सुरेश वैद्य,पालघर
पालघर येथे इंटरऍक्टिव्ह सायन्स लॅबचे शानदार उद्घाटन,
पालघर मधील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म.नी.दांडेकर हायस्कूल येथे इंटरऍक्टिव्ह सायन्स लॅबचे उद्घाटन राजाभाऊ चित्रे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट केदार काळे होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती नामजोशी होत्या.
कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त भरत उमराळे,संस्थेचे सेक्रेटरी जयंत दांडेकर,म.नी.दांडेकर हायस्कूलचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपेंद्र घरत,इंग्रजी माध्यम स्कूल कमिटीचे अध्यक्ष कमलेश वारया, कार्यकारणी सदस्य गंगाधर फड,प्रज्ञा ठाकूर व तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे विभूती चौधरी,नूतन पाटील,सोनार व शिक्षक उपस्थित होते.मुलांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून या इंटर ऍक्टिव्ह सायन्स लॅबचा उपयोग होणार आहे.विज्ञानातील प्रयोग स्वतः करून बघता येतील,अगदी सूर्य चंद्र तारे,ग्रहण दिवस-रात्र, वादळ कसं येतं,पायथागोरस सिद्धांत,अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघून शिकता येणार आहेत.पुस्तक वाचून जे पटकन आकलन होणार नाही,ते प्रत्यक्ष बघून विद्यार्थ्यांना आकलन होईल. यासाठी येणारा खर्च आर्यन शाळेचे १९५४ बॅचचे मॅट्रिक झालेले माजी विद्यार्थी राजाभाऊ चित्रे यांनी आपले वडील कै.चित्रे गुरुजी केला आहे.
चित्रे गुरुजी हे पालघर येथील आर्यन शाळेत शिक्षक होते व त्यानी अनेक हुशार विद्यार्थ्यांना घडवले आहे.
ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी मी माजी विद्यार्थी म्हणून ही देणगी दिली आहे,असे राजेंद्र चित्रे म्हणाले.केदार काळे आपल्या भाषणात म्हणाले, याचा उपयोग आर्यनच्या विद्यार्थ्यांना होईलच,पण एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेने किंवा इतर शाळांनी इच्छा प्रगट केल्यास त्यांनाही ही प्रयोगशाळा वापरण्यासाठी देण्याचा आम्ही विचार करू. लवकरच पालघर येथे इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या सहकार्याने सुसज्ज कॉम्प्युटर लॅब उभारण्यात आली आहे,तीचे लवकरात लवकर उद्घाटन करण्यात येणार आहे.
१२८ वर्षे जुनी असलेल्या आर्यन एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत संस्था आहे.पालघर येथील हायस्कूललाही ९६ वर्ष पूर्ण झाली आहेत.काळानुसार इंग्रजी माध्यमही पालघर येथे सुरू आहे मराठी माध्यमात पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्रजीचा वर्गही आहे. खेळासाठी विस्तीर्ण मैदान आहे व शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम येथे नेहमीच राबवण्यात येत असतात.

