सुरेश काटे,तलासरी
तलासरीमध्ये जिवंत सातबारा मोहीम,
महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिम अंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधी अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्यामुळे अडचणीना सामोरे जावे लागते.या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहिम राबवण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
१ ते ५ एप्रिल दरम्यान
ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करुन न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे.
६ ते २० एप्रिल दरम्यान
वारसासंबधी आवश्यक दरम्यान कागदपत्रे ( मुत्यु दाखला,वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख/स्वंय घोषणापत्र,पोलीस पाटील / सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला,सर्व वारसांची नावे, वय,पत्ते व दूरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक,रहिवासी बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थनिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांच्यातर्फे वारस ठराव ई-फेरफार प्रणाली मंजूर करणे.
२१ एप्रिल ते १० मे पर्यंत
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करणे,त्यानंतर म.ज.म.अ.१९६६ च्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ दुरुस्त करणे, जेणेकरुन सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदवण्यात आल्या असतील.
त्या सर्व खतेदारांना उपरोक्त योजनेमुळे विविध प्रकराचे लाभ प्राप्त होणार आहेत. तलासरी तालुक्यातील संबधित गावातील शेतकरी, जमीनमालक यांनी ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांचेशी संपर्क करुन तात्काळ आपले वारसांबाबतची नोंद अधिकार अभिलेखात करुन घ्यावी.असे आवाहन तलासरी तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे

