Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान संपन्न. जे.एस.डब्लू.फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.जामसर,तालुका जव्हार येथील ग्रामपंचायत अंतर्गत वेलीचापाडा,देवतळी, तेलीचापाडा, बहुपाडा या गावांमध्ये तीन दिवस विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. जव्हारसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात क्षयरोग (टीबी) हा एक महत्त्वाचा विषय आहे.नुकत्याच झालेल्या या मोहिमेत २०० हून अधिक ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले होते.स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढती लोकसंख्या,आरोग्य शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यामुळे टीबीवरील जनजागृतीची गरज ओळखून ” जेएसडब्लू फाउंडेशन आणि स्थानिक आरोग्य संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्य,पोस्टर प्रदर्शन…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागात चौथी मुंबई आकाराला येणार… मुंबई व आसपासच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारतर्फे संयुक्तरित्या विविध महत्वाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे. वर्सोवा ते मढ आणि वर्सोवा पासून भाईंदरपर्यंत एक सिलिंक जाणार आहे.हा सिलिंक मढहून पुढे विरारपर्यंत जाणार आहे.मुंबईची ६० टक्के वाहतूक ही पश्चिम भागात आहे.हे सिलिंक एकदा सुरू झाले तर पश्चिमेस असलेल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक डायव्हर्ट होईल.सध्या मुंबईहून विरारला जाण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतात.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघे २५ मिनिटांवर येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” अबब….मनपाचा आणखी एक अधिकारी कोट्यावधी रु.लूट करून पळाला, पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहर महानगरपालिका ही उभ्या महाराष्ट्रात एक बदनाम महानगरपालिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशझोतात आली आहे.आता आणखी एका प्रकरणाने या महानगरपालिकेचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे.राज्यसरकार एका भ्रष्ट अधिकाऱ्याला कशी पाठीशी घालते व त्याला आयुक्तांची कशी साथ मिळते,हे या प्रकरणावरून दिसून आले आहे. ही महानगरपालिका २००९ साली स्थापन झाली.ग्रामीण भागातील गावांचा विरोध असतानाही राज्य सरकारने जुलूम जबरदस्ती करत,त्या गावांचा महानगरपालिकेत समावेश केला.त्यानंतर जे काही घडले,ते आपल्या लोकशाही व्यवस्थेला छेद देणारे होते.त्या काळाकुट्ट इतिहासाची पुन्हा उजळणी करणे,संयुक्तिक ठरणार नाही.पण गेल्या १५ वर्षाच्या महानगरपालिकेच्या वाटचालीत सामान्य…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान : सरकार लाज कोळून प्यायली आहे… अधिवेशनाचा कालचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत होणाऱ्या अवमानप्रकरणी गाजला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आमचे महाराज हल्ली राजकारण्यांच्या कचाट्यात सापडले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व अवमान,या दोन विषयावर सतत राजकारण होत आहे.या राजकारणी मंडळींना महाराजांबद्दल किती आस्था आहे,याविषयी सर्वसामान्यजनाच्या मनात साशंकता आहेच,पण महाराजांच्या नावाने घाणेरडे राजकारण करणाऱ्या या नतद्रष्ट मंडळीबद्दल चीड व संताप देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून काही राजकीय पक्ष हे हिंदुत्व व छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता,हे दोन भावनात्मक विषय हाती घेऊन चांगभलाच राजकारण करत आहेत.हे दोन्ही विषय राज्याच्या रयतेसाठी अत्यंत संवेदनशील असे विषय असून…

Read More

भरत जोशी,मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी : दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत होणार… चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत काल न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर ९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत व न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.हे दोन्ही संघ यापूर्वी किती वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत,त्रयस्थ ठिकाणी किती वेळा एकमेकांशी भिडले आणि कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला ? हे सर्वप्रथम जाणून घेऊया. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध ११९ सामने खेळले गेले.यामध्ये भारताने ६१ वेळा तर न्यूझीलंडने ५० वेळा विजय मिळवला आहे. यापूर्वी,दोन्ही संघ त्र्ययस्थ ठिकाणी…

Read More

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, दहशतवादी हमास आपल्या देशाच्या उंबरठ्यावर… इस्रायल-हमास याच्यामध्ये युद्धविराम झाल्यामुळे दक्षिण आशियामधील देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.पण हमास आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.भारताशी हमासची थेट दुश्मनी नसली तरी इस्त्रायलशी असलेली आपली जवळीक त्याच्या डोळ्यात सलू लागली आहे.त्यामुळे त्यांनी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या अतिरेकी संघटनाना बळ देण्याचे काम सुरु केले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोट शहरांमध्ये ५ फेब्रु.रोजी एक कार्यक्रम झाला.” कश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन,” ” अल अक्सा फ्लड कॉन्फ्रेंस, ” असं या कार्यक्रमाचे नाव होतं.या कार्यक्रमामध्ये हमास नेते डॉ.खालिद अल-कदूमी सहभागी झाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि…

Read More

नाशिक प्रतिनिधी नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीला शासनाची मंजूरी … नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर,अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत.त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे.त्यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य होणार आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या उभारण्यासाठी २०० कोटी रु.च्या निधीस मंजुरी…

Read More

भरत जोशी,मुंबई, महत्वाची अंतिम लढत, भारताची लढत न्यूझीलंडशी झाल्यास फायदेशीर ठरू शकेल… भारताणने काल ऑस्ट्रेलियाचा उपणत्या फेरीत ५ विकेट्स राखत पराभव केला.भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. या विजयाने भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आज होत असून हा सामना पाकिस्तानमधील लाहोर येथे होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ ९ मार्च रोजी दुबईमधील मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल. मात्र या दोन संघांपैकी भारतासाठी कोणता संघ अधिक सोयीस्कर ठरेल याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्हा पर्यावरण ; सरकारच आपल्या जीवावर उठलंय, स्थानिक प्रशासनाचा निर्लज्जपणा,खादाड वृत्ती व सरकारची उदासीनता अशा तीन कारणामुळे येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्याचे होत्याचे नव्हते होणार आहे.मातीचोरी,रेतीउपसा,वृक्षतोड व अनधिकृत दगडखाणी आदी कारणामुळे निसर्गरम्य पालघर जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे.दुसरीकडे प्रदूषणातही मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे.मात्र या गैरप्रकारात गुंतलेल्या समाजकंटकासमोर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन लोटांगण घालण्यात धन्यता मानत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पालघरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.हा जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.या दुष्टचक्रात मानवी जीवन लयाला जाण्याची शक्यता आहे. या सर्व गैरप्रकाराला केंद्र व राज्य सरकार कसं खतपाणी घालत आहे,हे अनेक घटनांवरून स्पष्ट…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ब्रेस्ट कॅन्सर चाचणी शिबिर संपन्न, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि त्वरित निदान हे अत्यंत महत्त्वाचे असून,त्याच उद्देशाने ग्राम मैत्रीण बचत गट महासंघ, जव्हार आणि बोईसर तारापूर रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.या शिबिरात एकूण ८० महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. कार्यक्रमात डॉ.सोनम खंडेझोड (अवेन्यू चेअर ब्रेस्ट कॅन्सर ),वैशाली शिंदे ( प्रोजेक्ट इन्चार्ज,बोईसर तारापूर रोटरी क्लब ), प्रा.संध्या शहापुरे ( जागृती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ),प्राची कडव,वैभवी धोंडगे ( टेक्निशियन,नोव्हा लॅब आणि यु.ई.लाइफ सायन्सेस ) यांनी मार्गदर्शन केले.तसेच, ग्राम मैत्रीण बचत गट महासंघाच्या अध्यक्ष प्राध्यापिका डॉ.प्रज्ञा कुलकर्णी,सचिव…

Read More