Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवाला बाप नसतो, विजयाला अनेक बाप असतात,पण पराभव हा कायम पोरका असतो.पराभवातून शहाणपण येत असते,असं म्हंटलं जातं.पण हल्ली पराभवातून शहाणं होण्यास कोणी तयार नाही.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक राजकीय पक्षात सध्या जे काही घडत आहे,ते पाहता पराभवाला बाप नसतो,हेच खरं असंच म्हणावं लागेल.सेनेचे राजापूर विधानसभेचे पराभूत उमेदवार राजन साळवी व उद्धव ठाकरे या दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा खूप काही सांगून गेला.साळवी यांनी आपल्या पराभवाची कारणमिमांसा करताना, ” माझ्या पराभवाला संजय राऊत व माजी खासदार विनायक राऊत,हे दोघे जबाबदार, ” असल्याचा आरोप केला.त्यानंतर साळवी व ठाकरे या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.झालेल्या पराभवाची जबाबदारी,ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी समजून प्रत्येकाने…

Read More

जव्हार प्रतिनिधी, स्वच्छता अभियानावरील नाटिकेने खोच शिक्षण परिषदेत भरला रंग, जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर सादर केलेली नाटिका उपस्थितांचे मन जिंकून बक्षीस मिळवण्यात यशस्वी ठरली.या नाटिकेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नितिन आहेर आणि सहकारी शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रसन्न वातावरणाचे विविध स्तरांतून कौतुक झाले. केंद्रप्रमुख दिलीप आवारी, विषयतज्ञ जाधव,दत्ता घोडके, प्रकाश पाटील,दिपक तांदळे,जयराम वाघ आणि प्रमुख पाहुणे आपा तुमडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना बक्षीस प्रदान केले.शाळा तयारीचे देखिल शिक्षकांनी कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान,चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे “सावित्रीबाई फुले” आणि ” पाणी,” या विषयांवर प्रभावी भाषण सादर…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे  शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापनदिन साजरा, वाडा,जव्हार, मोखाडा,विक्रमगड, डहाणू, शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी निस्वार्थपणे गेली ४० वर्षे सामाजिक व शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिवछत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापन दिन व संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांचा ७४ वा वाढदिवस मोखाडा,जव्हार, भिवंडी,वसई भागात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मोखाडा तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळा आशे येथे ४३५ विद्यार्थ्यांना मैत्री फाउंडेशन बोरीवलीतर्फे ब्लॅंकेट,बेडशीट,कंपास, मिठाई वाटप करून पुरुषोत्तम पाटील यांचा आश्रमशाळेतर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच जव्हार दुर्गम भागातील कर्मवीर भाऊराव पाटील आश्रमशाळा वावर वांगणी येथील ४२६ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मंडळातर्फे अन्नदान मैत्री फाउंडेशन तर्फे ब्लॅंकेट,चादर,…

Read More

जव्हार प्रतिनिधी, भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा,जव्हार येथे ” सावित्री उत्सव,” साजरा. नव्या वर्षातील पहिला उत्सव म्हणून ३ जाने.रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ” सावित्री उत्सव,” म्हणून भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा जव्हार,येथे उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या सूचनांचे पालन करीत हा नवीन उपक्रम महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती करून देण्यासाठी येणाऱ्या पिढीतील मुला-मुलींकरिता महत्वपूर्ण ठरत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनकुमार राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या.यावेळी प्रत्येक विद्यार्थिनींने आपल्या कपाळावरती सावित्रीबाई फुले यांच्या…

Read More

वाडा येथे ” वाचन संकल्प महाराष्ट्र, ” अभियानाचे आयोजन, उच्च व तंत्र शिक्षण कोकण विभाग व मुंबई विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार वाडा येथील शिक्षण संचलित शिक्षण संस्थेचे डॉ.शांतीलाल धनाजी देवशी कला महाविद्यालय व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा,” अभियान राबविण्यात येत आहे.१ ते १५ जाने.हा या अभियानाचा कालावधी असून या कालावधीत सामूहिक वाचन,साखळी वाचन,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथ परीक्षण,ग्रंथ दिंडी,वाचन विषयक पथनाट्य,वृत्तपत्र विश्व आणि वाचन संस्कृती, ग्रंथ प्रदर्शन,विज्ञान ग्रंथ वाचन ( विद्यार्थ्यांद्वारे), विद्यार्थ्यांचे ग्रंथ परीक्षण,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभियानाचा उद्घाटन सोहळा १ जाने.रोजी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाला.या प्रसंगी उद्घाटक म्हणून विचार मांडताना महाविद्यालयाच्या…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाड्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या, तालुक्यातील जामघर, नेहरोली,गातेस,अब्जा या चार ग्रामपंचायतींना वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अमोल पाटील यांच्यावतीने १५ वित्त आयोग ( वंधित निधी ) सन २०२४- २५ मधून चार ग्रामपंचायतींना घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या.त्याचे लोकार्पण काल ग्रामपंचायत जामघर येथे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या चार घंटा गाड्यांमुळे या ग्रामपंचायती मधील कचरा संकलनाचे काम आता सोपे होणार आहे. स्वच्छ व सुंदर गाव ठेवण्यासाठी या गाड्यांचा मोठा हातभार लागणार आहे. पाटील यांनी केलेल्या या कामाबद्दल या चार ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी जामघर ग्रामपंचायतच्या सरपंच दया मोकाशी,सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत गोळे,…

Read More

संदीप जाधव,बोईसर, बोईसर – कुंभवली येथे महिलांसाठी विधी व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर अंतर्गत कुंभवली ग्रामपंचायत हद्दीत महिलांसाठी विधी व कायदेविषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,बचत गटांच्या महिला तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविकांच्या स्वागत गीत व ईशस्तवनाने करून सरपंच ॲड.तृप्ती संख्ये यांनी महिलांचे हक्क,कायदे व महिलांना उपलब्ध असलेल्या विविध विधीमधील संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पालघर प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना त्यांच्या…

Read More

नवीन पाटील,सफाळे, मुलींना स्वावलंबी जीवन जगता येईल,असे शिक्षण दिले पाहिजे – स.पो.नी. विजया गोस्वामी, पालघर जिल्हा हा आदिवासी व ग्रामीण भाग असून आजही येथे बालविवाहाचे मोठे प्रमाण दिसून येते.त्यामुळे मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल व स्वावलंबी जीवन जगता येईल असे शिक्षण दिले गेले पाहिजे,असे मत केळवा सागरी पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी व्यक्त केले.३ जाने.रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी ” बालिका दिन, ” व ” महिला मुक्तीदिन, ” साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधून संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे सफाळे देवभूमी येथे समाजातील कर्तृत्ववान महिला तसेच सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार…

Read More

संदीप मेहेर, पालघर, पालघर जिल्ह्यात ” स्वच्छ माझे आंगण,” अभियान, जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहॆ.स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना,कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत ” स्वच्छ माझे आंगण, ” अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा -२ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत.कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, सावरोली पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकीचा काही भाग तोडण्यात येणार, विक्रमगड तालुक्यातील सावरोली गावातील काही पाड्यांसाठी ही योजना मंजूर झाली आहॆ.या योजनेची जलवाहिनी,विहीर अन्य कामे मार्गी लागली असून पाणी साठवणटाकीचे बांधकाम सुरू झाले आहॆ.या टाकीचे कॉलम व्यवस्थित नसल्यामुळे या टाकीचे काही कॉलम तोडण्याचा आदेश विक्रमगड येथील पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला दिले आहेत.ही कामे अशाच पद्धतीने चालू राहिली तर भविष्यात या जलजीवन मिशन योजनेचा पार बोजवारा उडालाशिवाय राहणार नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल, ” योजना,लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विक्रमगड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे व्यवस्थित व सुरळीतपणे सुरू करावीत,अशी…

Read More