सचिन परब,विरार,
विरार येथे सखी सोहोळा संपन्न,महिलांची लक्षणीय उपस्थिती,
महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती भारती देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ बहुजन विकास आघाडी,अमेय क्लासिक क्लब,यंग स्टार ट्रस्ट व विराट फाऊंडेशनतर्फे सखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सखी सोहोळा आयोजित करण्यात येत असतो.यंदाचा हा सोहोळा रवि.१९ जाने.रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात नृत्य,गायन,विविध खेळ तसेच मनोरंजनाचे खेळ ठेवण्यात आले होते.नव्याने सुरु करण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या सोहोळ्यातील महिलांना ३ पैठण्यासोबत लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलेला आकर्षक नथ देण्यात आली.
साक्षी नाईक,सुप्रिया धनावडे, भूमिका मयावशी यांनी लकी ड्रॉ मध्ये नथ जिंकली तर स्नेहल पुराणिक,अंजली कदम आणि भाग्यश्री मायावशी यांनी होम मिनिस्टर खेळ जिंकत पैठणी पटकावली. महिलांनी स्वतः साठी वेळ काढला पाहिजे,याकरिता महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.उखाणा घेणे,आपली कला सादर करणे,असे विविध ” वन मिनिट गेम्स, ” व मनोरंजन खेळ खेळण्यात आले.तसेच लेझिम,लाठी काठी आणि सावित्री बाई फुले यांना मानवंदना देण्यासाठी एक पात्री सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हनुमंत कावळे,नगरसेविका वासंती पाटील,कांता पाटील, रिटा सरवैय्या,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. पंधराशेहून अधिक महिलांच्या उपस्थितीत हा सोहोळा साजरा झाला.

