दीपक मोहिते,
अंजुमन इस्लामतर्फे ४३ वा सत्कार सोहळा उत्साहात साजरा,
अंजुमन इस्लाम विरार शाखेतर्फे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. हितेंद्र ठाकूर उपस्थित होते.
शनी. २९ ऑगस्ट रोजी विरार पूर्व भागातील मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महापौर अजीव पाटील, आ. राजेंद्र गावित व संस्थेचे सरचिटणीस इस्माईल खान आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शालांत परीक्षेत ज्या पाच विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली, त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ध्रुव पराग राऊत – ९७. ६० %, नील अजय मिस्त्री – ९७.६० %, मृणालिनी मनमोहन पाटील – ९७.२० %, समृद्धी सुमित पाटील – ९७. २० %, मुस्लिम समाजातून प्रथम क्रमांक मिळवणारा जैद अब्दुल्ला खोकर – ९२. ४० % व अंजुमन उर्दू हायस्कुल ची सकीना अंसारी – ८९.८० %, यांचा समावेश होता. यावेळी या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे सरचिटणीस ऍड. खलील शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर अंजुमन प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यपक अशफाक शेखने अंजुमनच्या कार्याचा आढावा घेतला.

