- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, प्रशासनाचा हलगर्जीपणा ; निधी निधी उपलब्ध होऊनही धुपप्रतिबंधक बंधारा कागदावरच… वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधून समुद्रकिनारा गिळंकृत करण्यापासून वाचवावे,अशी मागणी या समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक रहिवाश्यानी राज्य शासनाकडे केली आहे. सागरी जीवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव,रानगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात.पर्यटनसोबत वसईतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात,चवळी, गवार,वाल,दुधी,विविध फुलं आदी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पर्यटन व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र व राज्य शासनाने निसर्ग व तोते,या वादळानंतर कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी तब्बल ४ हजार ७०० कोटी रु.मंजूर केले.त्याअंतर्गत धूपप्रतिबंधक बंधारे,पूर संरक्षक भिंत,दरड प्रतिबंधात्मक कामे, बहुउद्देशीय निवारा केंद्र,खार प्रतिबंधक बंधारे,भूमिगत विद्युत वाहिनी…
दीपक मोहिते, गुजरातच्या समुद्रात अठराशे कोटीचे ड्रग्ज पकडले, गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटिसच्या संयुक्त कारवाईत तब्बल १ हजार ८०० कोटी रु.चा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडण्यात आली आहे.सुमारे ३०० कि.एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. नार्कोटिक्स विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती,अशी प्राथमिक माहिती आहे.कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ही बोट थांबवली आणि तिची कसून तपासणी केली असता बोटीत मेथॅम्पेटामिन ( एमडी ड्रग्ज ) हे ड्रग्ज असल्याचं समोर आलं आहे.ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तीन इंजिन सरकारमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं.मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही.अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले.तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला निघून गेले.आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झाले आहेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कोणी बदल केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते.याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली.एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती.यावेळी एकनाथ शिंदे…
दीपक मोहिते, ” सत्तेचा मार्ग स्वार्थातून जातो,”आणखी एक घराणे स्वार्थापोटी दुभंगले, सत्ता,हे सुख व ऐश्वर्य भोगण्याचे साधन आहे,त्यामुळे राज्यातील अनेक नामवंत घराणी गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत.त्यामध्ये ठाकरे,मुंडे,पवार,गांधी, राणे,विजय सिंह मोहिते पाटील,वसंत दादा पाटील व इतर अनेक घराणीचा त्यामध्ये समावेश आहे.पण या सर्व घराणींना आता फुटीचे ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे.सत्तेचा हव्यास व स्वार्थापोटी ही सर्व घराणी आता दुभंगत चालली आहेत.ही घराणी फुटल्यानंतर त्यांना फायदा होत नाही,पण वर्षानुवर्षे हाती असलेली सत्ता गमावण्याची नामुष्की मात्र त्यांच्यावर आली.राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अशी एक ना अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.पण त्यातून कोणी शहाणा व्हायला तयार नाही.या घराण्यातील प्रत्येकाला ” मला का नाही,” एकाच प्रश्नाने…
वसंत भोईर,वाडा वैश्य समाज संघाचा वधु – वर मेळावा उत्साहात संपन्न, मंगला हॉल कोपरी ठाणे येथे काल पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचा वधु वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे पालघर तसेच रायगड व नाशिक जिल्ह्यातील अनेक वधू वर मोठ्या उपस्थित होते.३२व्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सीमाताई महाजन,जिल्हा संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे,समन्वय समिती प्रमुख दिलीप भोपतराव, रायगड जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष अशोक भोपतराव, उपाध्यक्ष प्रीयेश जगे निलेश कोंडलेकर जिल्हा महिला प्रतिनिधी पूजा काबाडी, जिल्हा उप महिला प्रतिनिधी मयुरी तोंडलीकर, समितीचे सभापती निमेष खडकबाण,चिटणीस, सह चिटणीस,विश्वस्त,सल्लागार, माजी अध्यक्ष,सभापती,गट सभापती,तसेच वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
नवीन पाटील,सफाळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प ; प्रवाशांचे झाले अतोनात हाल, पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वेस्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी साधारण साडेतीन ते चारच्या सुमारास गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेकडून इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानंतर अर्धा तासाच्या विलंबानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.पश्चिम रेल्वेच्या डहाणू व गुजरातच्या दिशेने धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्याच्या सेवा आज दुपारी अर्धातास ठप्प झाल्या होत्या.भर दुपारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले होते. गुजरातकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सफाळे ते केळवा रोड स्थानकाच्या दरम्यान अचानक बिघाड झाल्यामुळे ती जागीच थांबून…
जव्हार प्रतिनिधी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार येथे रक्तदान शिबीर, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार यांच्यातर्फे पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथील रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात एकूण ६५ रक्तदाते सहभागी झाले.अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणारे रुग्ण,गरोदर माता तसेच विविध आजारांनी त्रस्त असंख्य रुग्ण यांच्यासाठी रक्तदान हेच जीवनाचे आधारस्तंभ ठरते.त्यामुळे प्रत्येक आरोग्यदायी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान करणेही काळाची गरज आहे,असे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्र सक्षम अधिकारी, संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, जव्हार यांच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे तसेच रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त…
सचिन परब,वसई कांदळवन कत्तलप्रकरणी जनमाहिती अधिकाऱ्याकडून दिशाभूल करणारा अहवाल, वसईतील पाचुबंदर येथील कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, वसई यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात अधिकाऱ्याने सदोष अहवाल सादर केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्याची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मालोंडे सर्वे क्रमांक ७३/६ या पाचूबंदर,वसई येथील जागेवर कांदळवनाची कत्तल करून प्रचंड मातीभराव करण्यात आला होता.या जागावर बंगले उभारण्यात आले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या मंडळ अधिकाऱ्याने सर्वे क्रमांक जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा नमूद केल्यामुळे दिशाभूल…
संजय लांडगे,वाडा वाड्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी, वाडा शहरातील सिद्धार्थ नगर येथे सिद्धार्थ युवक मित्र मंडळातर्फे विश्वभूषण, भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक अभिवादन सभा व त्यानंतर काल भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली,यावेळी बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रबोधन सत्रात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार,रोशन पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील,पत्रकार युवराज ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या…
