दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
” स्वच्छ भारत अभियान,” आता इतिहासजमा
२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्या आल्या दोन उपक्रम जाहीर केले.एक ” स्वच्छ भारत अभियान ” व दुसरं ” काँग्रेस मुक्त भारत,” मात्र हे दोन्ही उपक्रम त्यांना यशस्वीपणे राबवता आले नाहीत.
“स्वच्छ भारत अभियाना ” ची नौटंकी आता जवळपास इतिहास जमा झाली आहे.सुरुवातीच्या काळात अनेक मंत्री,खासदार व आमदार सकाळच्या रामप्रहरी गल्लीबोळात झाडू घेऊन फिरताना पाहायला मिळत असत.पण आता तसे चित्र पाहायला मिळत नाही.वास्तविक हे अभियान देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असे होते.पण या अभियानात केवळ नौटंकीच होत होती.त्यामुळे भारत स्वच्छ झालाच नाही,मात्र तुमच्या आमच्या पैश्याची मात्र प्रचंड उधळपट्टी झाली.
असो,आपल्या देशात नद्यांना देवत्व देण्यात आले आहे.पुराण काळात नद्यांची पूजाअर्चना होत असे,ती परंपरा आजही सुरूच आहे.रोज संध्याकाळी आपल्याकडे गंगाआरती होते.या गंगाआरतीचे भव्य दिव्य स्वरूप पाहण्यासाठी अधून मधून परदेशातील महत्वाचे नेते गंगाकिनारी आवर्जून भेटी देतात.ही गंगा गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रदूषित झाली आहे.ती स्वच्छ करण्याचे धनुष्य आपल्या पंतप्रधानांनी उचलले व त्यासाठी हजारो कोटी रु.ची तरतूद केली.पैसे खर्च झाले, पण आमची पवित्र गंगा स्वच्छ होऊ शकली नाही.
आता ” स्वच्छ भारत अभियान,” हळूहळू लोकांच्या विस्मरणात जाऊ लागले आहे.स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसॅडर अमिताभ बच्चन हे देखील चॅनेलच्या पडद्यावरून गायब झाले आहेत.गेल्या १० वर्षात देशातील कचऱ्याचे साम्राज्य कमी होण्याऐवजी १८ टक्यांनी त्यामध्ये वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.देशात पूर्वी दररोज दीड लाख टन कचरा जमा होत होता,त्यामध्ये १८ % ने वाढ झाली आहे,म्हणजे दररोज पावणे दोन लाख
टन कचरा निर्माण होऊ लागला आहे.

