वाडा येथे ” वाचन संकल्प महाराष्ट्र, ” अभियानाचे आयोजन,
उच्च व तंत्र शिक्षण कोकण विभाग व मुंबई विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार वाडा येथील शिक्षण संचलित शिक्षण संस्थेचे डॉ.शांतीलाल धनाजी देवशी कला महाविद्यालय व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा,” अभियान राबविण्यात येत आहे.१ ते १५ जाने.हा या अभियानाचा कालावधी असून या कालावधीत सामूहिक वाचन,साखळी वाचन,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथ परीक्षण,ग्रंथ दिंडी,वाचन विषयक पथनाट्य,वृत्तपत्र विश्व आणि वाचन संस्कृती, ग्रंथ प्रदर्शन,विज्ञान ग्रंथ वाचन ( विद्यार्थ्यांद्वारे), विद्यार्थ्यांचे ग्रंथ परीक्षण,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर अभियानाचा उद्घाटन सोहळा १ जाने.रोजी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाला.या प्रसंगी उद्घाटक म्हणून विचार मांडताना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.किशोरी भगत म्हणाल्या,दिवसेंदिवस वाचनाचा टक्का घटत आहे. डिजिटल माध्यमांमुळे विद्यार्थी विविध प्रकारच्या जीवन उपयोगी ग्रंथांपासून दूर जात आहेत. ही वाचन संस्कृतीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मानवास वाचनाला पर्याय नाही.
अभियानाचे नियोजन महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक धोरण २०२०कक्षचे प्रमुख प्रा.डॉ.कैलास जोशी,( प्रमुख मराठी विभाग ) यांनी केले असून या अभियानात सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होत आहेत.ही घटना वाचन संस्कृतीच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. असे प्रा. जोशी यांनी आपले मत व्यक्त केले.

