशल मीडिया ॲप टेलिग्रामच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले असल्याचे तपासात समोर आले आहे.त्याने अनेक गट देखील तयार केले होते,ज्यात काही सदस्य पाकिस्तान,अफगाणिस्तान आणि इतर अरब देशांचे होते.
या मॉड्यूलला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी हजारीबाग येथून पकडलेल्या फैजानची होती.
त्याने शारीरिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त मॉड्यूलमध्ये उपस्थित संशयितांना वेगवेगळी शस्त्रे वापरण्याचे आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले. झारखंड,उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या जंगलात हे प्रशिक्षण देण्यात येत होते.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या घराच्या आवारात छापा टाकून एके-47 रायफल,एक.38 बोअर रिव्हॉल्व्हर,.38 बोअरची ६ जिवंत काडतुसे,.32 बोअरची ३० जिवंत काडतुसे,एके-47 ची ३० जिवंत काडतुसे,एक डमी इन्सास,एक एअर रायफल व अन्य साहित्य जप्त केले आहे.

