Author: दीपक मोहिते

अनंत भोईर, पालघर, आरोग्यमंत्र्यांचा पालघर जिल्ह्याचा धावता दौरा,आरोग्य व्यवस्थेची पाहणी, पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता राज्याचे आरोग्य कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी काल पालघर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मंत्री महोदयांनी येत्या सहा महिन्यात मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर व नंडोरे येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवर नियोजन करणार असल्याचे स्पष्ट केले. पालघर जिल्हा निर्मितीनंतर आपला जिल्हा जरी प्रगतीपथावर असला तरीही पालघर जिल्ह्यात आरोग्यवस्थेबाबत अनेक प्रश्न व समस्या ” जैसे थे,” स्थितीत आहेत.ही बाब नाकारता येणार नाही.पालघर जिल्ह्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असे मनोर येथील गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले २०० बेडचे ट्रॉमा केअर सेंटर व नंडोरे येथील…

Read More

दीपक मोहिते, क्रूर सरकारचा निर्दयीपणा, आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या…. बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावचा रहिवासी असलेल्या कैलास नांगरे या तरुण शेतकऱ्याला राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता.त्या युवा शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्यावर्षी १५ डिसे.२०२४ रोजी कैलास नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील १४ गावांना खडकपूर्ण जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं,या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होत. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमी प्रमाणे त्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार,गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल, अशा प्रतीक्षेत काढली.मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे लक्षात…

Read More

दीपक मोहिते, राज्य उष्णतेने फणफणले, सावधान…! उष्णतेचा पारा ३७ अंशावर.. यंदा फेब्रु.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.आज पालघर जिल्ह्याचा पारा ३७ अंशावर गेल्यामुळे दुपारी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.मे महिन्याच्या मध्यास तो ४० वर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय हवामान विभागाने यंदा उष्म्याचा कहर होणार असून एप्रिल व मे महिन्यात राज्यातील जनता या उष्णतेच्या लाटेत होरपळून निघेल,अशी भिती व्यक्त केली आहे.तसेच या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.तसेच भूगर्भातील पाणीसाठ्यावरही विपरीत परिणाम होईल,असे सांगण्यात येत आहे.पालघर जिल्हा हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथील हवामान दमट आहे.त्यामुळे उष्म्याच्या काळात घामाच्या धारा वाहतात.पालघर जिल्ह्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नितेश राणे इतिहास बदलायला निघाले आहेत, हल्ली राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बेताल वक्तव्ये करत असतात.त्यामध्ये भाजपचे नितेश राणे,शिंदे गटाचे संजय शिरसाठ या दोघांचा वरचा नंबर लागतो.मंत्रिपदावर वर्णी लागल्यापासून नितेश राणे यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे.हलाल मटण,मशीदीत घुसून मारू व आता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असे सांगत इतिहासाची पाने फाडण्याचे प्रकार सुरु केले आहेत.त्यामुळे इतिहास अभ्यासकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुस्लिम धर्मीयांबद्दल सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्यांची ही जी मालिका सुरू केली आहे,ती वेळीच आवरणे गरजेचे आहे. कोणताही आधार नसताना राणे यांनी शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे स्पष्ट…

Read More

सुरेश वैद्य, सफाळे पालघर जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न, राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय दिवसीय कार्यशाळा आज जिल्हा परिषद, पालघर येथे आयोजित करण्यात आली.ही कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृह येथे पार पडली. कार्यशाळेत जल जीवन मिशन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा, पाणी गुणवत्ता परीक्षण, शुद्धीकरण प्रक्रिया, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पाणीपुरवठा,तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका रुपाली सातपुते,पाणी व स्वच्छतेचे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर,कार्यकारी अभियंता ( पाणीपुरवठा ) राजेश पाध्ये इ.वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे महिला स्वयंसहाय्यता समूह निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन, नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती,जव्हार येथे महिला स्वयंसहाय्यता समूह निर्मित उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद,पालघरच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तथा जिल्हा अभियान संचालक, एमएसआरएलएम-पालघर आणि डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक एमएसआरएलएम-पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण महिलांना त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी या प्रदर्शनात महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेली विविध उत्पादने सादर करण्यात आली.यामध्ये पापड, नाचणी सत्व,नाचणी लाडू, वारली पेंटिंग, हातसडीचे तांदूळ,उडीद,शेवगा पावडर, गवती चहा,पावडर,तागाची फुले,अशा अनेक वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमाला…

Read More

शुभम सावंत,विरार, विराट फाउंडेशनतर्फे १५ व १६ मार्च रोजी विरार येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विरार येथे येत्या १५ व १६ मार्च असे दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याच कार्यक्रमात खाद्य व कला महोत्सव होणार आहे.सदर सांस्कृतिक कार्यक्रम विरार येथील अमेय क्लासिक क्लब येथे होणार आहे. या कार्यक्रमात नृत्य,नाटक, गायन,आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत. ज्या महिलांना आपल्या व्यवसायाचा प्रचार करायचा आहे,त्यांनी स्टॉलसाठी नोंदणी लवकरात लवकर करावी. ही संधी तुमच्या उत्पादनांना मोठ्या मंचावर पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल,असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.त्यासाठी खालील व्यक्तीशी संपर्क साधण्याचे आयोजकांनी कळवले आहे. मिताली साळुंखे, ८८३०८४२०७५, अंजली कदम, ८८३०१२८१३९, पूजा दळवी, ८२०८६१६६४९, स्मिता सावंत,…

Read More

संजय लांडगे,वाडा वाडा येथे अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक, खोडाळा-वाडा येथे एका वाहनातुन अंमली पदार्थांची अवैधरित्या वाहतुक होणार आहे,अशी खात्रीलायक माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून हारोसाळे गावाच्या हद्दीत सायं.५.४५ सुमारांस खोडाळा बाजुकडुन आलेल्या कारला हारोसाळे तलावाजवळ अडवले.पोलिसांच्या सूचनेनुसार कारचालकाने रस्त्याच्या बाजूला कार उभी केली.त्यावेळी त्या मोटार कारमध्ये दोन इसम बसले होते.फारुक नजीर शेख, ( वय ५३ ) व अविनाश दिलीप राजभोज, (वय २७) दोघे राहणार अस्वली स्टेशन,ता. इगतपुरी,अशी त्यांची नावे असुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता चालकांच्या सिटच्या मागच्या बाजुस एक काळया-पिवळसर रंगाचे २ बॉक्स सापडले.कारमध्ये सापडलेल्या मालाबाबत इसमांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर : भाजपच्या पथ्यावर, तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पालघर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन जागा जिंकत जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड बसवली आहे. या अभूतपूर्व विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे.वसई व नालासोपारा विधानसभा आपण जिंकू, असा विचार स्वप्नात देखील त्यांनी केला नव्हता.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांना जे यश मिळाले,ते त्यांना अपेक्षितच होते.पण वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा अनपेक्षितरित्या हाती आल्यानंतर त्यांच्या पक्षाचा ग्राफ आता सतत वर जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत आहेत,सदर बाब त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरणारी आहे.या निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी त्यांना भरपूर अवधी…

Read More

संदीप जाधव,बोईसर आसनगाव येथे कोट्यवधी रु.चा जमीन घोटाळा,जनआंदोलन उभारण्याचा आव्हाडांचा इशारा, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगाव येथे शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहारावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ट्विटरवरून (X) वरून चांगलेच सुनावले आहे. “शासन आदेशांचे उल्लंघन करून डहाणू उपनिबंधक कार्यालयाने शासकीय जमीन विकण्याचा प्रकार केला आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गुंतले असल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही.मुख्यमंत्री साहेब,हे प्रकरण जर दडपले जात असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे ,” असे आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ” हा सरळसरळ सत्तेचा गैरवापर…

Read More