दीपक मोहिते,
नॅशनल डेस्कसाठी,
बॉटमलाईन,
अजितदादा गटाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील,
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आता उलथापालथी होण्याची शक्यता आहे.ही दुर्घटना घडण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.त्याच सुमारास महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपचे पार्थ पवार यांचे जमिनीचे गैरव्यवहार उजागर होणे तर अजित दादा पवार यांनी भाजपवर पलटवार करत पुणे मनपात भाजपने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला.तेव्हापासून भाजप व अजितदादा पवार यांच्यातील संबंध ताणले गेले होते.तेव्हापासून अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली होती.अजित पवार व शरद पवार हे दोघे काका – पुतणे एकत्र आल्यास राज्यात आपल्या विरोधात प्रभावी पर्याय उपलब्ध होऊ शकतो,हे भाजप जाणून होता.पण,अशाप्रकारची युती होण्यापूर्वी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले,व भाजपसमोर वेगळाच पेंच उभा राहिला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकखांबी पक्ष आहेत.त्यामुळे अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अजित पवार गट हा शरद पवार गटामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे.पण, भाजप तसे होऊ देणार नाही.अजित पवार गटाकडे ४१ आमदार आहेत,ते जर शरद पवारांकडे गेले तर भविष्यात आपल्याला ते त्रासदायक ठरू शकते,याची जाणीव असल्यामुळे भाजप ते होऊ देणार नाही.अजित पवार यांचे अकाली जाण्यामुळे एकनाथ शिंदे गटालाही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.अजितदादा गटाचे ४१ आमदार व स्वतःचे १०५ आमदार या जोरावर भाजपने गेल्या वर्षभरात शिंदे यांची चांगलीच कोंडी केली होती.अशावेळी अजित पवार गटाचे ४१ आमदार जर शरद पवार यांच्या गटात सामील झाल्यास भाजपला पुन्हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी करावी लागणार आहे. एकनाथ शिंदे हे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे,यासाठी देव पाण्यात टाकून बसले आहेत.तसेच भाजपचे धुरंधर नेता अशी ओळख असलेल्या अमित शहा यांच्याशी शिंदे यांची असलेली जवळीक आपल्याला त्रासदायक ठरेल,अशा भितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ नये, यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील.अजितदादा गटाच्या आमदारांची भानगडी व कुलंगडी बाहेर काढत किंवा ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लावत,त्यांना आपल्याकडे वळवण्याची,अशी शक्यता अधिक आहे.

