- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीमध्ये धमासान सुरु झालंय… महायुतीमध्ये सध्या जे काही सुरू झाले आहे,ते पाहता भावी काळात महायुतीमध्ये काहीही घडू शकते.शिंदे यांचे वारंवार रुसणे व गावी जाऊन बसणे,अशा वागण्यामुळे भाजप देखील आता सर्जिकल स्टाईक करण्याच्या तयारीला लागला आहॆ.त्यासाठी भाजपकडून नवीन उदयाला संधी मिळण्याची शक्यता आहॆ.या सर्व घडामोडीमुळे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आता सोप्या राहिलेल्या नाहीत.शिंदे यांचा रुसवा व महायुतीमधील अज्ञात शक्तीकडून अजित पवार यांची कोंडी करण्याचे होत असलेले जाणीवपूर्वक प्रयत्न,त्यामुळे या दोन्ही गटाचे मंत्री,आमदार,खासदार प्रचंड तणावाखाली आले आहेत. मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्यापासून मंत्रिमंडळात आपल्याला योग्य वाटा न मिळणे,खातेवाटपात झालेला अन्याय व आता पालकमंत्रीपदे वाटप,यामुळे एकनाथ शिंदे यांची अवस्था “…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द गाजणार, अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा व त्यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी पहिल्यांदा उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेल्या ट्रम्पने या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा शेवटच्या टप्यात ७० मतांनी पराभव केला.या लढतीत ट्रम्प यांना २९३ तर हॅरिस यांना २२३ मते मिळाली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी बहुमताचा २७० हा आकडा गाठावा लागतो.या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून हॅरिस या ट्रम्प यांच्या वाढत्या मतांचा आकडा शेवटपर्यंत गाठू शकल्या नाहीत. शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प यांनी,आपल्या पहिल्या वहिल्या भाषणात आपण “…
जव्हार प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा काळीधोंड इमारतीचे उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत महाराष्ट्रात ४७७ शाळांची निवड झाली.यामध्ये जिल्हा परिषद काळीधोंड शाळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाली.या शाळेत पटसंख्या सतत वाढत गेली व प्रज्ञाशोध परीक्षेत २०१९ पासून सतत गुणवत्ता यादीत मुले झळकली.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बोरसे व माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे खरपडे यांनी सतत पाठपुरावा केला.त्यामुळे महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद शाळा काळीधोंड शाळेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत दखल घेतली. त्यानंतर समितीने अनेक भौतिक सुविधाबाबत पाठपुरावा केला.या शाळेची पटसंख्या ३५७ असून एकूण वर्ग पहिली…
अनिल विचारे,विरार पूर्व, मॅरेथॉन स्पर्धा : छायाचित्रण स्पर्धेत राकेश रावल अव्वल, वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित गेल्या ८ डिसें.२०२४ रोजी झालेल्या १२ व्या राष्ट्रीय वसई विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धमधील छायाचित्रण स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे लागला आहे. राकेश रावल या छायाचित्रकाराने प्रथम क्रमांक पटकावला आहॆ. प्रथम क्रमांक ( रू.१५०००/- व सन्मानचिन्ह ) राकेश रावल, द्वितीय क्रमांक ( रू.१००००/- व सन्मानचिन्ह )राजेंद्र तुपे. तृतीय क्रमांक ( रू.५०००/- व सन्मानचिन्ह ) शिवराज वैद्य उत्तेजनार्थ-१ ( सन्मानचिन्ह) नितिन लवाटे, उत्तेजनार्थ-२ (सन्मानचिन्ह ) श्री.मनहर खत्री, छायाचित्रण स्पर्धेचा बक्षिस समारंभाची तारीख व दिनांक स्वतंत्ररित्या क्रीडा विभागामार्फत प्रसिद्धी करण्यात येणार आहॆ. क्री
चोरी, लुटमार करणाऱ्या चौकडीला वाडा पोलिसांनी केली अटक वाडा भिवंडी महामार्गावर आयशर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौकडीला सि.सि.टि.व्ही.कॅमेऱ्याच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघाना वाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबरनाथ हून आलेला टेम्पो आबिटघरला जात असताना रात्रीच्या सुमारास वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या आयशर टेम्पो चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडून पाच हजार रू व एक ओपो कंपनीचा मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले होते.पुढे आणखी एका ठिकाणी चोरी करत असताना स्थानिक नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी अन्य दोघेजण पळून गेले होते,त्यांना शहापूर तालुक्यातील कांदळी येथून…
सुरेश काटे,तलासरी, बीएमडब्लूची रिक्षाला धडक दोन जखमी,रिक्षाचा चक्काचूर, तलासरी पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गावर आमगाव येथे भरधाव बीएमडब्लू कारने रीक्षाला आज दुपारी जोरदार धडक दिल्याने रीक्षाचा चक्काचूर झाला.त्यातील दोघा प्रवाशांना जबर दुखापत झाली.त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव उपचारासाठी दाखल केले. सध्या महामार्गाचे व्हाईट टॅपिंगचे काम सुरू असून नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाता चे प्रमाण वाढले आहे बीएमडब्लू कार क्रमांक HR 02, AD 0099 या भरधाव येणाऱ्या कारने रिक्षा क्रमांक GJ 15, XX 1880 ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला तर अपघातानंतर कार बाजुला असलेल्या खड्डयात पडली. या अपघातात रिक्षामधील प्रवासी इश्वती लक्ष्मण कालात,वय ५० वर्षे,राहणार वरवाडा,आणि निलेश पलज्या शिंगडे वय…
सुगंध भोईर,कामण, वसईतील पर्यटनस्थळांच्या विकासाची पालकमंत्र्याकडे मागणी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन तुंगारेश्वर व परशुराम कुंड या ‘क’ वर्गिय तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांच्या विकासाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणी संदर्भात पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वनमंत्री गणेश नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तुंगारेश्वर व परशुराम कुंड या तिर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला होता व विकासासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्र पाठवून विकास प्रस्तावासाठी…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातून अनेक दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा निमित्त २६ जाने.रोजी त्र्यंबकेश्वर येथे यात्रा आहे. त्यासाठी वाडा तालुक्यातून पायी दिंड्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने विविध ठिकाणांहून निघाल्या आहेत. जगद्गुरू तुकोबाराय व ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामाचा जागर करत दिंड्या हळूहळू पुढे जात आहेत.तालुक्यातून निघालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.या दिंड्यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण झाले असून रस्ते भगवेमय झाले आहेत. वाडा तालुक्यातील गुंज दिनकरपाडा,पळसपाडा,मेट, देवघर,नांदनी,अंभरभुई, लोहपे,खानिवली,आबिटघर, तिळसा,खरिवली तर भिवंडी तालुक्यातील झिडके,सावरोली या भागातून पंधराहून अधिक दिंड्या निघाल्या आहेत. कोंढले परिसरातील दिनकरपाडा व पळसपाडा या दिंडीमध्ये पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.यामध्ये…
सचिन परब,विरार, विरार येथे सखी सोहोळा संपन्न,महिलांची लक्षणीय उपस्थिती, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती भारती देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ बहुजन विकास आघाडी,अमेय क्लासिक क्लब,यंग स्टार ट्रस्ट व विराट फाऊंडेशनतर्फे सखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सखी सोहोळा आयोजित करण्यात येत असतो.यंदाचा हा सोहोळा रवि.१९ जाने.रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात नृत्य,गायन,विविध खेळ तसेच मनोरंजनाचे खेळ ठेवण्यात आले होते.नव्याने सुरु करण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या सोहोळ्यातील महिलांना ३ पैठण्यासोबत लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलेला आकर्षक नथ देण्यात आली. साक्षी नाईक,सुप्रिया धनावडे, भूमिका मयावशी यांनी लकी ड्रॉ मध्ये नथ जिंकली तर स्नेहल पुराणिक,अंजली कदम आणि भाग्यश्री मायावशी…
अजय दीक्षित, ” बुमरँग,” अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस दोषी ; गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश, बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची हत्या ही एक फेक एन्काऊंटर असल्याचा ठपका या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने पाच पोलिसांवर ठपका ठेवला आहे.या अहवालामुळे राज्यसरकारचे गृहखाते व या प्रकरणातील पाच पोलीस अधिकारी आता अडचणीत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन समितीने आज आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.या अहवालात समितीने पोलिसांच्या केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने बंदूक खेचल्याचा पोलिसांचा दावा समितीने खोडून काढला.जर अक्षय शिंदे यांनी बंदूक खेचली असेल तर बंदुकीवर त्याच्या हाताचे…
