तेजस काटकर,विरार
अर्नाळा किल्ल्यात वारसा फेरीचे आयोजन,
रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांच्यातर्फे काल अर्नाळा किल्ल्यावर वारसा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये असंख्य तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
या वेळी इतिहासाचे अभ्यासक,निनाद पाटील यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्याना मार्गदर्शन केले. अर्नाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची सखोल माहिती देण्यात आली. किल्ल्याचे वास्तुशास्त्र, मराठ्यांचा इतिहास आणि त्याचे संरक्षण व्यवस्थेतील महत्त्व याविषयी निनाद पाटील यांनी परिपूर्ण माहिती दिली.
रोटरॅक्ट क्लबच्या या उपक्रमामुळे युवा पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख होण्यास मदत झाली. सहभागी सदस्यांनी किल्ल्याच्या भक्कम तटबंदीपासून ते त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांपर्यंत सर्व काही अनुभवले.वारसा फेरी मध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ विरारचे अध्यक्षजी रोट्रॅक्ट तेजस,रोट्रॅक्ट निहाल,साहिल, प्रणित,खुश,कनिष्का हे पदाधिकारी सहभागी झाले होते.ही फेरी केवळ वारसा संवर्धनाच्या गरजेवर प्रकाश टाकणारी ठरली नाही,तर उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना देखील निर्माण झाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ विरारच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या ऐतिहासिक फेरीमुळे स्थानिक इतिहासाविषयी जागरूकता वाढली आणि सर्व सहभागींसाठी ही प्रेरणादायी सफर ठरली.

