- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,
- जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली,
- वसई – विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांचा धावता दौरा,
- अंजुमन इस्लामतर्फे ४३ वा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,
- वाढवण बंदर ; नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टें. रोजी हितधारकांची बैठक,
- कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर,
- वसई व नालासोपाऱ्याच्या मतदारांमध्ये प्रचंड नैराश्य,
- ६४ कोटीच्या कचरा प्रक्रिया घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, नॅशनल डेस्कसाठी, बॉटमलाईन, अजितदादा गटाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आता उलथापालथी होण्याची शक्यता आहे.ही दुर्घटना घडण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.त्याच सुमारास महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपचे पार्थ पवार यांचे जमिनीचे गैरव्यवहार उजागर होणे तर अजित दादा पवार यांनी भाजपवर पलटवार करत पुणे मनपात भाजपने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला.तेव्हापासून भाजप व अजितदादा पवार यांच्यातील संबंध ताणले गेले होते.तेव्हापासून अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली होती.अजित पवार व शरद पवार हे दोघे काका – पुतणे एकत्र आल्यास राज्यात आपल्या विरोधात प्रभावी पर्याय उपलब्ध…
दीपक मोहिते, ” संवेदना,” एका वादळाची अचानक झाली एक्झिट… काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला.दादा इतक्या लवकर एक्झिट घेतील,असे कोणालाही वाटले नव्हते,पण काळाने घात केला.अशाप्रकारे एका वादळाचा शेवट झाला.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.धाडस,अभ्यासूवृत्ती, स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत व प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवण्याचे कसब,या गुणामुळे त्यांनी अगदी लहान वयातच खूप काही साध्य केले होते.धाडसी वृत्तीमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.पण आपल्याकडून चूक झाली,हे सांगण्याचे धाडस त्यांच्या अंगी होते.त्यांच्या या स्वभावामुळे ते यशाची एकेक पायरी यशस्वीपणे चढू शकले.निधीवाटपात ते अन्य पक्षाच्या आमदारावर अन्याय करतात,असा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा काळवंडत चालला आहे… गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्र नासवण्याचे ऐतिहासिक काम, या राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी केले व आजही करतच आहेत. त्यामुळे एकेकाळी पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.भगवा की हिरवा, अशा वादामुळे आपण एकमेकांकडे आता संशयाने पाहायला लागलो आहोत, ही बाब राज्याच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरली आहे.या सर्व गदारोळात माझ्या तिरंगाचा कोणीच कसा विचार करत नाहीत,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभा ठाकला आहे. आज, आपण सारे एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत.भारतीय संविधानात हिरवा किंवा भगवा या दोन्ही शब्दाला स्थान नसताना मात्र ज्या लोकांनी राज्य नासवण्याचा विडा उचलला आहे, अशांना…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणेश नाईक यांचा बोलवता धनी कोण ? गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.एकाच मंत्रिमंडळात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यामध्ये असलेला बेबनाव दररोज समोर येऊ लागला आहे.वनमंत्री गणेश नाईक हे तर ताळतंत्र सोडत शिंदे यांना लक्ष्य करत आहेत.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या कुरापतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.मात्र,त्यांचे सहकारी ( संजय शिरसाट,प्रताप सरनाईक व शंभूराज देसाई ) मात्र गणेश नाईक यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.ही सारी मंडळी दर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.जनतेचे सामूहिक नेतृत्व करताना ही मंडळी संविधानाने आखून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाड हिंसाचार ; उच्च न्यायालयाने सरकारची लक्तरे वेशीला टांगली, रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या सत्तास्पर्धेत जे रणकंदन सुरु आहे,त्याला आवर घालण्याऐवजी सरकार व आपली पोलीस यंत्रणा खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नगरपरिषद निवडणूकी दरम्यान महाड येथे शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) यांच्यामध्ये झालेल्या राड्यावरुन उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहखाते व भरत गोगावले यांना सुणावणी दरम्यान चांगलेच झापले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यावर टीप्पणी केली आहे.” राज्याचे मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का ? ते आपल्याच युतीमधील…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना शिंदे पिता – पुत्राने घाम फोडला… उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय कोणाला फायदेशीर ठरला ? याविषयी चाचपणी केली असता उद्धव ठाकरे यांचे या निवडणुकीत फार मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ हा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाला ९ जागा कमी पडत आहेत.त्यामुळे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक गळाला लावले आहेत.दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणखी दोन नगरसेवक बेपत्ता झाले आहेत.त्यामुळे ५३ नगरसेवक असलेल्या शिंदे…
दीपक मोहिते, नॅशनल डेस्कसाठी, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचे आर्थिक धोरण आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारे… तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्न बघणाऱ्या आपल्या देशाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागोमाग धक्के देत आहेत.आपल्या शेअर मार्केटमधून विदेशी संस्थांनी सुमारे ३६ हजार ,५०० कोटी रु.ची गुंतवणूक काढून घेतल्यामुळे डॉलरच्या तुलनेत आपला रुपया ९१.९४ च्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरचे दिवसेंदिवस मजबूत होणे, इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे.परदेशात शिकणारे विद्यार्थी व प्रवासासाठी डॉलर्स खरेदी करणे,आता आपल्या आवाक्याबाहेर झाले आहे.अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण घनिष्ठ मित्र आहोत,असे भासवत असले तरी,दक्षिण आशियात असलेले भारताचे वर्चस्व मोडून…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सरकारी यंत्रणा माध्यमावर दबावतंत्राचा वापर करू लागले आहे… हल्ली पोलीस यंत्रणेविषयी फारसे चांगले बोलले जात नाही.सर्वसामान्य माणूस सहसा पोलीसांवर विश्वास ठेवायला तयार नसतो,त्यामुळे तो न्यायासाठी पोलीस ठाण्यात जायला तयार नसतो.आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळणार नाही,अशी त्याची धारणा झाली आहे.सर्वसामान्य नागरिक व पोलीस यंत्रणे दरम्यान निर्माण झालेली ही दरी व अविश्वास,हा पोलीस यंत्रणेवरून लोकांचा विश्वास उडत चालल्याची चिन्हे आहेत.त्यामुळे भारतीय जनतेला केवळ न्याययंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे व पुढेही राहावे लागणार आहे. आपली पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते,हे आजवरच्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.तसेच हल्लीच्या काळात आपली पोलीस यंत्रणा कशी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहे,हे जम्मू- काश्मीर…
दीपक मोहिते, ” दावोस ; एक पर्यटन,” स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातील दावोस येथे भरणारी वर्ल्ड इकॉ.फोरम ही संस्था काय आहे व तिचे कामकाज कशा पद्धतीने चालते,हे आपण जाणून घ्यायला हवे.या परिषदेत सहभागी होणाऱ्या देशात आपण किती गुंतवणूक आणली,यावरून स्पर्धा सुरू होत असते.पण,या दावोसमध्ये जाऊन नेतेमंडळी नेमके करतात काय ? हे जाणून घेण्याची गरज आहे. हे वर्ल्ड इकॉ.फोरम म्हणजे नक्की काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर आहे,ही एक खाजगी संस्था आहे.पण तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.जागतिक व्यापार,व्यवसाय,राजकारण,शिक्षण व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून प्रदेश विकासाला चालना देण्यासाठी १९७१ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.या परिषदेत सुमारे ३ हजार ५०० हुन अधिक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुंबईच्या मतदारांनी ठाकरे बंधूना का झिडकारले ? मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा जादुई आकडा ठाकरे बंधूना गाठू दिला नाही.अर्थात या शहराच्या महापौरपदी महायुतीची व्यक्तीच विराजमान होणार आहे.८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे,तर शिवसेना ( उबाठा ) ६५ जागासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर शिंदे यांच्या गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २४,एआयएमआयएम -०८,मनसे -०६,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) – ०३,समाजवादी पक्ष – ०२ व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ०१,अशी क्रमवारी आहे. भाजप व शिंदे यांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी उद्धव व राज हे दोघे…
