सुशील भोईर,वसई
वसईत भाजपाची पक्षबांधणी ; बारा मंडळ अध्यक्षाची निवड,
काल वसई तालुक्यातील भाजपाच्या बारा मंडळांच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या व बारा मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली.विरार पश्चिम मंडळ येथे पक्षाने विशेष लक्ष दिले होते व मंडळाचे निवडणूक अधिकारी म्हणून केदारनाथ म्हात्रे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या मंडळात सर्वानुमते तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विशाल राऊत यांची निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पार पडताच आ.राजन नाईक यांनी जातीने उपस्थित राहून नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष विशाल राऊत व निवडणूक अधिकारी केदारनाथ म्हात्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,वसई तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी ज्या प्रमाणे वसईकर जनतेने विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणले.तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी जनतेच्या प्रत्येक समस्येची सोडवणूक करून न्याय द्यायचा आहे.जनतेने आपल्या पक्षावर जो विश्वास दाखवला आहे,त्याच्या जोरावर पक्ष अधिक बळकट करायचा आहे.त्यासाठी सर्वांनी कंबर कसून कामे करायला हवीत. तालुक्यात भाजपा मंडळ अध्यक्षपदी (१ ) पुर्व उत्तर मंडळ,वैभव झगडे ( २ ) नालासोपारा आचोळे, सुनील तिवारी ( ३ ) वसई ग्रामीण पश्चिम,आशिष जोशी ( ४ ) वसई शहर,गितांजली धारीवाला ( ५ ) वसई पुर्व, उदय जोशी ( ६ ) वसई पुर्व वालीव,सुर्यकांत वाघमारे ( ७ ) वसई रोड मंडळ,महेश सरवणकर ( ९ ) नालासोपारा पूर्व तुळींज,प्रमोद सिंग ( १० ) नालासोपारा पश्चिम,सतिश सिंग (११ ) विरार पश्चिम, विशाल राऊत ( १२ ) विरार पूर्व,मनिष वैद्य.अशा बारा अध्यक्षांची निवड झाली आहे.येत्या ३० तारखेपर्यंत भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्षपदांची निवडणूक प्रक्रिया पार पडेल,असे यावेळी सांगण्यात आले.

