- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
- परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
- वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
- वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन,
- शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक व दोन नव्हे तर सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड,
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
- १७ खासदार करणार भाजपात प्रवेश,
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, धनदंडग्यांना रान मोकळे, वाढवणनंतर मुरबे पंचक्रोशीतील मच्छिमार समाज उध्वस्त होण्याच्या मार्गावर… पालघर जिल्ह्यात डहाणू – वाढवण येथे १ लाख कोटी रु.खर्चून उभारण्यात येत असलेल्या महाकाय वाढवण बंदरानंतर केंद्र सरकारला पालघर तालुक्यातील मुरबे येथे व्यापारी बंदर उभारण्याची गरज का भासली,हे आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहे.पालघरवासीयांच्या उरावर हे दुसरे बंदर का उभारण्यात येत आहे ? याच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागणार आहे.वाढवण बंदराप्रमाणे या बंदराला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असून स्थानिक भूमिपुत्र रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.पालघर तालुक्यातील मुरबे समुद्रकिनारी हे बारमाही बंदर उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून पर्यावरण विषयक परवानग्या प्राप्त करण्याचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शहरे जोडणाऱ्या रस्त्यासाठी भरीव आर्थिक निधी तर ग्रामीण भागातील रस्ते वाऱ्यावर… राज्य व केंद्र सरकार देशभरातील महत्वाची शहरे एकमेकांशी जोडण्यासाठी एकीकडे लाखो कोटीची उड्डाणे घेत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यासाठी निधी नसल्याचे सांगत आहे.डहाणू – वाढवण येथील प्रस्तावित बंदरात उतरलेला माल वेगाने शहरी भागात पोहोचवण्यासाठी सरकारने पालघर-इगतपुरी – नाशिक जलदगती मार्ग प्रस्तावित केला आहे.त्यासाठी सरकारने आपली तिजोरी सताड उघडी ठेवली आहे.तर ग्रामीण भागातील रस्त्यासाठी आपला कटोरा ठणठण गोपाळ असल्याचे सांगत सुटले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची सध्या पार दुरावस्था झाली असून निधी अभावी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२३, प्रभागात अद्ययावत मार्केट व पार्किंगची व्यवस्था हवी, सर्वात कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या या प्रभागात विविध जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यगोविंदाने राहत आहेत.साधारणपणे हे लोक मध्यमवर्गीय गटातील लोक म्हणून ओळखले जातात.हा भाग विकसित असा असून काही किरकोळ अपवाद वगळता या प्रभागात राहणारे लोक सुखी व समाधानी आहेत.या प्रभागात गुजराती समाजाचे चांगले प्राबल्य आहे.हा समाज व्यापार उदिमामध्ये सक्रिय आहे. मुस्लिम समाजाचेही व्यापारी क्षेत्रात बऱ्यापैकी योगदान आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निवडून येत आहेत.परंतु या निवडणुकीत त्यांच्यासमोर या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.हे आव्हान ते कसे पेलतात,यावर,त्यांचे यश अवलंबून आहे.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकार,खनिज संपन्न जिल्हे उद्योजकांच्या घश्यात घालत आहेत…. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ” चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळे राज्यात समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार असल्याचे म्हंटले आहे.या दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या खनिज विकास निधीतून अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे आपल्या भाषणात सांगितले.कॅन्सर इस्पितळ,कौशल्यावर आधारीत रोजगार निर्मिती,पायाभूत सुविधांचा विकास,शिक्षण व अन्य क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे.सरकारचा उद्देश चांगला आहे.पण तो केवळ कागदावर राहता कामा नये.कारण,आजवरचा अनुभव लक्षात घेता या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र नागवला गेला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार…
सुरेश काटे,तलासरी कुरझे धरणातून पाण्याचा विसर्ग,८५ घरांचे नुकसान.. तलासरी तालुक्यातील कुर्जे धरणातुन काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमूळे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे वेरोली नदी लगत असलेल्या वडवली, सवणे,वंकास गावातील जवळपास ८५ घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्यासह, सामानाचे नुकसान झाले. कोणतीही आगाऊ सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे तसेच पोलिसांकडून देण्यात आली. गावातील घरात पाणी घुसल्याचे माहिती मिळताच महसूल कर्मचारी, पोलीस घटना स्थळी पोहोचून मदत कार्य सुरु केले, दोन दिवसापासून तलासरी भागात मुसळधार पाऊस पडत आहे,या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत,तलासरीत…
वसंत भोईर,वाडा वाड्यात भातपीक नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात, वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने भात पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.या नुकसानीची पाहणी करण्यास आज दुपारनंतर सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम,वाडा झिणी हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.या वाणाबरोबरच गुजरात ४,गुजरात ११,सुरती, पुनम,जया,कोलपी,रत्ना, कर्जत ३,कर्जत ४ आदी वाणांची लागवड तालुक्यात केली जाते.१५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड तालुक्यात होत असते.यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते,मात्र गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने तसेच तानसा, वैतरणा व मोडकसागर…
तलासरी प्रतिनिधी, तलासरी भागात मुसळधार पाऊस, तलासरी भागात काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्याना पूर आला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची नोंद नाही. पावसामुळे गरबा खेळता येत नसल्यानमुळे तरुणाई हिरमूसली आहे,मंडप, डेकोरेशन,डीजे,ऑर्केस्ट्रा यावर केलेला लाखो रु.चा खर्च वाया गेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गरब्या साठी टाकलेले मंडप उडून गेले. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या,त्यामुळे भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले व वाहतूक बंद पडली.अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बाजारपेठेत शुक शुकाट दिसत होता.
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे शैक्षणिक साहित्य व पोषण आहाराचे वाटप, सकल आदिवासी संस्था, कल्याणच्या महिला पदाधिकारी आणि दात्यांतर्फे आज शिरोशी व तळ्याचापाडा तसेच ग्रामपंचायत जुने जव्हार येथे गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात गरोदर माता-भगिनींसाठी पूरक आहार आणि नवरात्र भेट कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी तारपा नृत्याने करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा डेकाटे, सचिव योगिनी कोसराबे,कोषाध्यक्षा संगीता निनावे,तसेच सदस्या कांता आष्टीकर व वृषाली मसुरकर यांनी विद्यार्थी आणि गरोदर माता-भगिनींची आपुलकीने विचारपूस करून मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले की, “आम्हीही आपल्या आदिवासी समाजाचे असून,जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी प्रगती करून उज्ज्वल भविष्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नवे जिल्हे नंतर निर्माण करा,सर्वप्रथम बोईसर नगरपरिषदेचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लावा… जे सरकार बोईसर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करू शकत नाही,ते सरकार आता २० नवीन जिल्हे व ८१ तालुके निर्माण करण्याच्या घोषणा करत सुटले आहे.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली आहे.त्यामुळे बोईसर व अन्य सहा गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीने नगरपरिषदेची निर्मिती होण्यासंदर्भात सर्व निकष पूर्ण केले आहेत.वाढते नागरीकरण ( लोकसंख्या – जवळपास सव्वा लाखाच्या घरात ) नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा व प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण झालेला विस्कळीतपणा लक्षात ग्रामपंचायतीने नगरपरिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करून काही वर्षांपूर्वी मंत्रालयात…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व -प्रभाग क्र.२२, प्रभाग क्र.२२ मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, या प्रभागात विविध समाजाचा भरणा आहे.येथे वाढत्या नागरीकरणामुळे मराठी भाषिक आता अल्पसंख्याक झाले आहेत.नव्याने निर्माण झालेल्या नागरी संकुलात विविध जाती धर्माच्या लोकांचा भरणा सर्वाधिक आहे.जलाराम बापू नगर परिसरात भलीमोठी झोपडपट्टी असून काठियावाडी व श्रमिक वर्ग या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने राहतो.एकंदरीत या प्रभागात मिश्र लोकवस्ती आहे.गेल्या काही वर्षात येथे मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले.पूर्वी या भागात अनेक मिठागरे होती,पण त्याचे क्षेत्र आता कमी झाले आहे.या खारटन जमिनीची मालकी केंद्रीय सॉल्ट विभागाकडे आहे.पण,१९९० पासून मीठ व्यवसाय हळूहळू इतिहास जमा झाला. त्यामुळे या जमिनीवर बिल्डर लॉबीची वाकडी नजर आहे.पण या जमिनीची…
