संजय लांडगे,वाडा
वाडा नगरपंचाय कार्यालयाला मनसेची धडक,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाडा तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांच्या नेर्तृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयाचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांना घेराव आज घेराव घालण्यात आला.वाडा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.त्याचे उत्तर येत्या दहा दिवसात मिळावे,अशी मागणी करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांशी वाड्या शहरात राहणाऱ्या lप्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न व समस्या या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.नगरपंचायतीने नगरपंचायतीचा निधी हा फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे केवळ उदरनिर्वाहासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले असुन त्याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यासह धडक दिली.
तालुकाध्यक्ष यांच्यासोबत देवेंद्र भानुशाली उपचिटणीस कामगार सेना, वाडा तालुका अध्यक्ष स्वप्निल मोरे,वाडा शहराध्यक्ष मधुर म्हात्रे,वाडा तालुका महिला सेना अध्यक्ष उषाताई मोरे व इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

