Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर संकट तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला, काकडी,मिरची,भेंडी,दुधी, भोपळा,घोसाळी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. वाडा तालुक्याचे तापमान सध्या ३९ ते ४० अंशापर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळे करपत असून त्यांचा आकार लहान होत आहे. अशातच घोसाळी,मिरची पिकांवर करपा रोग पडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील जाळे,वारनोळ,गातेस, पिंपळास,गुंज,देवघर, बुधावली परिसरातील शेतकरी उन्हाळी भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न घेतात भिवंडी, कल्याण,ठाणे,वसई,विरार येथून मागणी होत असते.परंतु गेले चार-पाच दिवस वातावरणात उष्मा वाढल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकरी प्रदीप गोरे यांनी दिली.

Read More

संजय लांडगे,वाडा जीवशास्त्र विषयात वाड्याचे प्रसाद इसामे यांना सुवर्णपदक, वाड्याचे प्रसाद इसामे यांनी मुंबई येथील डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमधून जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदक पटकावत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत अभ्यास अकॅडमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील रहिवासी असलेले प्रसाद इसामे,हे सध्या वाडा येथे राहत आहेत.खाजगी क्लासेसमध्ये शिकवून त्यांनी आपले पुढील उच्च शिक्षण चालू ठेवले होते.पुढे त्यांनी डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणात जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात १० पैकी १० गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले.या युनिव्हर्सिटीमधून ६ जणांना सुवर्णपदक मिळाले असून या…

Read More

वसंत भोईर,वाडा सर्दी,खोकला,तापाचे रुग्ण वाढले, गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.कधी उन्हाळा तर कधी गारवा तर मध्येच पावसाचा शिडकावा,या अशा संमिश्र वातावरणामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडू लागले आहे.त्यातच आईस्क्रीम,सरबते,कोल्ड्रिंक आदीचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत असल्याने मुलांचे आरोग्य बिघडत आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये,यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना जन्मापासून ठराविक वयापर्यंत वेळेवर लस देणे गरजेचे आहे.त्यामुळे पालकांनी ही काळजी घ्यायला हवी. सध्या वातावरणात संमिश्र बदल होत आहेत. उन्हाचा कडाका सहन करावा लागतो.दिवसा वाढलेले तापमान तर रात्री किंवा पहाटे गारवा जाणवतो. त्यामुळे या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. यातून वेगवेगळे…

Read More

दीपक मोहिते, वसई महसूल विभागाची वेगवान मोहीम… ” जिवंत सातबारा मोहीमे,”तून ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार, सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे खरेदी-विक्री व्यवहार,कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून “जिवंत सातबारा मोहीम,” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वसई तालुक्यात १ ते ५ एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील. ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ( मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं…

Read More

जव्हार प्रतिनिधी, मुख्याध्यापिका प्रज्ञा शरद मुकणे यांचा भव्य सेवानिवृत्तीचा भव्य सोहळा संपन्न, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेतील उक्तीनुसार आपली जबाबदारी पार पाडणाऱ्याbप्रज्ञा शरद मुकणे ( उच्च श्रेणी मुख्याध्यापिका,जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड ) या काल वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती व काळीधोंड शाळेच्या वतीने त्यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बोरसे अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रावण खरपडे,पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी चौधरी,तसेच धानोशी गटाचे केंद्रप्रमुख चंदनसिंग जगताप उपस्थित होते.याशिवाय केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारमूर्ती प्रज्ञा मुकणे यांना…

Read More

अनंत भोईर,पालघर, मुख्य कार्य. अधिकारी मनोज रानडे यांनी साधला पत्रकारांसोबत संवाद, पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज पत्रकारांसोबत औपचारिक परिचय करून घेतला.यावेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक पत्रकारांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्ह्यात काम करताना कुपोषण, आरोग्य,शिक्षण आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाईल, ” जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, शिक्षणाच्या सुविधा आणि पाणीटंचाई यावर विशेष लक्ष दिले जाईल.त्यासाठी परिणामकारक उपाययोजना केल्या जातील.” असे स्पष्ट केले. संवादा दरम्यान पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सखोल चर्चा केली.त्यांनी कुपोषण,बालमृत्यू,मातामृत्यू, स्थलांतर,बोगस डॉक्टरांची समस्या,घरकुल योजना, जलजीवन…

Read More

रविंद्र राऊळ,मुंबई फॉर्टीप्लस स्पर्धेत मालवणी संघ ठरला विजेता, बोरीवली येथील शिंपोली गावातील श्री गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या चाळीस वर्षांवरील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेत मालवणी मास्टर्स संघ विजेता तर धारीवली मास्टर्स संघ उपविजेता ठरला. श्री गावदेवी मैदानात रंगलेल्या या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज – सुधीर ( धारीवली मास्टर्स ),उत्कृष्ट गोलंदाज – गणेश लिंबोरे ( मालवणी मास्टर्स ),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – सचिन कोम ( धारीवली मास्टर्स ) तर मालिकावीर – फ्लिन पाटील ( मालवणी मास्टर्स ) यांना घोषित करण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभाला आ.संजय उपाध्याय,माजी खा.गोपाल शेट्टी,भूषण पाटील,कमलेश शेट्टी,पंढरीनाथ भंडारी,कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त मुकेश भंडारी,सुनील पाटील,मोहन केणी,सुनील पाटील,विश्वनाथ म्हात्रे,निमेश…

Read More

दीपक मोहिते, घटस्फोटाची वाढती प्रकरणे, शाप की समाजाला जडलेला कॅन्सर ? घटस्फोट,हा शब्दच आता कॅन्सरसारखा वाटू लागला आहे.पूर्वी एखाद्याला कॅन्सर झाल्याचे कळले कि जीवाचा थरकाप व्हायचा,व त्याच्या मृत्यूची बातमी कधीही कानावर येईल,अशी मनाची धारणा व्हायची.आज त्याच कॅन्सर सोबत ” घटस्फोट,” नावाच्या नव्या कॅन्सरने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.मानवाने जुन्या कॅन्सरवर जगभरात संशोधन केले,हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी मानवाने केलेल्या प्रयत्नाला अपेक्षित यशही मिळाले व काही अंशी तो नियंत्रणातही आला. परंतु नव्याने आगमन झालेल्या कॅन्सरवर मात्र उपाय शोधणे, मानवजातीला अद्याप शक्य झाले नाही.जूना कॅन्सर,हा फ़क्त लागण झालेल्या एका व्यक्तीला मृत्युच्या दारी नेत असतो,परंतु घटस्फोटरूपी कॅन्सर,हा एकाच वेळी अनेकांचे जीव घेत असतो.या असाध्य…

Read More

दीपक मोहिते, पाणीटंचाईच्या झळा, पालघर जिल्हावासिय यंदा भीषण पाणीटंचाईत होरपळणार पालघर जिल्ह्यात सालाबादप्रमाणे यंदाही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस ती भेडसावू लागली आहे.शहरी भागात पाण्याचा सुळसुळाट तर ग्रामीण भागात महिलांची पाण्यासाठी पायपीट,असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.आगामी काळात या पाणीटंचाईची दाहकता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.पण लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासकीय अधिकारी अद्याप साखर झोपेत आहेत. एप्रिल ते जून अखेर,या काळात पालघर जिल्हा पाणीटंचाईमध्ये होरपळून निघत असतो.या काळात नद्या,तलाव,विहिरी, कूपनलिका,यामधील पाण्याची पातळी खोलवर जाते.यंदा तर या पाणीटंचाईची दाहकता अधिक जाणवेल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.कारण नद्या,तलाव,बंधारे सुकत चालले आहेत तर विहिरीमधील…

Read More

वसंत भोईर,वाडा वेताळ केसरी बोरांडा मानकरी ठरला उदय शेळके, तालुक्यातील बोराडा येथे कुस्तीचा फड रंगला होता.या कुस्ती स्पर्धेला राज्यासह बाहेरील राज्यातील सुमारे १५० मल्लांनी हजेरी लावली होती.यामध्ये मुलीही सहभागी झाल्या होत्या.तर स्पर्धेत ८० कुस्त्या रंगल्या.उदय शेळके वेताळ केसरी बोरंडाचा मानकरी ठरला.वेताळ क्रीडा मंडळ बोरांडा यांच्यावतीने या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामवंत मल्लांच्या कुस्त्या या परिसरातील प्रेक्षकांना बघायला मिळाल्या.पुणे येथील सह्याद्री संकुलनाचा मल्ल उदय शेळके याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्याला चांदीची गदा व २१ हजार रु.चे प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास विरार येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पाटील,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेश भोईर,उद्धव सेनेचे गोविंद पाटील,सदानंद बागुल,शिवसेना…

Read More