सुरेश काटे,तलासरी,
बीएमडब्लूची रिक्षाला धडक
दोन जखमी,रिक्षाचा चक्काचूर,
तलासरी पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गावर आमगाव येथे भरधाव बीएमडब्लू कारने रीक्षाला आज दुपारी जोरदार धडक दिल्याने रीक्षाचा चक्काचूर झाला.त्यातील दोघा प्रवाशांना जबर दुखापत झाली.त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव उपचारासाठी दाखल केले.
सध्या महामार्गाचे व्हाईट टॅपिंगचे काम सुरू असून नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाता चे प्रमाण वाढले आहे
बीएमडब्लू कार क्रमांक HR 02, AD 0099 या भरधाव येणाऱ्या कारने रिक्षा क्रमांक GJ 15, XX 1880 ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला तर अपघातानंतर कार बाजुला असलेल्या खड्डयात पडली.
या अपघातात रिक्षामधील प्रवासी इश्वती लक्ष्मण कालात,वय ५० वर्षे,राहणार वरवाडा,आणि निलेश पलज्या शिंगडे वय ३३ वर्षे,राहणार आमगाव,हे दोघे जखमी झाले.त्यांना स्थानिकांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव येथे उपचारासाठी दाखल केले.

