संजय लांडगे,वाडा
वाड्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन,
राज्य शासनाने शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा विषय सक्तीचा केला आहे.या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर विरोध केला आहे.
वाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.
काल वाडा शहरात बस स्थानकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी हिंदी सक्तीची पत्रके जाळण्यात आली.
या आंदोलनात मनसे तालुका सचिव स्वप्नील मोरे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा मोरे,शहर उपाध्यक्ष आदेश डेंगाने,उपशहर अध्यक्ष ओमकार साळुंखे,उपशहर अध्यक्ष करण यादव,उपशहर अध्यक्ष मित पाटील,शहर संघटक किशोर डेंगाने, महिला उप तालुका अध्यक्ष मंगल निकम, उप शहर अध्यक्ष कल्पना गोसावी, शहर सहसचिव शंकर मोरे सहभागी झाले होते.

