Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, नवीन बंधाऱ्यामुळे जुली बेट सुरक्षित ; सुमारे तीन हजार स्थानिक भूमिपुत्र सुखावले, वैतरणा खाडीतील जुली बेटाच्या संवर्धनासाठी जलसंपदा विभागाने जुली खारभूमी योजनेला मंजुरी दिली आहे.या योजनेअंतर्गत बेटाच्या संरक्षणासाठी बंधारा बांधण्यात येणार असून त्यासाठी ११ कोटी ८८ लाख रू.च्या निधीला विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयामुळे या बेटावरील सुमारे तीन हजार स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. विरार पश्चिमेस ४ कि.मी. अंतरावर वैतरणा खाडीत जुली बेट आहे.या बेटावर ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे.या बेटाच्या चोहोबाजूला खाडी असल्यामुळे खारभूमी योजनेअंतर्गत जुली बेटाच्या संरक्षणासाठी बेटाला बंधारा बांधण्यात आला होता. त्यासाठी जुली खारभूमी योजना राबवण्यात आली होती.मात्र या बेटाच्या परिसरात…

Read More

सुरेश वैद्य सफाळे, विरार नारिंगी – सफाळे दरम्यान लवकरच रो रो सेवा, विरार – नारिंगी ते सफाळे दरम्यान रो रो सेवेचा शुभारंभ लवकरच होणार असल्याची खात्रीदायक माहिती असुन ही सेवा विरार ते पालघर व पालघर ते विरार,असा प्रवास करणाऱ्यांसाठी सुलभ व वेळ वाचवणारी ठरणार आहे. शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील नारंगी ( विरार ) ते खारवाडेश्री ( सफाळे ) येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी रो-रो जेटी व तत्सम सुविधा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते.या प्रकल्पाला २६ ऑक्टो.२०१७ रोजी १२ कोटी ९२ लाख रु.ची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.त्यानंतर सरकारने २३.६८ कोटी रु.ची सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. विरारजवळ चिखलडोंगरी ( नारंगी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यथा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल…. पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून आजच्या घडीला जिल्ह्याची लोकसंख्या तीस ते चाळीस लाखाच्या घरात पोहोचली आहे.तसेच लोकसंख्येसोबत वाहनांची संख्या वाढत चालली आहे.ही स्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यंत्रणेने वाहतूकीचे नियोजनबद्ध आखणी करणे गरजेचे होते.पण तसे आजवर कधीच घडले नाही,त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीचे पार तीन तेरा वाजले असून नागरिकांना सध्या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. नव्याने पालघर जिल्हा निर्मिती,वसई विरार शहर महानगरपालिकेचे आगमन,ग्रामीण भागात नगरपंचायतीची स्थापना,अशा विविध कारणामुळे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात नागरीकरणाला प्रचंड वेग आला आहे.गेल्या दहा वर्षात हां हां म्हणता जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे तीस…

Read More

संजय लांडगे,वाडा मासिक पाळी विषयी जनजागृती;एक स्तुत्य उपक्रम, समाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन,मुंबई यांच्यातर्फे वाडा तालुक्यातील कळंभे येथे फाउंडेशनच्या वाडा युनिटच्या माध्यमातून मासिक पाळीत बाळगायची स्वछता, घ्यायची काळजी व जनजागृती संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उत्कर्ष प्रशिक्षक प्रणाली पाटील यांचे याकामी सहकार्य लाभले.महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमास महिलांसोबतच पुरुषांनीही उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी डॉ.अपर्णा पाल यांनी मासिक पाळीबाबत उपस्थित मुली व महिलांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी कळंभे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा येथे सासऱ्याकडून जावयाची हत्या,जावई जागीच ठार, सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काटा काढल्याची घटना वाडा तालुक्यातील कवठेपाडा येथे घडली आहे.जावयाच्या या कारनाम्यामुळे सासऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी झोपेतच असलेल्या जावयाच्या डोक्यात कुराड घातली. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी होऊन जागीच मूत पावला. याप्रकरणी वाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सासर्‍याला अटक केली आहे. कवटेपाडा येथे राहणारे जाणू कवठे यांच्या मुलीबरोबर युवराज जगताप याचा प्रेम विवाह झाला होता.जानू यांची मुलगी एस.टी.महामंडळात नोकरीला आहे.जावई युवराज हा बेरोजगार होता तो काम करत नव्हता.मात्र गेल्या काही वर्षापासून सरकारी नोकरी लावतो,असे अमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक सुरू…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर यांची निवड, वाडा शहरातील वाडा सहकारी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पातकर तर सचिवपदी प्रमोद भोईर, उपाध्यक्ष अॅड मनोज पष्टे, स्कूल कमिटी चेअरमन ( पा.जा. हायस्कूल वाडा ) दिलीप पाटील,को.ऑर्डीनेशन स्कूल कमिटी चेअरमन ( सरस्वती विद्या मंदिर कंचाड ) हरिभाऊ पाटील,सहसचिवपदी विकास जाधव आदी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी सभेमध्ये काल निवड करण्यात आली. वाडा तालुक्यातील नावाजलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली.या बैठकीत संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्थेचा अनागोंदी कारभार सुरू होता. त्यापासून संस्थेची मुक्तता करून शाळेची शैक्षणिक प्रगती व स्वच्छ पारदर्शक काम करण्यासाठी ही कमिटी बांधील असल्याचे नवनिर्वाचित…

Read More

वसंत भोईर,वाडा  सेवानिवृत्त  जवान नंदन जाधव यांचा सन्मान, वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात २० वर्षे सेवा करून नुकतेच निवृत्त झाले.त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला. नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून २००५ साली सेवेत रुजू झाले होते.हैद्राबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पठाणकोट ( पंजाब ) येथे झाली.त्यानंतर ते सलग आठ वर्षे जम्मु काश्मीर येथे कर्तव्यावर होते.त्यानंतर सात वर्षे संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे पोस्टिंग होती.त्यांनी चीनच्या सीमेवर दुर्गम ठिकाणी तीन वर्षे सेवा बजावली.अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून ते ३१ मार्च २०२५…

Read More

नाशिक प्रतिनिधी नाशिक येथे मातीस्नान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नाशिक भाजप पर्यटन आघाडी संयोजक व य़ोगगुरु नंदकुमार देसाई,महेश शहा व चिराग शहा यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक चांभार लेणी पायथ्याशी आज माती स्नान उपक्रम व व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. राज्यातील ५०० हुन अधिक लोकांनी माती स्नानचा आनंद लूटला.आपल्या शरीरातील अनेक व्याधी मातीस्नान केल्यामुळे बरे होत असतात असा आरोग्य तज्ञांचा दावा आहे. गेली २५ हुन अधिक वर्षं नंदकुमार देसाई व त्यांचे सहकारी सदर कार्यक्रम करत आहेत.हनुमान जन्मोत्सव नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.हनुमान जन्मोत्सव नंतर नाशिकचे तपमान ४० डिग्री होत असते.या स्नानामुळे उष्माघाताचा त्रास कमी…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पालघर येथे जय भीम पदयात्रा संपन्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या.त्यापैकी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण विद्यार्थ्यांनी आचरणात आणली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने पालघर जिल्ह्यात जय भीम पदयात्रा काढण्यात आली.त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रानडे पुढे म्हणाले की,बाबासाहेबानी आपल्याला ज्या तीन गोष्टी शिकवल्या आहेत त्याचे पालन करावे. बुद्धिमतेचा विकास करणे,हे आपले ध्येय असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे…

Read More

मनिष धानू,डहाणू डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ, डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे.हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते,असा लाखो भाविकांचा विश्वास आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरातमधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात.गुजरातमधील भाविकांची या देवीवर विशेष श्रध्दा आहे.देवीची यात्रा सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टतर्फे देण्यात दिली.यात्रेदरम्यान प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते.पालघर,ठाणे या जिल्ह्यातून तसेच शेजारच्या गुजरात राज्यातून लहान मोठे व्यापारी येथे भरणाऱ्या बाजारात माल माल विक्रीसाठी घेवून येत असतात. या महालक्ष्मी देवीला…

Read More