संजय लांडगे,वाडा
शिक्षक संघटनेचा मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा,
मुंबई,ठाणे,पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नवी मुंबई वाशी येथील मुंबई बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.
मुंबई विभागातील विभागीय मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी,या मुख्य मागणीसाठी हा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या मोर्चात सहभागी होणार आहेत.
शिक्षण विभागातील
भ्रष्टाचाराविरोधात आपली संघटनशक्ती दाखवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळावा,अशी मुख्य मागणी आहे.
प्रा.शिवाजी जगताप समन्वयक,ठाणे,पालघर जिल्हा,प्रा.सुनील पूर्णपात्रे, प्राध्यापक खोपकर,प्राध्यापक चितळे,
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक सदस्य या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

