- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
संजय लांडगे,वाडा जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ वाड्यात भव्य मोर्चा, धर्म,जात,प्रांतांच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणाच्या विरोधात संविधान, लोकशाही व स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याच्या विरोधात आज वाड्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. जातीय अत्याचार,भेदभाव व सर्व प्रकारच्या हिंसेचा व शोषणाचा विरोध करण्यासाठी संविधान,लोकशाही, धर्मनिरपेक्षता,सामाजिक एकोपा,प्रेम व माणुसकीचे रक्षण करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जन सुरक्षा विधेयक तयार केले आहे.सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या…
जव्हार प्रतिनिधी, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जव्हार अमृतसरोवर येथे तालुकास्तरीय कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून आज जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरण संवर्धन,जागृती आणि कृती या त्रिसूत्रीच्या आधारे हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती कार्यालय, जव्हार येथून अमृत सरोवरकडे निघालेल्या जनजागृती रॅलीने झाली. ” वसुंधरेला वाचवा,” ” झाडे लावा,झाडे जगवा”, “स्वच्छ हवा, निसर्ग हवा”, “प्लास्टिक मुक्त व्हा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या रॅलीमध्ये गटविकास अधिकारी,सहा.गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,विविध विभागांचे प्रमुख,महिला कर्मचारी,भारती विद्यापीठ प्रशाला व जिल्हा परिषद काळीधोंड शाळेचे विद्यार्थी-शिक्षक,तसेच स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने…
दीपक मोहिते, ” राज-का-रण,” विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळता सर्वच पक्ष पार ढेपाळले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता बेमुदत लांबणीवर पडल्या असून याप्रकरणी होणारी सुनावणी निदान चार महिने तरी होणे शक्य नाही,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.त्यामुळे या निवडणुका कधी होतील,हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. निवडणुका लवकर होणार नाहीत,हे निश्चित झाल्यानंतर भाजप व शिवसेना ( उबाठा ) या दोघांनी पक्षबांधणीवर भर दिल्याचे स्पष्ट होत आहे.भाजपने राज्यात ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.लवकरच पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांच्या निवडणुका होणार आहेत.उद्धव यांच्या शिवसेनेने देखील दोन महिन्यांपूर्वी बरेच संघटनात्मक बदल केले होते.विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जबर फटका बसल्यामुळे हे संघटनात्मक बदल करण्यात आले.पण त्यांचा पक्ष…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जागतिक वसुंधरा दिन ; वेळीच सावध झालो नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ, आज जागतिक वसुंधरा दिन,पण तो साजरा करण्याच्या मनस्थितीत आज एकही देश नाही.हवेतील प्रदूषण,जलप्रदूषण व पर्यावरणाच्या स्थितीत झपाट्याने घसरण होत आहे.त्यामुळे मानवजातीला सध्या त्रास सहन करावा लागत आहे.कोरोनाच्या काळात मानवाचा संचार खंडीत झाल्यामुळे वसुंधरेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकली.तर दुसरीकडे संपूर्ण मानवजात,आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.वसुंधरेच्या गळ्याला नख लावण्यात येत असल्यामुळे वादळे,त्सुनामी,भूकंप, ऋतुमान बदलणे,नापिकी, अवकाळी पाऊस,अशा नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. वसुंधरेच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या सुधारणेवरून असा निष्कर्ष निघतो कि आपण सारे ग्लोबल वार्मिंगला किती कारणीभूत ठरलो होतो.स्वच्छ हवा,स्वच्छ पाणी,पक्षांचा किलबिलाट,या सर्वांपासून आपण…
सुरेश वैद्य,पालघर पालघर येथे इंटरऍक्टिव्ह सायन्स लॅबचे शानदार उद्घाटन, पालघर मधील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म.नी.दांडेकर हायस्कूल येथे इंटरऍक्टिव्ह सायन्स लॅबचे उद्घाटन राजाभाऊ चित्रे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट केदार काळे होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती नामजोशी होत्या. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त भरत उमराळे,संस्थेचे सेक्रेटरी जयंत दांडेकर,म.नी.दांडेकर हायस्कूलचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपेंद्र घरत,इंग्रजी माध्यम स्कूल कमिटीचे अध्यक्ष कमलेश वारया, कार्यकारणी सदस्य गंगाधर फड,प्रज्ञा ठाकूर व तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे विभूती चौधरी,नूतन पाटील,सोनार व शिक्षक उपस्थित होते.मुलांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून या इंटर ऍक्टिव्ह सायन्स लॅबचा उपयोग होणार आहे.विज्ञानातील प्रयोग स्वतः करून बघता येतील,अगदी सूर्य चंद्र तारे,ग्रहण दिवस-रात्र, वादळ कसं येतं,पायथागोरस सिद्धांत,अनेक…
संजय लांडगे,वाडा वाड्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन, राज्य शासनाने शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा विषय सक्तीचा केला आहे.या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर विरोध केला आहे. वाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. काल वाडा शहरात बस स्थानकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी हिंदी सक्तीची पत्रके जाळण्यात आली. या आंदोलनात मनसे तालुका सचिव स्वप्नील मोरे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा मोरे,शहर उपाध्यक्ष आदेश डेंगाने,उपशहर अध्यक्ष ओमकार साळुंखे,उपशहर अध्यक्ष करण यादव,उपशहर अध्यक्ष मित पाटील,शहर संघटक किशोर डेंगाने, महिला उप तालुका अध्यक्ष मंगल निकम, उप…
सुशील भोईर,वसई वसईत भाजपाची पक्षबांधणी ; बारा मंडळ अध्यक्षाची निवड, काल वसई तालुक्यातील भाजपाच्या बारा मंडळांच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या व बारा मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली.विरार पश्चिम मंडळ येथे पक्षाने विशेष लक्ष दिले होते व मंडळाचे निवडणूक अधिकारी म्हणून केदारनाथ म्हात्रे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मंडळात सर्वानुमते तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विशाल राऊत यांची निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पार पडताच आ.राजन नाईक यांनी जातीने उपस्थित राहून नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष विशाल राऊत व निवडणूक अधिकारी केदारनाथ म्हात्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,वसई तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी ज्या प्रमाणे वसईकर जनतेने…
दीपक मोहिते, ” लेखाजोगा,” राज – उद्धव एकत्र येणे ; हे केवळ क्षणिक वादळ, राज व उद्धव हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही,हे लवकरच पाहायला मिळणार आहे.ते एकत्र आले तर महाराष्ट्राचा काय व कसा फायदा होणार आणि नाही आले तर काय नुकसान होणार ? याविषयी लेखाजोगा मांडणे आवश्यक ठरते.त्याच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होईल,सांगणे कठीण असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही प्रमाणात बळ मिळू शकेल.हे दोघे एकत्र जरी आले तरी या दोघाना सत्तेच्या राजकारणात शिरकाव करणे,शक्य होणार नाही.कारण राज ठाकरे यांच्या मनसेला जनाधार नाही.त्यामुळे निवडणूक जिंकणे,हे या दोन भावांच्या सध्या तरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाराष्ट्राची घसरण थांबून राज्य पुन्हा क्र.१ वर यावे… येत्या १ मे रोजी आपले राज्य ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.दरवर्षी हा दिवस,राज्य वर्धापन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.१९६० साली याच दिवशी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे नेते कै.यशवंतराव चव्हाण यांच्या हाती मंगल कलश सोपवला होता.चव्हाण यांनीही आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली व राज्याला अल्पावधीत क्रमांक १ वर नेऊन ठेवले.या भूमीला पराक्रम,त्याग व देशप्रेमाची परंपरा असुन वासुदेव बळवंत फडके,वि.दा.सावरकर,राजगुरू,नाना पाटील व या सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांविरोधात लढा उभारून स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या भूमीतील अनेक शूरवीरांनी आपले सर्वस्व वेचले…
सुरेश काटे,तलासरी तलासरी भाजपच्या तालुकाध्यक्षपदी विवेक करमोडा, भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही संघटनात्मक बदल केले आहेत.आज भारतीय तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण तसेच पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरत रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याची व पालघर जिल्ह्याच्या कोअर कमिटीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. विवेक करमोडा यांच्या निवडीने तलासरीतील काही कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असले तरी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली भाजपचे माजी तालुका अध्यक्ष…
