सुरेश काटे,तलासरी
कुरझे धरणातून पाण्याचा विसर्ग,८५ घरांचे नुकसान..
तलासरी तालुक्यातील कुर्जे धरणातुन काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमूळे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे वेरोली नदी लगत असलेल्या वडवली, सवणे,वंकास गावातील जवळपास ८५ घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्यासह, सामानाचे नुकसान झाले. कोणतीही आगाऊ सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वडवली गावाचे सरपंच प्रमोद ओझरे तसेच पोलिसांकडून देण्यात आली.
गावातील घरात पाणी घुसल्याचे माहिती मिळताच महसूल कर्मचारी, पोलीस घटना स्थळी पोहोचून मदत कार्य सुरु केले,
दोन दिवसापासून तलासरी भागात मुसळधार पाऊस पडत आहे,या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत,तलासरीत काल १७५ मी.मी.पाऊस पडला, त्यामुळे तलासरीचे कुर्जे धरण १०० टक्के भरले असुन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होता.
त्यामुळे वडवली गावातील नवापाडा -२७ घरे,ओझरपाडा – २६, हडळपाडा-१३, सवणे पाटिलपाडा – १२ वडवली सोनारपाडा – ७ वंकास – ८,असे सुमारे ८५ घराचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त घराची पाहणी करून महसूल विभागाचे अधिकारी माहिती घेत आहेत
डहाणू विधान सभेचे आ. विनोद निकोले यांनी वडवली गावाची पाहणी करून नुकसानग्रस्त घरांना अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले
तलासरीतील कुर्जे नदीवर धरण असून या धरणाची क्षमता ३५ दश लक्ष घन मिटर इतकी असून उंची ७०.४० फूट आहे,हे धरण मातीचे असून धरणाला तीन दरवाजे आहेत, दापचरी दुग्ध प्रकल्प साठी १९७० साली उभारण्यात आलेले धरण सध्या जल संपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

