Author: दीपक मोहिते

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार येथे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशिक्षण शिबीर, पालघर जिल्हा पोलीस व जव्हार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सुरक्षित मोहिम अंतर्गत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जव्हार येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये जव्हार तालुक्यातील ३५० तरुण सहभागी झाले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांना यावेळी सायबर सुरक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.सायबर पोलीस कक्षाचे पो.अं.म. रुपेश पाटील आणि म पो.अं.म. स्नेहल डोरे यांनी पिपिटी आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने सायबर गुन्हे,त्यांचे vividh प्रकार,तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी,त्यासाठी कोणतते अँप्स आणि वेबसाइटचा वापर करावा, तसेच पालघर पोलीस विभागाच्या अधिकृत…

Read More

दिपक मोहिते, लोकांच्या डोळ्यात आणखी किती धुळफेक कराल ? आग्रा येथे शिवस्मारक व संग्राहालय : देवाभाऊ,” अजब तूझे सरकार,” राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी,आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.अर्थात त्यांच्या या घोषणेचे राज्यातील शिवप्रेमी जनता नक्कीच स्वागत करेल. पण आठ वर्षांपूर्वी २४ डिसें. २०१६ रोजी ३ हजार ५०० कोटी रु खर्च करून अरबी समुद्रात उभे करण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले होते. त्या स्मारकाची गेल्या आठ वर्षात साधी एक वीट लागली नाही.तसेच मालवण येथील राजकोट किल्यात अत्यंत घिसाडघाईने उभारण्यात आलेला पुतळा कोसळतो.या दुर्घटनेस कोण कारणीभूत आहे.अननुभवी शिल्पकाराला…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुका देखरेख संघाची निवडणूक बिनविरोध, वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था असून या संस्थेच्या पाच संचालक पदाच्या जागासाठी निवडणूक अलिकडेच जाहीर झाली होती.मात्र काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाचच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. सुनील मोकाशी ( कोनसई सेवा सहकारी सोसायटी ) पंढरीनाथ पाटील ( पालसई सेवा सहकारी सोसायटी) दिपक भोईर ( नारे सेवा सहकारी सोसायटी ) उल्हास सोगले ( ब्राम्हणगाव सेवा सहकारी सोसायटी ) श्रीराम पठारे ( कळंभे सेवा सहकारी सोसायटी ) या पाच जणांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे थाटामाटात उदघाट्न, खडखड येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे उद्घाटन, शाश्वत शेतीस चालना, शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढवून शाश्वत शेतीस चालना देण्यासाठी खडखड येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.हा प्रकल्प असीम इंफ्रास्ट्रक्चर फायांनान्स लि.मुंबई यांच्या सीएसआर निधीतून बायफ संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला.आहे. या उद्घाटन समारंभात एआयएफएल -आयवीडीपीच्या सीएसआर प्रमुख विनया क्षीरसागर, खडखड गावच्या सरपंच सुनंदा घाटाळ,डावखरे आणि बायफ संस्थेचे सीपीएम प्रदीप खोसे यांच्या हस्ते सौर उपसा सिंचन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रकल्प पथकातील राहुल रूपवते, सुनील घुगे,पूनम ठोंबरे,हेमंत सरोडे आणि वैभव कापडणीस यांनी विशेष मेहनत घेतली.या सौर…

Read More

दीपक मोहिते, ” त्या अडीच हजार बाधित कुटुंबाना लवकरात लवकर दिलासा द्या, त्यांची फसवणूक होता कामा नये,” सुरू असलेल्या राज्य विधानसभा अधिवेशनात नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आ.राजन नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील ४१ अनधिकृत इमारतीच्या तोडक कारवाई संदर्भात मुद्दा उपस्थित केला.त्यांनी हा ज्वलंत प्रश्न उपस्थित करताना,सुमारे अडीच हजार बाधित कुटुंबाचे पुनर्वसन व्हायला हवे,अशी आग्रही मागणी केली.पण त्यांच्या या मागणीसंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जे उत्तर दिले,ते वेळ मारून नेणारे होते.ते आपल्या उत्तरात म्हणाले,या प्रकरणी शासनाला विशेष धोरण ठरवावे लागेल.त्यांच्या या उत्तराने आ.नाईक यांचे समाधान झाले की नाही,हे कळायला मार्ग नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे,या प्रकरणी बाधित नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” मतांवर डोळा ठेवून सुरु केलेल्या योजना आता गटांगळ्या खाऊ लागल्या… सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या अनेक योजनापैकी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,या दोन्ही योजना सध्या थांबवण्यात आल्या आहेत.तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे लाडकी बहीण योजनेतही दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहेत.या सर्व घडामोडीमागे या सर्व आकर्षक योजनावर होणारा अमाप खर्च व त्याचा सरकारी तिजोरीवर पडणारा प्रचंड ताण हेच एकमेव कारण असल्याचे दिसून आले आहे.मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सध्या नवीन लाभार्थींना अर्ज करता येणार नाही.यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत…

Read More

नाशिक प्रतिनिधी, ” शहर खबरबात, ” नाशिक शहराची वाटचाल गुन्हेगारी शहराच्या दिशेने सुरु, नाशिक शहरातील वाढती गुंडगिरी लक्षात घेता पोलिसांची कार्यक्षमता पणाला लागण्याची चिन्हे आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा न घातल्यास या शहराची वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिक शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून गुंडगिरीचे प्रमाण सतत वाढत आहे. शहरातील गुंडगिरी नियंत्रणात न आणल्यास नागरिकांना दिवसेंदिवस जगणं कठीण होणार आहे.शहरामध्ये दोन दिवसाआड तरुणांच्या हत्या होत आहेत.गटागटांमध्ये हाणामाऱ्या होत आहेत,घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागते,त्यामुळे गुंड गुन्हा करून फरार होत असतात.शहरातील अनेक गल्लीबोळात गुंडाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.यावर वेळीच उपाययोजना न…

Read More

वसंत भोईर,वाडा केबल खोदकामामुळे राज्यमार्ग बनला मृत्यूचा सापळा, वाडा- भिवंडी -मनोर राज्यमार्गालगत खोदकाम करून केबल टाकण्याच्या नावाखाली जागोजागी खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गांवर अनेक अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर असलेल्या भावेघर येथील फिडरवरून कोंढले व उसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी वाडा भिवंडी -मनोर महामार्गावर खोदकाम करण्यात येत आहे.या खोदकामामुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली असुन नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे ही लाईन टाकण्यात येत आहे.या खोदकामामुळे येथे अपघात होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले हे काम त्वरित बंद करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.…

Read More

सचिन परब,विरार विरारच्या प्रतिक चव्हाण याची आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेसाठी निवड, ७ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स फाउंडेशन ( रजि ) आयोजित ६ ते ०९ मार्च २०२५ दरम्यान राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धा बिरसा मुंडा स्टेडियम,ओडिशा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये विरारच्या प्रतिक प्रकाश चव्हाण याने पुरुष गटातील २०० मीटर फ्रीस्टाईल – सोलोमध्ये सुवर्णपदक व १०० मीटर फ्रीस्टाईल सोलोमध्ये रजतपदक,पुरुष ४०० मीटर हर्डल सोलोमध्ये रजत पदक, मेन्स रीले ४ × ४०० मीटर रनिंग टीम सादरीकरणामध्ये रजतपदक मिळवले होते. प्रतिक याने स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे त्यांना महाराष्ट्र रीले संघाचे कॅप्टनपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रतिक चव्हाण हे मूळचे विरारचे…

Read More

शुभम सावंत,विरार विवा महाविद्यालय विरार येथे जुळल्या सुरेल तारा, ” सृजन विरार,” या संस्थेतर्फे रवि.२३ मार्च रोजी ” जुळल्या सुरेल तारा,” या शास्त्रीय संगीत वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विवा महाविद्यालय येथील विजयानंद पाटील रंगायतन येथे सायं. ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार असून, विरार वसई परिसरात कदाचित पहिल्यांदाच संतूर वादन आणि व्हायोलिन आणि सारंगीच्या जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पुण्याचे डॉक्टर शंतनू गोखले ( पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ) हे संतूर वादन करणार असून,खास गोवा येथून येणारे,मूळचे ग्वाल्हेरचे सारंगी वादक वसीम खान ( उस्ताद मुन्ने खान आणि उस्ताद सरवर हुसेन यांचे शिष्य ) आणि गोव्याचेच व्हायोलिन वादक…

Read More