दीपक मोहिते,
युक्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला,इमारतीला ड्रोन धडकलं,
रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.आज सकाळी युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या तीन शहरावर ड्रोनच्या साहाय्याने जोरदार हल्ले चढवले.हा हल्ला अमेरिकेच्या ९/११ सारखा होता.हा हल्ला दहशतवाद्याने नाही तर युक्रेनच्या लष्कराने केला आहे.९/११ च्या हल्ल्यात दोन विमानांनी अमेरिकेतीच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या इमारतीला धडक दिली होती.त्यामध्ये सुमारे
तीन हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते.आज रशियावर झालेल्या या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकलं आहे.रशियाच्या सेराटोव्हमध्ये सर्वात उंच इमारतीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.या घटनेने रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
याशिवाय एंगेल्स शहरातही इमारतीनाही युक्रेनच्या ड्रोनने धडक दिली आहे.रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत.या शहराचे गव्हर्नर रोमन बुसारगिन यांनी सांगितलं की,३८ मजली बोल्गा स्काय निवासी परिसरातील या इमारतीला युक्रेनच्या लष्कराकडून लक्ष्य करण्यात आलं होत.या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.तीच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
अन्य दोन शहरातही ड्रोन हल्ले झाले आहेत.
गव्हर्नर बुसार्गिनच्या म्हणण्यानुसार,युक्रेनने लॉन्च केलेले ड्रोन रशियन संरक्षण यंत्रणेने रोखले होते.पण आज सकाळी पुन्हा हे हल्ले झाले. रशियाच्या साराटोव्ह प्रदेशातील दोन शहरांमध्ये घरांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. व्होल्गा स्काय इमारतीला ड्रोनने धडक दिल्यानंतर या इमारतीला एक मोठे भगदाड पडले आहे. रस्त्यावर सर्वत्र ढिगारा पसरला आहे.एंगेल्स येथील निवासी इमारतीच्या वरच्या मजल्याचंही नुकसान झाले आहे.

