दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
जम्मू-काश्मीर निवडणूक ; ” जमात,” मुळे हिंसाचार होण्याची शक्यता,
लवकरच होत असलेल्या जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.जम्मू-काश्मीर या राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भाजप,पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ( मेहबुबा मुफ्ती ) नॅशनल कॉन्फरन्स,( फारुख अब्दुल्ला ) पीपल्स डेमोक्रॅटिक आझाद पार्टी ( गुलाम नबी आझाद ) हे पाच राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देतील.पण आणखी एक कट्टर जातीयवादी पक्ष म्हणून ओळख असलेला जमात-ए-इस्लामी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे.केंद्र सरकारने दहशतवादी कारवायामधील सहभागामुळे या पक्षावर बंदी घातली आहे.त्यामुळे या पक्षाला निवडणूक लढवण्यास बंदी आहे.पण या पक्षाच्या नेत्यानी वेगळीच शक्कल लढवली असून त्याने आपल्या माजी सदस्यांना अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे.” जमात,” चे काश्मीर खोऱ्यात वर्चस्व असून त्यांच्या पक्षात तरुणवर्गाचा भरणा अधिक आहे.खोऱ्यात सुरू असलेल्या दहशतवादाला या जमातची फूस असल्याचे उघडकीस झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घातली.पण या पक्षाला पुन्हा जम्मू-काश्मीर राज्याच्या राजकारणात पुन्हा परतायचे आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपली ताकद दाखवायची आहे.जमात-ए- इस्लामी,या पक्षाला पाकिस्तानचा आशीर्वाद असून या निवडणुकीत त्यांना फंडिंग होण्याची शक्यता आहे.जमात जर मागच्या दाराने या निवडणुकीत उतरली तर मोठ्याप्रमाणावर हिंसा होण्याची शक्यता आहे.

