- दीपक मोहिते,
महाराष्ट्राचे दुर्देव,
मालवण येथे शिवपुतळा कोसळला,शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप,
४ डिसें.२०२३ रोजी मालवण राजकोट समुद्रकिनारी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते.तो भव्य पुतळा आज दुपारी अचानक कोसळला.या घटनेचा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेने संताप व्यक्त केला आहे.
सुमारे ५ कोटी रु.खर्च करून उभारण्यात आलेला हा पुतळा ४३ फूट उंच होता.जमिनीपासून १५ फूट व त्यावर २८ फूट अशा पद्धतीने या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले होते.ज्या महाराजांनी राज्यात अनेक किल्ले उभारले,त्या बांधकामाची उदाहरणे देऊन गौरव केला जातो,त्या महाराजांचा पुतळा पत्याच्या बंगल्यासारखा कोसळतो,यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.अवघ्या नऊ महिन्यात पुतळा कोसळल्याची घटना घडल्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामात नित्कृष्ट बांधकाम साहित्याचा वापर झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अनेक संघटनांनी सरकारकडे केली आहे.
Trending
- आर्थिक व धार्मिक अराजक निर्माण होणे म्हणजे राज्याच्या विकासाची गती खुंटणे,
- ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या एका व्यक्तव्याने देशभरात तीव्र पडसाद,
- दहशतवादी पन्नूला सतावतेय स्वतःच्या हत्येची भिती,
- येत्या दसरा मेळाव्यात उद्धव व राज एकाच मंचावर,
- मसाला उत्पादकांमध्ये कारवाईच्या भितीने घबराट,
- टीआरपीच्या नादात बेताल वक्तव्ये ; माफी मागण्याची नामुष्की ओढवली…
- इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्ससाठी आचारसंहिता लागु करण्याचा प्रश्न विचारधीन ?
- कैसा हराया….?

