सुगंध भोईर,कामण,
वसईतील पर्यटनस्थळांच्या विकासाची पालकमंत्र्याकडे मागणी,
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन तुंगारेश्वर व परशुराम कुंड या ‘क’ वर्गिय तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांच्या विकासाची मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणी संदर्भात पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वनमंत्री गणेश नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तुंगारेश्वर व परशुराम कुंड या तिर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला होता व विकासासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्र पाठवून विकास प्रस्तावासाठी सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पुर्व परवानगी आवश्यक असल्याचे कळवले. त्यानंतर या संदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही.केदारनाथ म्हात्रे यांनी पालकमंत्र्यांना आता पत्र देवून या तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आपण आता लक्ष घालून कार्यवाही करावी असंही विनंती केली आहॆ.

