सुरेश काटे,तलासरी
तलासरी भाजपच्या तालुकाध्यक्षपदी विवेक करमोडा,
भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही संघटनात्मक बदल केले आहेत.आज भारतीय तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण तसेच पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरत रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याची व पालघर जिल्ह्याच्या कोअर कमिटीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. विवेक करमोडा यांच्या निवडीने तलासरीतील काही कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असले तरी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली
भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांनी नुकतीच डहाणू विधानसभेची निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत त्यांनी माकपाला जोरदार टक्कर दिली.पण भाजप नेत्याच्या काही चुकीच्या निर्णयामुळे विनोद मेढा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता,

