जव्हार प्रतिनिधी
जव्हार-धोपटपाडा येथे जागतिक जलदिनानिमित्त बंधाऱ्याचे उद्घाटन,
रायतळे ग्रामपंचायतीच्याक्षेत्रात धोपटपाडा येथे दिगंत स्वराज्य फाउंडेशनच्या सहकार्याने आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले.गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतारणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या जलसंधारण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.व सदर कामाला आजपासून सुरवात करण्यात आली.
गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दिगंत स्वराज फाउंडेशनच्या श्रद्धाताई शिंगारपुरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतारने व गावकऱ्यांनी मागणी केली होती.त्यांनी त्वरित दखल घेत गावाला पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रयत्नांना आज प्रत्यक्ष यश प्राप्त झाले.
दिगंत स्वराज्य फाउंडेशनच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला असून या कार्यक्रमाप्रसंगी स्वतः प्रकल्प समन्वयक रामदास बदादे,गुड गव्हर्नन्स प्रकल्प समन्वयक एकनाथ निखडे,तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प फिल्ड सुपरवायझर विजय भोगाडे,जयु भोरे,वैभव चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.या जलसंधारण उपक्रमामुळे धोपटपाडा गावातील पेसा ग्रामकोष समितीचे सदस्य देविदास गोविंद,तसेच ग्रामस्थ संजय सांबरे,सुभाष वझरे आणि इतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.उपस्थित ग्रामस्थांनी स्वराज फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा करत आभार व्यक्त केले.या जलसंधारण प्रकल्पामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.

