Author: दीपक मोहिते

सुरेश काटे,तलासरी कळमदेवी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, आदिवासी विकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा कळमदेवीच्या नवीन इमारतीचे उदघाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक,खा.हेमंत सवरा, आ.विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कलमदेवी आश्रम शाळेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनासोबत विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय आश्रमशाळेत अनेक अडचणी,सोयी सुविधाचा अभाव होता.त्या अडचणी टप्पाटप्पाने सोडवण्यात येत आहेत.अनेक इमारती जुन्या जीर्ण झाल्या असून त्यांचे नूतनीकरण व नव्याने बांधकाम…

Read More

वसंत भोईर,वाडा सततच्या खोदकामाने कुडूस-चिंचघर-देवघर रस्त्यावर वाहतूककोंडी, वाडा तालुक्यातील कुडूस -चिंचघर- देवघर रस्त्यावर गुजरात गॅस पाईपलाईन कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सतत होणाऱ्या खोदकामामुळे रस्त्याचीही पार दुरावस्था झाली आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सध्या अतोनात हाल आहेत. प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.कुडूस-चिंचघर- देवघर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून,या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर अवघड वाहनाची वाहतूक होत असते. अशा परिस्थितीमध्ये या खोदकामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक…

Read More

दीपक मोहिते, आज जागतिक हवामान दिन : उद्देश अद्याप सफल होऊ शकला नाही.. दरवर्षी जगभरात जागतिक पर्यावरण,जागतिक जल,जागतिक वन,जागतिक हवामान दिनासह विविध दिन आपण साजरा करत असतो.हे दिन साजरा करण्यामागे ” जनजागृती, “असा उद्देश असतो.पण तो कितपत यशस्वी ठरला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.हे विषय मानवी थेट निगडित असुन त्याचे चक्र विस्कळीत झाले तर ते विनाशाला आमंत्रण देणारे ठरते.सतत आदळणारी वादळे,भूकंप व त्सुनामी या साऱ्या घटना त्याची उदाहरणे आहेत. आज जागतिक हवामान दिन आहे.तो एक सोपस्कार म्हणून जगभरात साजरा होईल.२३ मार्च १९६१ साली आपण पहिला हवामान दिन साजरा केला.ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये बदलत्या हवामानाची सर्वप्रथम दखल घेण्यात आली होती.हवामानशास्त्राचा भक्कम वैज्ञानिक…

Read More

तेजस काटकर,विरार अर्नाळा किल्ल्यात वारसा फेरीचे आयोजन, रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांच्यातर्फे काल अर्नाळा किल्ल्यावर वारसा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये असंख्य तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या वेळी इतिहासाचे अभ्यासक,निनाद पाटील यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्याना मार्गदर्शन केले. अर्नाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची सखोल माहिती देण्यात आली. किल्ल्याचे वास्तुशास्त्र, मराठ्यांचा इतिहास आणि त्याचे संरक्षण व्यवस्थेतील महत्त्व याविषयी निनाद पाटील यांनी परिपूर्ण माहिती दिली. रोटरॅक्ट क्लबच्या या उपक्रमामुळे युवा पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख होण्यास मदत झाली. सहभागी सदस्यांनी किल्ल्याच्या भक्कम तटबंदीपासून ते त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांपर्यंत सर्व काही अनुभवले.वारसा फेरी मध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ विरारचे अध्यक्षजी रोट्रॅक्ट तेजस,रोट्रॅक्ट निहाल,साहिल, प्रणित,खुश,कनिष्का हे…

Read More

दीपक मोहिते, परमेश्वरा,पुन्हा असे अस्मानी संकट नको रे बाबा… पाच वर्षांपूर्वी २२ मार्च रोजी जीवघेण्या कोरोनाचे आपल्या देशात आगमन झाले. सुरुवातीस या कोरोनाने चीन या देशात धुमाकूळ घातला होता.त्यावेळी या आजाराच्या भीषणतेची जगाला कल्पना पुसटशी कल्पना नव्हती.पण अवघ्या काही दिवसात या आजाराची जगाला भीषणता जाणवू लागली.या आजाराच्या जिवाणूची उत्पत्ती कशी व कोठून झाली,याविषयी कोणतीही माहिती त्यावेळी कोणालाही नव्हती.त्यामुळे सारे जग चिंतेत सापडले होते.कालांतराने या आजाराच्या जिवाणूची निर्मिती चीनच्या वूहान या शहरातील एका लॅबमध्ये झाली हे उघड झाले.त्यानंतर जगातील सारे देश यावर उपाय करण्याच्या कामाला लागले. मात्र ज्या वेगाने फैलाव होत होता,तो रोखणे एकाही देशाला शक्य होत नव्हते. ” एकमेकांशी होणारा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, कै. विष्णु उर्फ (अण्णा ) हेमंत मुकणे – मानवतेच्या सेवेसाठी एक समर्पित जीवन. जीवन हे क्षणभंगुर असले तरी काही माणसे अशी असतात की त्यांच्या कार्यामुळे त्यांची आठवण कायम ताजी राहते. कै. विष्णुपंत (अण्णा) हेमंत मुकणे हे असेच एक थोर व्यक्तिमत्त्व होते.ज्यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले.त्यांच्या निधनाने केवळ जव्हार तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान योद्धा गमावला आहे.कै.विष्णु ( अण्णा ) हेमंत मुकणे यांचा जन्म अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षी वडीलांचे छत्र हरवले.त्या काळात विधवा महिलांना समाजाने दिलेली वागणूक फारशी सन्मानजनक नसायची.मात्र,त्यांच्या आई भागूबाईंनी हार न मानता आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. विष्णु (…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीमध्ये जिवंत सातबारा मोहीम, महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिम अंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधी अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्यामुळे अडचणीना सामोरे जावे लागते.या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहिम राबवण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. १ ते ५ एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करुन न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे. ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसासंबधी आवश्यक दरम्यान कागदपत्रे (…

Read More

जव्हार प्रतिनिधी जव्हार-धोपटपाडा येथे जागतिक जलदिनानिमित्त बंधाऱ्याचे उद्घाटन, रायतळे ग्रामपंचायतीच्याक्षेत्रात धोपटपाडा येथे दिगंत स्वराज्य फाउंडेशनच्या सहकार्याने आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले.गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतारणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या जलसंधारण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.व सदर कामाला आजपासून सुरवात करण्यात आली. गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दिगंत स्वराज फाउंडेशनच्या श्रद्धाताई शिंगारपुरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतारने व गावकऱ्यांनी मागणी केली होती.त्यांनी त्वरित दखल घेत गावाला पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रयत्नांना आज प्रत्यक्ष यश प्राप्त झाले. दिगंत स्वराज्य फाउंडेशनच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला असून या कार्यक्रमाप्रसंगी स्वतः…

Read More

वसंत भोईर,वाडा कच-याच्या आगीच्या धुराने गुदमरतोय कुडूसच्या नागरिकांचा श्वास कुडूस ग्रामपंचायत हद्दीत जमा होत असलेला कचरा चिंचघर रोड परिसरात टाकण्यात येत असतो.हा कचरा संध्याकाळच्या सुमारास तो पेटवून देण्यात येतो.आगीच्या धुराने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा श्वास गुदमरु लागला आहे.मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. कुडूस ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून तीचे उत्पन्न कोटींच्या घरात आहे.या ग्रामपंचायतीत दररोज अनेक टन कचरा जमा होत असतो. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून या कच-याची विल्हेवाट लावण्यात येते. चिंचघर रोड परिसरातील कचरा या भागात टाकण्यात येतो.व त्यानंतर त्या कचऱ्याला संध्याकाळच्या सुमारास या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होते.त्याचा त्रास लहान मुले व वयोवृद्ध…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा नगरपंचायतीत दलित वस्ती निधीचा अपव्यय, वाडा नगरपंचायतीमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू असून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता,गटार व सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत.ही सर्व कामे अंदाजपत्रकानुसार न होता भरमसाठ दराने होत आहेत. तसेच ही बांधकामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत.ठेकेदार आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहे तर याच निधीतून एका खाजगी सोसायटीत सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. रहिवासी तक्रारीत म्हणतात,सिद्धार्थ नगर ते रोहीदास नगर या रस्त्याच्या सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण निधीतून करण्यात आले होते.…

Read More