वसंत भोईर,वाडा
माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,
वाडा तालुक्यातील आंबिस्ते हायस्कूल येथील १९९३-९४ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लेक फिशरिया ऐनशेत येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले.
सर्वच सवंगड्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाला दिला.तो काळ कठीण होता,रोजगाराची फारशी साधने नव्हती.त्यामुळे प्रत्येकाने हलाखीच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनोगतातून व्यक्त झाली.यावेळी उपस्थित भगिनींना उद्योजक जगदीश पाटील यांच्यातर्फे साड्यांची भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम सर्व सहकाऱ्यांनी केले.

