- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, एकलव्य कुशल योजनेअंतर्गत आदिवासी युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ” एकलव्य कुशल योजनेअंतर्गत १ डिसें.२०२४ पासुन प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या योजनेअंतर्गत इच्छुक प्रशिक्षणार्थीना अर्ज करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे ” एकलव्य कुशल,” (https:/eklavyakushal.in/) हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक लाभार्थी आपला अर्ज ऑनलाइन पध्दतीने नोंदवू शकतात. तसेच लाभार्थीना योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी व ऑनलाइन अर्ज नोंदवताना येणा-या शंकाचे निरासन करण्यासाठी शबरी महामंडळातर्फे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकः १८००२३३५८६० उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २० प्रशिक्षण…
जव्हार प्रतिनिधी, शैक्षणिक गुणवत्तेसाठी जव्हारमधील शिक्षकांचा अभ्यास दौरा, जव्हार तालुक्यात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी जव्हारमधील ५० शिक्षकांनी नुकताच त्र्यंबकेश्वर येथील वंडर स्कूल,हिवाळी या शाळेचा अभ्यास दौरा केला. हा दौरा जव्हार गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडथळे दूर करणे,अध्ययन स्तर उंचावणे,पायाभूत साक्षरता आणि मूलभूत गणिती कौशल्ये विकसित करणे,तसेच शिक्षकांच्या नवनिर्मित क्षमतेला चालना देणे ही होती. वंडर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान,गणिती क्रिया, वाचन-लेखन कौशल्य आणि संविधानाचे पाठांतर पाहून शिक्षक आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या शाळेत विद्यार्थी दोन्ही हातांनी लेखन करतात,संविधानातील अनेक कलमे तोंडपाठ…
नदीम शेख,पालघर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळाला मोबदला ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मोबादला देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाला दोन हजार मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा मिळणार आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईसह कल्याण, अंबरनाथ व पनवेल तालुक्याच्या वीजेचा प्रश्न सुद्धा निकाली निघाला आहे. या प्रकल्पासाठी गुजरात वरून हरित ऊर्जा आणण्यात आली आहे.ही वीज इतर वीज कंपन्यांपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असणार आहे.त्यामुळे वीज ग्राहकाला देखील इतर कंपनीच्या मानाने वीजपुरवठा स्वस्त्यात मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातून टॉवर व वीज वाहक…
वसंत भोईर,वाडा एनएमएमएस परीक्षेत कोने शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, केंद्र सरकारने ८ वीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय स्तरावर केलेल्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या एनएमएमएस ( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा ) परिक्षेत कोने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेच्या ४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.शाळेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी गट शिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या परीक्षेला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा कोने या शाळेचे ८ वीचे ५ विद्यार्थी बसले होते. त्या परीक्षेचा १०० % निकाल लागला असुन आता शिष्यवृत्तीकरिता पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.…
संजय लांडगे,वाडा वाडा नगरपंचाय कार्यालयाला मनसेची धडक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाडा तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांच्या नेर्तृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयाचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांना घेराव आज घेराव घालण्यात आला.वाडा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.त्याचे उत्तर येत्या दहा दिवसात मिळावे,अशी मागणी करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांशी वाड्या शहरात राहणाऱ्या lप्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न व समस्या या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.नगरपंचायतीने नगरपंचायतीचा निधी हा फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे केवळ उदरनिर्वाहासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले असुन त्याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यासह धडक दिली. तालुकाध्यक्ष यांच्यासोबत देवेंद्र भानुशाली उपचिटणीस कामगार सेना, वाडा तालुका अध्यक्ष स्वप्निल मोरे,वाडा शहराध्यक्ष मधुर म्हात्रे,वाडा…
नवीन पाटील,सफाळे महिलांच्या टी २० स्पर्धेत भारत क्रिकेट क्लब विजयी, मुंबई क्रिकेट असो.व डॅशिंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॅशिंग सुपर वुमन कप टी २० स्पर्धेमध्ये मुंबई येथील भारत क्रिकेट क्लबने पीडीटीएस संघाचा दारुण पराभव करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंतिम सामना खेळला गेला.या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी झाले होते.ही स्पर्धा चार दिवस साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील,माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर,सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे,प्राचार्य किरण सावे,भूषण पाटील,विकास पाटील आणि मान्यवर पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून शर्वी सावे…
नाशिक प्रतिनिधी, नाशिकमध्ये मध्यरात्री थरार ; जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक, ३१ पोलीस जखमी, नाशिकच्या काठे गल्ली परिसरात काल रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली आहे.या दगडफेकीत तब्बल ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यामध्ये सहा.पोलीस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती.संबंधित धार्मिक स्थळ काढून घेण्याच्या सूचना नोटीसमधून देण्यात आल्या होत्या.दोन दिवसांत संबंधित धार्मिकस्थळ पाडण्यात येईल,असं सांगण्यात येत होतं. याबाबत अफवा पसरल्यानंतर काल रात्री उशिरा नाशिकमध्ये याचे जोरदार पडसाद उमटले. सुमारे ४००…
संजय लांडगे,वाडा शिक्षक संघटनेचा मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा, मुंबई,ठाणे,पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नवी मुंबई वाशी येथील मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. मुंबई विभागातील विभागीय मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी,या मुख्य मागणीसाठी हा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आपली संघटनशक्ती दाखवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळावा,अशी मुख्य मागणी आहे. प्रा.शिवाजी जगताप समन्वयक,ठाणे,पालघर जिल्हा,प्रा.सुनील पूर्णपात्रे, प्राध्यापक खोपकर,प्राध्यापक चितळे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक सदस्य या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
दीपक मोहिते, ” लाडकी बहीण योजना,” आता गटांगळ्या खाऊ लागली आहे…. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ” लाडकी बहीण योजना, “आता गटांगळ्या खाऊ लागली आहे.महिलाच्या मतांवर डोळा ठेवून महायुतीने ही योजना सुरु केली.त्याचा फायदा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. पण आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे सरकार निरनिराळॆ निकष लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करत आहेत. आतापर्यंत ९ लाख लाभार्थ्यांना सरकारने बाहेरचा रास्ता दाखवला आहे. सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रु. मिळणार आहेत.ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांची कामगिरी निराशाजानक, महायुती सरकारच्या १०० दिवसातील कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाला पाठवला आहे.सरकारमधील अनेक कॅबिनेटमंत्र्यांची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे या आढाव्यात म्हंटलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे,दादा भुसे,उदय सामंत,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,नितेश राणे,गणेश नाईक,अतुल सावे,मंगलप्रभात लोढा,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार,अदिती तटकरे,माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.या सर्वांना देण्यात आलेले टार्गेट त्यांना केवळ ३० ते ४० % पूर्ण करता आले.त्यांच्या या निराशाजनक कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी या मंत्र्यांच्या परफार्मन्सबाबत केंद्रीय नेत्याकडे आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे.त्यामुळे पुढे होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात यापैकी…
