रविंद्र राऊळ,मुंबई
फॉर्टीप्लस स्पर्धेत मालवणी संघ ठरला विजेता,
बोरीवली येथील शिंपोली गावातील श्री गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या चाळीस वर्षांवरील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेत मालवणी मास्टर्स संघ विजेता तर धारीवली मास्टर्स संघ उपविजेता ठरला.
श्री गावदेवी मैदानात रंगलेल्या या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज – सुधीर ( धारीवली मास्टर्स ),उत्कृष्ट गोलंदाज – गणेश लिंबोरे ( मालवणी मास्टर्स ),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – सचिन कोम ( धारीवली मास्टर्स ) तर मालिकावीर – फ्लिन पाटील ( मालवणी मास्टर्स ) यांना घोषित करण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभाला आ.संजय उपाध्याय,माजी खा.गोपाल शेट्टी,भूषण पाटील,कमलेश शेट्टी,पंढरीनाथ भंडारी,कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त मुकेश भंडारी,सुनील पाटील,मोहन केणी,सुनील पाटील,विश्वनाथ म्हात्रे,निमेश माळी आदी उपस्थित होते.

