- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, गणेशोत्सव ; मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्यात गर्क, गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवरआला असून गणपतीच्या कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मूर्तीना रंग देण्याच्या कामात कारागीर सध्या व्यस्त आहेत.त्यासाठी त्यांनी आपले कारखाने तीन पाळ्यात सुरू ठेवले आहेत. सुबक मूर्ती,हिरे,मोती व आकर्षक रंग वापरून मूर्तीला सजवण्यात येत आहे. कारागिरांची उणीव व ग्रामीण भागात सतत होणारा विजेचा लपंडाव इ.अडचणी कारखानदारांना सतावत असल्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगावू नोंदणी कारखानदारांकडे केली आहे.७ सप्टें.पासून गणेशोत्सव सुरू होत आहे.गेल्या चार महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवाच्या भितीमुळे मुंबई -गोवा मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, कोकणातील लाडक्या बहिणी व त्यांच्या कुटुंबियाचा गणेशोत्सवासाठी होणारा प्रवास सुखद व्हावा,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लवाजम्यासह आज पनवेल ते माणगाव दरम्यान असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पळस्पे नाक्यावर दाखल झाले होते.त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे दिवस करत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले आणि रस्तेदेखील चकाचक केले.पण हे रस्ते किती दिवस टिकतील,हे मात्र सांगता येणार नाही. आज करण्यात आलेली ही कार्यवाही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. हा दौरा करताना एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार व कॅमेरामन यांना पाचारण केले होते.१५००/- रु.वाटुनही लाडक्या बहिणी…
दीपक मोहिते, युक्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला,इमारतीला ड्रोन धडकलं, रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.आज सकाळी युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या तीन शहरावर ड्रोनच्या साहाय्याने जोरदार हल्ले चढवले.हा हल्ला अमेरिकेच्या ९/११ सारखा होता.हा हल्ला दहशतवाद्याने नाही तर युक्रेनच्या लष्कराने केला आहे.९/११ च्या हल्ल्यात दोन विमानांनी अमेरिकेतीच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या इमारतीला धडक दिली होती.त्यामध्ये सुमारे तीन हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते.आज रशियावर झालेल्या या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकलं आहे.रशियाच्या सेराटोव्हमध्ये सर्वात उंच इमारतीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.या घटनेने रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय एंगेल्स शहरातही इमारतीनाही युक्रेनच्या ड्रोनने धडक दिली आहे.रशियाच्या आरोग्य…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” ” स्वच्छ भारत अभियान,” आता इतिहासजमा २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्या आल्या दोन उपक्रम जाहीर केले.एक ” स्वच्छ भारत अभियान ” व दुसरं ” काँग्रेस मुक्त भारत,” मात्र हे दोन्ही उपक्रम त्यांना यशस्वीपणे राबवता आले नाहीत. “स्वच्छ भारत अभियाना ” ची नौटंकी आता जवळपास इतिहास जमा झाली आहे.सुरुवातीच्या काळात अनेक मंत्री,खासदार व आमदार सकाळच्या रामप्रहरी गल्लीबोळात झाडू घेऊन फिरताना पाहायला मिळत असत.पण आता तसे चित्र पाहायला मिळत नाही.वास्तविक हे अभियान देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असे होते.पण या अभियानात केवळ नौटंकीच होत होती.त्यामुळे भारत स्वच्छ झालाच नाही,मात्र तुमच्या आमच्या पैश्याची मात्र प्रचंड उधळपट्टी झाली.…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” जम्मू-काश्मीर निवडणूक ; ” जमात,” मुळे हिंसाचार होण्याची शक्यता, लवकरच होत असलेल्या जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.जम्मू-काश्मीर या राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भाजप,पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ( मेहबुबा मुफ्ती ) नॅशनल कॉन्फरन्स,( फारुख अब्दुल्ला ) पीपल्स डेमोक्रॅटिक आझाद पार्टी ( गुलाम नबी आझाद ) हे पाच राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देतील.पण आणखी एक कट्टर जातीयवादी पक्ष म्हणून ओळख असलेला जमात-ए-इस्लामी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे.केंद्र सरकारने दहशतवादी कारवायामधील सहभागामुळे या पक्षावर बंदी घातली आहे.त्यामुळे या पक्षाला निवडणूक लढवण्यास…
दीपक मोहिते, वास्तव, ” खेड्यातला भारत,” कधी पाहायला मिळणार ? देशवासीयांनी नुकताच ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.हा दिवस आपल्यासाठी एक उत्सवच असतो.आपल्या पूर्वजांनी इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व झोकून दिले,लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांच्या या बलिदानानंतर तुमच्या आमच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवली.गेल्या ७८ वर्षात देशाने विविध क्षेत्रात प्रचंड भरारी घेतली.आज महासत्तांसोबत आपण स्पर्धेत उतरले आहोत.सहा महिन्यांपूर्वी आपण चंद्रावर स्वारी करू शकलो,ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.पण आजही आपल्या देशात गरीबी,बेरोजगारी व ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणे,या प्रश्नी मागासलेलेच आहोत.स्वातंत्र्योत्तर काळात विकासाचा प्रवाह केवळ शहरी भागातूनच वाहत राहीला.त्यामुळे ग्रामीण भाग कात टाकू शकला नाही. सात वर्षांपूर्वी मोखाडा…
दीपक मोहिते, सूर्यातीर, पेसा नोकरभरतीला स्थगिती ; सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, ग्रामपंचायतीच्या तरतुदी (अनुसूचित क्षेत्राचा विस्तार ) कायदा १९९६ ( पेसा ) हा २४ डिसें.१९९६ रोजी अंमलात आला.हा कायदा महाराष्ट्र,गुजरात,आंध्र प्रदेश,मध्यप्रदेश,झारखंड,ओरिसा,छत्तीसगड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व तेलंगणा अशा १० राज्यांना लागू करण्यात आला आहे.हा कायदा करण्यामागे अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास,त्यांची संस्कृती,प्रथा व परंपरा याचे संवर्धन करणे,असा उद्देश आहे.तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था अधिक बळकट करणे,हे या पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आहे.त्यासाठी अनु.क्षेत्रातील ग्रामसभेला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ ने व्यापक व विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.आपल्या राज्यात हा कायदा अहमदनगर,पुणे,ठाणे, पालघर,जळगाव, अमरावती,धुळे,यवतमाळ, नंदूरबार,नाशिक,नांदेड, चंद्रपूर…
दीपक मोहिते, शरद पवार यांनी जाळे फेकण्यास सुरुवात केली, या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व वरीष्ठ नेते शरद पवार हे दोघे अजित पवार यांना धक्के देण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटाचे खासदार व आमदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र या दोघांनी सुरू केले आहे.त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश येत असल्याचे दिसून येत असून अनेक दिग्गज नेते भाजप व अजित पवार गटाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या तीन प्रमुख पक्षात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.आगामी निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही,हे लक्षात आल्यानंतर अनेक जण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बरळले, आपण एका संविधानिक पदावर बसलो आहोत,याचा कायम विसर पडणाऱ्या अजित पवार यांनी एका जाहीर सभेत ” बलात्कार करणाऱ्या विकृत माणसांचे गुप्तांग कापून टाकायला पाहिजे,” अशी बेताल बडबड केली.त्यांच्या या बडबडीकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.पण एका गोष्टीचे महाराष्ट्राला आश्चर्य वाटले,ते म्हणजे बदलापूर येथे जी घटना घडली ती १३ ऑगस्ट रोजी,आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांना तब्बल १० दिवसांनी उपरती व्हावी,व त्यांनी नको त्या गोष्टी कापून काढायची भाषा करावी. या घटनेचा उशीरा का होईना त्यांना इतका पुळका यावा,हेही नसे थोडके,असेच म्हणावे लागेल.तुम्हाला जे करावेसे वाटते,ते तुम्हीच करू शकता,कारण इतरांना ते शक्य नाही.बदलापूर येथे आंदोलन करणाऱ्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कंगनाने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, येत्या ६ सप्टें.रोजी माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर आधारीत ” इमर्जन्सी,” हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमात कंगना राणावत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही तीने पार पाडली आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना राणावत हीने आपल्या अकलेचे बरेच तारे तोडले आहेत.इंदिरा गांधी यांना तीने किती वाचलं आहे,देव जाणे,पण इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी इतिहासात डोकावून पाहायला हवे होते.कारण इंदिरा गांधी यांच्याविषयी बोलताना तीने जी बेताल वक्तव्ये केली आहेत,तशी ती केली नसती.” इंदिरा गांधी यांच्यामध्ये परिपक्वतेचा…
