वसंत भोईर,वाडा
सेंद्रिय खत निर्मिती करण्याचे कृषी विभागाचे आवाहन,
खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची काढणी- मळणी किंवा पिकांची कापणी झाल्यानंतर शेतातील निघालेला काडीकचरा एकत्रित करून पेटवून दिला जातो.मात्र,शेतातील काडीकचरा शेतातच कुजवून सेंद्रिय खत तयार करणे, आवश्यक आहे.याच कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
काडीकचरा जसा आहे त्याच अवस्थेत ठेवून जमिनीत खोल नांगरणी करून एकीकृत कीड व्यवस्थापनाची सुरुवात करणे गरजेचे आहे.शेतातील कचरा जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी करणे होय.त्यामुळे शेतकऱ्यांनी कचरा न पेटवता कचरा शेतामध्येच कुजवावा आणि शेतीला पोषक अन्नघटक द्यावेत.
कचरा जाळल्याने हवेत प्रदूषण निर्माण होऊन शोषणाच्या आजाराचा देखील धोका निर्माण होतो.
शेतामध्ये राहणाऱ्या शिल्लक कचऱ्यापासून खत तयार होते. त्याचा पुढे पिकांना मोठा फायदा होऊ शकतो.
पिके कापल्यानंतर शिल्लक राहणारे पिकांचे अवशेष रोटाव्हेटरच्या साहय्याने जमिनीत गाडून टाका.
शेतामधील शिल्लक कचऱ्याला आग लावल्यास केवळ कचराच जळतो,असे नाही तर त्यासोबत माती देखील जळते.
सध्या सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे.जैविक, कंपोस्ट खतामुळे हे सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवता येते. याद्वारे शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ करण्यास मदत होते. शेतकऱ्यांना नफाही होतो, असे कृषिक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
शेतातील पिके कापल्यानंतर जो कचरा शिल्लक राहतो, तो कचरा जाळल्याने त्यासोबत माती देखील जळते.
नवीन पिकांवर रासायनिक खतांचा मारा केला जातो,त्यासाठी खर्च देखील होतो.कचरा जमिनीत गाडल्यास खतांवर होणारी उधळपट्टी कमी होईल.
शेतातील कचऱ्याला आग न लावता तो कचरा जागेवरच कुजवणे गरजेचे आहे.त्यामुळे जमिनीला खतही मिळेल आणि जमिनीचा पोतही वाढेल.
– संजय घरत,कृषी अधिकारी,

