- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा सेंद्रिय खत निर्मिती करण्याचे कृषी विभागाचे आवाहन, खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची काढणी- मळणी किंवा पिकांची कापणी झाल्यानंतर शेतातील निघालेला काडीकचरा एकत्रित करून पेटवून दिला जातो.मात्र,शेतातील काडीकचरा शेतातच कुजवून सेंद्रिय खत तयार करणे, आवश्यक आहे.याच कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. काडीकचरा जसा आहे त्याच अवस्थेत ठेवून जमिनीत खोल नांगरणी करून एकीकृत कीड व्यवस्थापनाची सुरुवात करणे गरजेचे आहे.शेतातील कचरा जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी करणे होय.त्यामुळे शेतकऱ्यांनी कचरा न पेटवता कचरा शेतामध्येच कुजवावा आणि शेतीला पोषक अन्नघटक द्यावेत. कचरा जाळल्याने हवेत प्रदूषण निर्माण होऊन शोषणाच्या आजाराचा देखील धोका निर्माण होतो. शेतामध्ये राहणाऱ्या शिल्लक…
वसंत भोईर,वाडा गॅस पाईपलाईन जवळ अनधिकृत उत्खनन,तिघांवर गुन्हा दाखल, तालुक्यातील खरीवलीतर्फ पौलबारे या गावाच्या हद्दीतून रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असून या पाईपलाईनजवळ अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तीन इसमांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई महसूल विभागाने केली आहे.या कारवाईमुळे पाईपलाईन जवळ अनधिकृत उत्खनन करणा-यांचे धाबे दणाणले आहे. संदिप दुदांराम पाटील,संदिप पुंडलिक पाटील,व्यवस्थापक मेसर्स जि. आर.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.व इतर अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर व ठाणे जिल्ह्यातून रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असून या वाहिनीपासून काही मीटर अंतरावर खोदकाम उत्खनन करण्यास बंदी घातली आहे,असे असताना खरीवली या गावच्या हद्दीत रिलायन्स कंपनीची किंवा महसूल…
दीपक मोहिते, ” भ्रष्टाचाराची गटारगंगा,” वसई विरार मनपा ; हजारो कोटी रु.खर्च होऊनही शहराला बकालपणाच, वसई विरार शहर महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व दैनंदिन साफसफाईवर ( कचरा उचलणे,रस्ते झाडणे ) हजारो कोटी रु.खर्च करते.पण आरोग्य विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शहराचा बकालपणा काही नाहीसा होऊ शकला नाही.त्यामुळे दर पावसाळ्यात येथील करदात्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र असंच सुरू आहे. या महानगरपालिकेला अधून मधून स्वच्छतेचे पुरस्कार मिळत असतात,ते कसे मिळतात ? हा एक संशोधनाचा विषय आहे.असो,पण हे पुरस्कार देताना कोणते निकष लावण्यात येतात,हे त्या परमेश्वरालाच माहीत असावे.शहराच्या अनेक भागात सकाळी अकरा वाजेपर्यंत कचऱ्याचे ढीग पाहायला…
सचिन परब,वसई, लाखो रु. किमतीचा पोकलेन वापरा अभावी बाद, वसई (प.) येथील सनसिटी नाल्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिकेच्या मालकीचे ” पोकलेन ” मशीन वापरा अभावी मातीत रुतून बसले आहे. अंदाजे पन्नास लाख रु.पेक्षा अधिक या मशीनची सध्या किंमत आहे.जनतेच्या कर रुपी पैशातून विकत घेण्यात आलेली ही मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बाहेर काढण्यास महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांना वेळ मिळालेला नाही ही अत्यंत खेदाची आणि संतापजनक बाब आहे. नाल्याच्या पाण्यात गंजण्यासाठी आणि नादुरुस्त होण्यासाठी ही मशीन सोडून देण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे १) या वर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या नालेसफाईचे काम अजूनह सुरू झालेले नाही,या नाल्यात पाणफुटी च्या वेलीही नाहीत,मग हे पोकलेन मशीन…
दीपक मोहिते, ” केवळ भुलभुलैय्या,” मनपा बैठक : केवळ एक औपचारिकता,फारसे काही निष्पन्न होणार नाही, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रचलित पाणीपट्टी दर सुधारणा व मालमत्ता मागणी देयकात पाणीपुरवठा व मलप्रवाह लाभकर आकारणीबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्वपक्षीय समितीची काल बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीत नागरिकांच्या वतीने प्रशासनाला सूचना करण्यात आल्या,असे ऐकायला मिळत आहेत.त्या सूचना नक्की काय आहेत ? त्यांच्या या सूचना प्रशासनाने किती स्विकारल्या,याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. महानगरपालिकेने जी बैठक बोलावली,ती एक औपचारिकता होती.त्यामुळे या सूचना कितपत अमलात येतील,याविषयी साशंकताच अधिक आहे.महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाबाबत लोकप्रतिनिघींचा किती अभ्यास असतो,हा विषय देखील अत्यंत गहन असाच आहे.बांधकाम,साहित्य खरेदी, घरपट्टी लावणे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडीने वसईतील लाखो अनधिकृत बांधकामाचीही सखोल चौकशी करावी, नालासोपारा पूर्वेस शासकीय कामासाठी आरक्षित असलेल्या जमिनी बळकावून भूमाफियांनी अनधिकृत इमारती बांधल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने चौकशी व सखोल तपास सुरू केला आहे.हा वसईकरासाठी एक आशेचा किरण आहे.मात्र सक्तवसुली संचालनालयाने ही चौकशी केवळ या ४१ इमारतीपूरती मर्यादित न ठेवता ती या उपप्रदेशात उभारण्यात आलेल्या लाखो अनधिकृत बांधकामाचीही करायला हवी.या उपप्रदेशात गेल्या २५ वर्षात झालेला एफएसआय घोटाळा तसेच वन,आदिवासी व भूमीपुत्रांच्या खाजगी जमिनीची झालेली लूट,या सगळ्याची चौकशी व तपास होण्याची गरज आहे. विकास आराखड्यातील आरक्षणे रातोरात बदलणे,बोगस सीसी,सिडकोच्या खोट्या परवानग्या,इ.हातखंडे वापरून गोरगरीब जनतेला अक्षरशः नागवले गेले.या सर्व गैरकामात मनपा व मंत्रालयातील…
दीपक मोहिते, ” सावधान,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका,भाजप सहज खिश्यात घालणार, राज्य विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळता अन्य साऱ्या पक्षात सध्या एकप्रकारची मरगळ आली आहे.विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे सर्व पक्षाचे अवसान पार गळले आहे.दुसरीकडे भाजप मात्र अत्यंत छुप्या पद्धतीने निवडणुकीच्या कामाचे नियोजन करत आहे.कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका व जिल्हा परिषदा जिंकायच्याच या निर्धाराने पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपचा डोळा मुंबई व ठाणे महानगरपालिकेवर असून या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो.या दोन्ही ठिकाणी जागावाटप करताना भाजप हा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाला फारशा जागा देतील असे वाटत नाही.आजच्या घडीला भाजपचे नेते या निवडणुका…
जव्हार प्रतिनिधी, मनोर-जव्हार राज्यमार्गाची दुरुस्ती व डागडुजीची मागणी, नाशिक येथे होणाऱ्या अर्धकुंभ मेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील महत्वाचा राज्यमार्ग एनएच-१६० ए ( मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर ) ची दुरुस्ती व डागडुजीचीमागणी खा.डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.या राज्यमार्गाची दुरुस्ती व चौपदरीकरणासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अर्धकुंभ मेळा हा लाखो भाविक,पर्यटक आणि साधू-संतांचे प्रमुख आकर्षण आहे.देशभरातून भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.या काळात मुंबई-नाशिक, पालघर-नाशिक आणि ठाणे-नाशिक मार्गांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात वाढतो.पालघर जिल्ह्यातील मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर मार्ग हे धार्मिक,पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असून…
शुभम सावंत,विरार विरार येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांच्यातर्फे नुकतेच रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साथिया ट्रस्ट ब्लड सेंटर यांच्या सहयोगाने ३० युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आली होती.डोळ्यांच्या तपासणीसाठी ” इन्फिगो आय हॉस्पिट,” दंततपासणीसाठी डॉ. झैनब मर्चंट,तसेच सामान्य आरोग्य तपासणी व सल्ल्यासाठी डॉ.पलक परिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिबिरीत एकूण ८६ लोकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३६ लोकांची दंत तपासणी व ५० लोकांची नेत्रचिकीत्सा तपासणी करण्यात आली. रोटरॅक्ट क्लब ऑफ…
सचिन परब, विरार, विरार येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन कार्यक्रम संपन्न, सृजन विरार या संस्थेतर्फे विवा महाविद्यालयाच्या विजयानंद पाटील रंगायतन येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन मैफल पार पडली.या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात पं.शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पुणे येथील डॉ.शंतनु गोखले यांच्या संतूर वादनाने रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. सुरुवातीस वाद्याची ओळख त्यात कालानुरूप झालेले बदल,अशी उपयुक्त माहिती त्यांनी दिली.प्रथम राग वाचस्पती सादर करून त्यांनी हिमाचल प्रदेशात लोकप्रिय असलेल्या पहाडी रागातील एक धून सादर केली. द्वितीय सत्रात पं.डी.के दातार यांचे शिष्य राजन माशेलकर यांनी व्हायोलिन आणि उस्ताद मुन्नेखान…
