- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात,
- आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता,
- यशस्वी जीवनाचे रहस्य,
- ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार, वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघर मधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
- मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय,
- काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे,
- गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट,
- सारासार विचार करण्याची गरज आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” समाधानाची बाब,” विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा दिसू लागले,लोकांमध्ये समाधानाचे वातावरण, हल्ली विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा मतदारसंघाचे आ.स्नेहा दुबे व राजन नाईक सतत आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न,समस्या व लोकांच्या अडचणीबाबत प्रश्न मांडत असतात,ही एक समाधानाची बाब तर आहेच,पण लोकामध्येही चांगले संकेत जात आहेत.गेल्या सहा महिन्यात त्यांनी अधिवेशनात या दोन्ही मतदारसंघाच्या प्रश्नाकडे सरकारचे वारंवार लक्ष वेधले.सरकारही त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. आजवर विधानसभा सभागृहात या दोन्ही मतदारसंघाचे प्रश्न व समस्या कधीही हिरिरीने मांडले गेले नव्हते.त्यामुळे सरकारने देखील या भागाच्या विकासाकडे आजवर कधीच लक्ष दिले नाही.त्यामुळे मंत्रालयापासून अवघ्या ४०…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” प्रदीर्घ काळानंतर जरांगे पाटील पुन्हा रणांगणात,पण डाळ शिजेल का ? गेले वर्षभर निवांत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत.” सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर त्यांना सळो की पळो करून सोडतो,” अशी सिंहगर्जना त्यांनी केली आहे.२९ ऑगस्टच्या आत आरक्षण द्या,अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्यास सरकार जबाबदार राहील,असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.यापूर्वीही जरांगे पाटलांनी अनेकदा सरकारला असे निर्वाणीचे इशारे दिले होते.पण सरकारच्या दूताकडून वारंवार समोर आलेले सरबताचे ग्लास तोंडाला लावण्यात जरांगे पाटील दंग राहिल्यामुळे दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याची सरकारने फारशी दखल घेतलेली नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे…
दीपक मोहिते, राज्याची विनाशाकडे वाटचाल, बहिणी लाडक्या झाल्या,आता सरकार भावोजीना” बेवडे,” करण्याच्या तयारीत… वर्षभरापूर्वी राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागावा,यासाठी ” लाडकी बहीण,” योजना आणली.या बहिणीच्या माध्यमातून महायुतीने विधानसभा निवडणुका जिंकल्या.आता मात्र त्याच सरकारने,आपल्या भावोजीना ” बेवडे,” बनवण्यासाठी नवीन मद्य धोरण अमलात आणले आहे.महिलांच्या मतासाठी सरकारने आपल्या तिजोरीतील पैसा अक्षरशः लुटला.त्यामुळे आज राज्याच्या डोक्यावर १० लाख कोटींचे कर्ज आहे.आज ना उद्या या कर्जाचे व्याज देणे,देखील सरकारला शक्य होणार नाही.आपले राज्य आर्थिक व उद्योग क्षेत्रात क्रमांक १ वर असल्याचा ढोल सतत वाजत असतो.पण प्रत्यक्षात आपले राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. राज्य सरकारचे अनेक विभागाकडे आजच्या घडीला निधीची कमतरता असल्यामुळे…
जव्हार प्रतिनिधी, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण विभागाचे कर्मचारी हक्कांपासून वंचित, पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तब्बल १० वर्षे पूर्ण होत आली,तरीही हिवताप हत्तीरोग नियंत्रण विभागाचा आर्थिक व प्रशासकीय कारभार अद्याप ठाणे येथूनच चालवला जात आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जवळपास २५० आरोग्य कर्मचारी आजही आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. सध्या पालघर जिल्ह्यात हिवताप विभागांतर्गत १७८ आरोग्य सेवक,४२ आरोग्य सहाय्यक,१२ तालुका पर्यवेक्षक व १४ कार्यालयीन कर्मचारी असे कर्मचारी कार्यरत आहेत.हे कर्मचारी आदिवासी व डोंगराळ भागात मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया, जपानी मेंदूज्वर,यासारख्या कीटकजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहनत घेत आहेत.मात्र,त्यांच्या सेवा नोंदी, वेतन,रजा,वैद्यकीय बिले तसेच पदोन्नतीशी संबंधित सर्व प्रक्रिया ठाणे कार्यालयातून पार पडत असल्यामुळे त्यांना वेळेवर लाभ मिळत नाहीत.या…
… आणि खडतर प्रवासाची पायपीट थांबली, गारगाव व डाहे शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलची भेट वाडा :दि.१३ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अलीकडे समोर आलेल्या बातम्यांमध्ये, विद्यार्थी नद्या ओलांडून आणि कठीण डोंगरी व दुर्गम रस्त्यांवरून शाळेत जात असल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी आजही शाळेत पोहोचण्यासाठी दररोज ३ कि.मी.हून अधिक अंतर पायी चालत प्रवास करतात. अशा पार्श्वभूमीवर जुनून फाउंडेशनने या भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, १२ जुलै २०२५ रोजी जुनून फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा गारगाव आणि जिल्हा परिषद शाळा डाहे (जिल्हा: पालघर) येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाडा तालुक्यातील या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मॅडम,महानगरपालिका व नगरविकास विभागाची मिलीभगत आहे… काल विधानसभेत नालासोपाऱ्याच्या आमदारांनी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणात तीन मुद्दे उपस्थित केले.ओसी न मिळालेल्या इमारतींना पाणी देण्यात यावे,अशा पद्धतीने बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना काळ्या यादीत टाकणे व भविष्यात या बिल्डर्सना पुन्हा बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये,असे या तीन महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.हे तिन्ही मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या हिताशी संबंधित आहेत.पण त्यांनी ज्या बिल्डरांनी या इमारती बांधल्या त्यांना जबर दंड ठोठावला पाहिजे अशी मागणी देखील करायला हवी.सरकारकडून तशी कारवाई झाली तर या तालुक्याला लागलेला कॅन्सर कायमचा नाहीसा होऊ शकतो.त्याच बरोबर त्यांनी बोगस ओसीचा प्रश्न…
दीपक मोहिते, अनधिकृत बांधकामाचा हव्यास, वसई,विरार परिसर दरवर्षी जलमय का होतो ? आम्ही वसईकरांनी जगायचं तरी कसं ? वसई,विरार,नालासोपार्याचा भाग एकेकाळी हरितपट्टा म्हणून ओळखला जात होता. या भागातील ताज्या भाज्या, फळे,फुले याची शेती / बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ जवळचहोती. मुंबईपासून अवघ्या पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या वसई-विरारच्या हरितपट्ट्याला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. समुद्र,खाड्या,नारळी पोफळीच्या बागा,शेती, बागायती,पानवेली,वसईची केळी,फुले व भाज्या,ही या भागाची खासियत होती. तथापि,गेल्या तीन दशकांत या हरित पट्ट्यात अनिर्बंध बांधकामे उभी राहिली.चाळी, इमारतींची नवनवी निवासी संकुले आकार घेऊ लागली. त्यात समुद्र किनारे,खाड्या, खारफुटीची जंगले,मिठागरे व गावेच्या गावे नष्ट झाली.या हरितपट्ट्यात सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली. एकेकाळी शांत,सुंदर,अशी ओळख असलेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे अडचणीत ; त्यांच्या गटाचे अनेक मंत्री व आमदारांचे पाय खोलात… महायुती सरकारमधील संजय शिरसाट,संजय गायकवाड, संजय राठोड व भरत गोगावले,या चार सहकाऱ्यामुळे शिंदे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ व संजय राठोड हे दोन मंत्री आर्थिक गैरव्यवहार,तर आ.संजय गायकवाड हे गुंडगिरी व भरत गोगावले मंत्रिपदावर असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे व टायर जाळणे,असे प्रकार करत असल्यामुळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस शिंदे यांच्यावर नाराज झाले आहेत.त्यांनी शिंदे गटाच्या संजय राठोड यांना अलीकडेच दणका दिला आहे.मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांच्या मालिकांमुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा कोणाचा क्रमांक लागणार याची कुजबूज आता आमदारांमध्येच सुरू झाली…
दीपक मोहिते, ” गंडांतर,” पंतप्रधान मोदी विरुद्ध सरसंघचालक मोहन भागवत ; ट्वेन्टी – ट्वेंटीची मॅच सुरू… नागपूर येथे ९ जुलै रोजी झालेल्या संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पिंगळे यांची आठवण काढताना ते म्हणाले,” मी जेव्हा उभा राहतो,तेंव्हा लोक माझ्यावर हसायचे,तेंव्हा मला वाटायचं की लोक मला आता गांभीर्याने घेत नाहीत.तुम्ही शाल दिली,पण मला त्याचा अर्थ माहीत आहे.जेंव्हा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी खांद्यावर शाल पडते,याचा अर्थ आपण आता म्हातारे झालो आहोत आणि आता आपण बाजूला झाले पाहिजे,याची जाणीव होते.त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा अहमदाबाद येथे झालेल्या ” सहकार संवाद,” या कार्यक्रमात बोलताना…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे माणुसकीची छत्री,आणि वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न, जव्हार तालुक्यातील रामनगर कातकरीपाडा या गावाच्या शाळेत यारी दोस्ती फाऊंडेशन पालघरतर्फे माणुसकीची छत्री, शैक्षणिक आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यारी दोस्ती ग्रुप मधील सर्व मित्रांनी निधी जमा करून निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत करण्याचे ठरवले.या निधीमधून माणुसकीची छत्री म्हणून या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तीचा शोध घेवून त्यांना छत्री वाटप केले.शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या मुलांना ग्रुपतर्फे बक्षीसे देवून गौरवण्यात आले.त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण म्हणून सर्व सदस्यांनी या पावसाळ्यात एक वृक्ष लागवड करून…
