- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ‘ अमृत सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना,
- चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोकॊ, हजारो महिला रस्त्यावर,
- अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
- मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाच्या प्रचंड रांगा,
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
- भालीवली गावातील सिंचन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा,
- एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
- आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा पाण्यासाठी महिलांना रात्रभर लागते जागावे लागते ;. महिलांना विहीरी,नदीपात्रात पाण्यासाठी उतरावे लागते, वाडा तालुक्यापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर असलेल्या हरोसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण पाडा व उंबरोठे ग्रामपंचायत क्षेत्रातील नदीपाडा येथील विहीरींनी तळ गाठला आहे.दोन ते तीन हंडे पाण्यासाठी संपूर्ण रात्र जागरण करून येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे.या गावपाड्यासाठी मंजूर असलेली जलजीवन योजनेची पाणी पुरवठा योजना अडीच वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी त्राही त्राही झाली आहे. वाडा शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर हरोसाळे ही ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण पाडा असून या पाड्याची लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे.या पाड्यासाठी एक विहीर असून पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.त्यामुळे गावात…
वसंत भोईर,वाडा माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, वाडा तालुक्यातील आंबिस्ते हायस्कूल येथील १९९३-९४ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लेक फिशरिया ऐनशेत येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. सर्वच सवंगड्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाला दिला.तो काळ कठीण होता,रोजगाराची फारशी साधने नव्हती.त्यामुळे प्रत्येकाने हलाखीच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनोगतातून व्यक्त झाली.यावेळी उपस्थित भगिनींना उद्योजक जगदीश पाटील यांच्यातर्फे साड्यांची भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम सर्व सहकाऱ्यांनी केले.
शशिकांत ठाकूर,कासा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ; वाहनचालक त्रस्त, डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला गेल्या शनिवारपासून सुरुवात झाली असून दर्शन व जत्रेकरीता गुजरात वरून येणाऱ्या भाविकांमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला १२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.ही जिल्ह्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. १५ दिवस चालणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेत मुंबई,ठाणे,गुजरात व आजूबाजूच्या शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे तसेच जत्रेचा दुसरा दिवस असल्याने गुजरात तसेच राजस्थान येथून मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत. त्यामुळे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने…
शशिकांत ठाकूर,कासा महालक्ष्मी यात्रेत दोन दिवसापासून भाविकांची प्रचंड गर्दी,दर्शनासाठी लांबच लांब रांगा, पालघर जिल्ह्यातील विवळवेढे – डहाणु येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या पंधरा दिवसीय यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.पहिल्या दोनच दिवसात लाखो भाविकांनी भेट दिली. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.वीकेंड आणि त्यासोबत आलेल्या सुट्टी आल्यामुळे आजही भाविकांचा ओघ सुरूच होता.यात्रेनिमित्त स्थानिक प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून भक्तांच्या सोयी सुविधेकडे लक्ष दिले जात आहे. दरम्यान रूढी व परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून यात्रेचे आयोजन केले जाते, यात्राकाळात महालक्ष्मी देवीला आकर्षक व नवीन शृंगार करण्याची पद्धत आहे. तर मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांच्या आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी मातेचे दर्शन घेण्यासाठी…
अविनाश मढवी,नालासोपारा ४० दिवसांची फज्र की नमाज पूर्ण करणाऱ्या मुलांना सायकलीचे वाटप, नालासोपारा येथील झेडपी जकेरिया शाळेत हजरत बिलाल फाउंडेशनतर्फे सलग ४० दिवस ” तकबीर ए उला के साथ फजर की नमाज,” पूर्ण करणाऱ्या लहान मुलांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सदर नमाज पढण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता मशिदीत जावे लागते,विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी,तसेच त्यांना सकाळी उठण्याचे चांगली सवय लागावी.जेणेकरून त्यांचा शारीरिक आणि शैक्षणिक फायदा होईल,या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमास सोपारा विभागातील मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.एकूण ४७५ मुले या उपक्रमात सहभागी होते.परंतु सलग ४० दिवस नमाज पूर्ण करण्यामध्ये १९३ मुले यशस्वी झाले होते.या सर्व…
दीपक मोहिते, भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश, विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. भूषण गवई नेमके कोण आहेत ? त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी होती याविषयी आपण जाणून घेऊया.म महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहे.ते ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते,माजी आमदार,खासदार आणि बिहार,सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेले…
नवीन पाटील,सफाळे येत्या १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ व्या केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी असलेल्या केळवे येथे दरवर्षी केळवा बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत असतो.यंदाही हा महोत्सव केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त सहकार्याने १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ वा केळवे बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आजवर झालेल्या महोत्सवात दरवर्षी कार्पोरेट,सेमी कॉर्पोरेट,स्थानिक मच्छीमार, वाडवळ,आगरी,भंडारी मुस्लिम,आदिवासी समाजातील महिला विविध प्रकारचे पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावत असतात. कार्पोरेट व सेमी कॉर्पोरेट विभागाचेही १०० हून अधिक स्टॉल्स महोत्सवात मांडण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे पारंपारिक नृत्य,विविध प्रांतातील…
दीपक मोहिते, नवीन बंधाऱ्यामुळे जुली बेट सुरक्षित ; सुमारे तीन हजार स्थानिक भूमिपुत्र सुखावले, वैतरणा खाडीतील जुली बेटाच्या संवर्धनासाठी जलसंपदा विभागाने जुली खारभूमी योजनेला मंजुरी दिली आहे.या योजनेअंतर्गत बेटाच्या संरक्षणासाठी बंधारा बांधण्यात येणार असून त्यासाठी ११ कोटी ८८ लाख रू.च्या निधीला विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयामुळे या बेटावरील सुमारे तीन हजार स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. विरार पश्चिमेस ४ कि.मी. अंतरावर वैतरणा खाडीत जुली बेट आहे.या बेटावर ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे.या बेटाच्या चोहोबाजूला खाडी असल्यामुळे खारभूमी योजनेअंतर्गत जुली बेटाच्या संरक्षणासाठी बेटाला बंधारा बांधण्यात आला होता. त्यासाठी जुली खारभूमी योजना राबवण्यात आली होती.मात्र या बेटाच्या परिसरात…
सुरेश वैद्य सफाळे, विरार नारिंगी – सफाळे दरम्यान लवकरच रो रो सेवा, विरार – नारिंगी ते सफाळे दरम्यान रो रो सेवेचा शुभारंभ लवकरच होणार असल्याची खात्रीदायक माहिती असुन ही सेवा विरार ते पालघर व पालघर ते विरार,असा प्रवास करणाऱ्यांसाठी सुलभ व वेळ वाचवणारी ठरणार आहे. शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील नारंगी ( विरार ) ते खारवाडेश्री ( सफाळे ) येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी रो-रो जेटी व तत्सम सुविधा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते.या प्रकल्पाला २६ ऑक्टो.२०१७ रोजी १२ कोटी ९२ लाख रु.ची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.त्यानंतर सरकारने २३.६८ कोटी रु.ची सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. विरारजवळ चिखलडोंगरी ( नारंगी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यथा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल…. पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून आजच्या घडीला जिल्ह्याची लोकसंख्या तीस ते चाळीस लाखाच्या घरात पोहोचली आहे.तसेच लोकसंख्येसोबत वाहनांची संख्या वाढत चालली आहे.ही स्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यंत्रणेने वाहतूकीचे नियोजनबद्ध आखणी करणे गरजेचे होते.पण तसे आजवर कधीच घडले नाही,त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीचे पार तीन तेरा वाजले असून नागरिकांना सध्या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. नव्याने पालघर जिल्हा निर्मिती,वसई विरार शहर महानगरपालिकेचे आगमन,ग्रामीण भागात नगरपंचायतीची स्थापना,अशा विविध कारणामुळे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात नागरीकरणाला प्रचंड वेग आला आहे.गेल्या दहा वर्षात हां हां म्हणता जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे तीस…
