तलासरी प्रतिनिधी,
तलासरी भागात मुसळधार पाऊस,
तलासरी भागात काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्याना पूर आला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची नोंद नाही.
पावसामुळे गरबा खेळता येत नसल्यानमुळे तरुणाई हिरमूसली आहे,मंडप, डेकोरेशन,डीजे,ऑर्केस्ट्रा यावर केलेला लाखो रु.चा खर्च वाया गेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गरब्या साठी टाकलेले मंडप उडून गेले.
दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या,त्यामुळे भागातील अनेक पूल पाण्याखाली गेले व वाहतूक बंद पडली.अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते,
मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बाजारपेठेत शुक शुकाट दिसत होता.

